Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अनय जोशीचे सुयश
नागपूर, ७ जून / प्रतिनिधी

 

धरमपेठ विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी अनय अविनाश जोशी याने यंदा आयआयटी जेईई आणि एआयईईई या दोन्ही परीक्षांमध्ये विदर्भातून पहिले स्थान पटकावतानाच बारावीच्या परीक्षेतही ९७.५ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
अनयला गणित विषयात विशेष रूची आहे. ऑल इंडिया मॅथेमॅटिक्स टिचर्स असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील गणिताच्या परीक्षेत अनय यंदा भारतातून पहिला आला. शिवाय त्याची यंदा आंतरराष्ट्रीय मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड कँपसाठीही निवड झाली होती. उत्तम यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमाबरोबर योग्य मार्गदर्शक लाभले पाहिजेत आणि सुदैवाने अशी जाणती मंडळी माझ्या पाठीशी उभी होती, अशी नम्र भावना अनय व्यक्त करतो. आयआयटी पवई येथे अभियांत्रिकीचा अभ्यास करतानाच गणितात विशेष प्राविण्य मिळवण्याचा ध्यास अनयने घेतला आहे. अनय हा नागपूरचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी व एन.के.पी. साळवे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायंन्सेस येथील डॉ. सुलभा जोशी यांचा सुपुत्र आहे. अनय त्याच्या यशाचे श्रेय आयआयटी होमच्या निशा कोठारी, दिलीप मुजुमदार, मेघा देशपांडे, ऑलिम्पियाडच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणारे अनिल कायंदे आणि विवेक वाघ, धरमपेठ महाविद्यालयाच्या प्राचार्य भाटे, आजी-आजोबा दत्तात्रय डाकवाले व प्रतिभा डाकवाले तसेच आईवडिलांना देतो.