Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मंगळसूत्र खेचणाऱ्यांना पाठलाग करून पकडले
नागपूर, ७ जून / प्रतिनिधी

 

पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळणाऱ्या लुटारूचा हिमतीने पाठलाग करून एका तरुणाने नागरिकांच्या मदतीने दोन लुटारूंना पकडल्याची घटना दक्षिण अंबाझरी मार्गावरील आयटी पार्कजवळ शनिवारी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास घडली.
विलास मोटघरे (रा़ सीआरपीएफ कॅम्प) हा त्याच्या पत्नीसोबत होंडा अ‍ॅक्टिवाने (एमएच३१/बीवाय/८६१६) घरी जात होता. आयटी पार्क ते टेलिफोन एक्सचेंज रस्त्यावर मागून वेगात आलेल्या यामाहावरील (एमएच३१/डब्ल्यूएस/३२९३) दोघांनी विलासच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र (किंमत ४५ हजार ८६० रुपये) खेचून पळ काढला तेव्हा विलासने लुटारूंचा पाठलाग केला. त्या दोघा लुटारूंनी अंबाझरी टी पॉइर्ंटवरील क्रेजी कॅसलसमोर करीज्मा मोटारसायकलजवळ उभ्या असलेल्या दोघांना ते मंगळसूत्र दिले. ते घेऊन करीज्मावरील दोन आरोपी पळून गेल़े मात्र मंगळसूत्र चोरणारे आरोपी तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात विजेच्या खांबालाधडकल्याने खाली पडून जखमी झाले. तेवढय़ात तेथे पोहोचलेल्या विलासने आरडाओरड केली. त्यामुळे तेथे जमलेल्या नागरिकांनी आरोपींना पकडले. कुणीतरी प्रताप नगर पोलिसांना कळवले. पोलीसही तेथे पोहोचले. नागरिकांनी पकडलेल्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिल़े भूषण जीवक लांजेवार व अनिल सुखदेव आत्राम (दोन्ही रा़ संजय नगर झोपडपट्टी) ही त्यांची नावे आहेत.
तरुणाला भोसकले
दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाला खाली पाडून त्याला भोसकल्याची घटना, जाटतरोडी जयंती मैदानाजवळ शनिवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास घडली. संजय धनराज पाटील (रा़ इंदिरा नगर) हा त्याच्या हिरो पुकने जयंती मैदानासमोरून जात असता तीन अनोळखी तरुणांनी त्याला अडवले व खाली पाडून दोघांनी मारहाण केली़ नंतर तिसऱ्याने गुप्तीने त्याच्या पोटावर भोसकल़े संजयला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. इमामवाडा पोलिसांनी अनोळखी आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी विक्की दिनेश सोमकुंवर (रा. रामबाग), सचिन श्रीराम खंडारे (रा. जाटतरोडी), करुणानंद रमेश मून या आरोपींना अटक केली.