Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आजपासून सिस्फाचे ‘मान्सून बोनांझा’ प्रदर्शन
नागपूर, ७ जून / प्रतिनिधी

 

मुंडले एज्युकेशन ट्रस्टच्या सेंट्रल इंडिया स्कूल ऑफ फाईन आर्टस् (सिस्फा)तर्फे ८ जून ते ३१ जुलै दरम्यान ‘मान्सून बोनांझा’ या चित्रकला व शिल्पकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील १९ नामवंत कलावंत या प्रदर्शनात त्यांची कला प्रदर्शित करणार असल्याची माहिती सिस्फाचे अधिष्ठाता चंद्रकात चन्न्ो यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रदर्शनात मुंबई, बडोदा, गुलबर्गा, औरंगाबाद व शांतीनिकेतन येथील १९ चित्रकार व शिल्पकारांचे १५ प्रदर्शन होणार असून त्यात दोन प्रदर्शन हे ‘ग्रुप शो’ आहेत.
उद्या, सोमवारी शांतीनिकेतनचे शिल्पकार अरींदम सरकार यांच्या ‘अरींदमेर खेलार गारी’ या मोटार बाईक संकल्पनेवर आधारित स्कल्पचरचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ६.३०वाजता स्वरवेधचे सचिव अ‍ॅड. भानुदास कुळकर्णी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. लक्ष्मीनगरातील सिस्फाच्या छोटय़ा गॅलरीत १४ जूनपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहणार असून सकाळी ११ ते रात्री ८.३० या वेळेत रसिकांना ते पहाता येईल.
या प्रदर्शनात बाबर शरीफ यांचे १५ ते १७ जून, शशिकांत रेवडे यांचे १८ ते २० जून, बडोदाचे मिलिंद लिंबेकर यांचे २२ ते २४ जून, निखिल मुंडले व पंकज दवंडे यांचे २५ ते २८ जून, ज्योती हेजीब यांचे २९जून ते १ जुलै, प्रकाशचंद्र कावळे यांचे २ ते ४ जुलै, गुलबर्गाचे प्रशांत फिरंगी यांचे ६ ते ८ जुलै, भाऊ दवंडे यांचे ९ ते ११ जुलै, मुंबईचे अनिकेत खुपसे यांचे १३ ते १५ जुलै, मुक्तानंद नवघरे यांचे १६ ते १८ जुलै, औरंगाबागचे गौतम खरात, भिमराव वाठोरे, श्रद्धा उत्तरवार , बाळकृष्ण चड्डीदार यांचा ग्रपु शो १९ ते २२ जुलैला, सिस्फाचे अधिष्ठाता चंद्रकात चन्न्ो यांचे २३ ते २५ जुलै, बनारसचे रविप्रकाश सिंह यांचे २७ ते २९ जुलै व नागपूरचे अरुण दारोकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन ३० ते ३१जुलैदरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
चित्र व शिल्पकला प्रदर्शनाच्यावेळी शॉर्ट फिल्मस, कलागोष्टी, स्लाईड शो व त्यावरील पुस्तकांचे प्रदर्शन राहणार आहे. मान्सुन बोनांझा या कलाप्रदर्शनात सहभागी होणाऱ्या काही कलावंताची चित्रशिल्प कार्यशाळा ९ ते १४ जूनदरम्यान दुपारी १२ ते ७.३० वाजता दरम्यान सिस्फाच्या गॅलरीत आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत सिस्फाचे अधिष्ठाता चंद्रकात चन्न्ो, चित्रकला महाविद्यालयाचे अधिष्ठाता
प्रा. अरुण दारोकार, प्रा. प्रकाश कावळे, बनारसचे शिल्पकार रविप्रकाश सिंह, शशिकांत रेवडे, बडोद्याचे मिलिंद लिंबेकर, बाबर शरीफ, भाऊ दांदडे, ज्योती हेजीब, मुक्तानंद नवघरे आणि शांतीनिकेतनचे शिल्पकार अरींदम सरकार हे पाच दिवस रसिकांशी संवाद साधतील. या सर्व प्रदर्शनाला चित्र आणि शिल्प रसिकांनी भेट द्यावी, असे आवाहन सिस्फाचे अधिष्ठाता चंद्रकात चन्न्ो यांनी केले आहे.