Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पोलीस कुटुंबातील पाचशे सदस्यांची आरोग्य तपासणी
नागपूर, ७ जून / प्रतिनिधी

 

पाचपावलीतील एसईएस गर्ल्स हायस्कूलमध्ये पार पडलेल्या नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिरात पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील पाचशेवर सदस्यांची तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन पाचपावली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवळकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सहायक पोलीस आयुक्त अनिल बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या भाषणात ‘तनावरहित जीवन कसे जगावे’ या विषयावर माहिती दिली. तर देवळकर यांनी संतुलित आहाराचे महत्व सांगितले. याप्रसंगी तहसील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यादव, यशोधरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परदेशी, जरीपटका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धोत्रे, कोराडीचे सिंग प्रामुख्याने उपस्थित होते.
पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित यांच्या सूचनेनुसार पार पडलेल्या या शिबिरात डॉ. अभिषेक सोनी, डॉ. थाडानी, डॉ. दिलीप डोणेकर, डॉ. जोशी, डॉ. विद्या गांधी, डॉ. स्नेहल राऊत, डॉ. ओमप्रकाश, डॉ. आनंद देशमुख, डॉ. रवी करकरे, डॉ. पाटील यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांची तपासणी करून योग्य सूचना केल्या.
या शिबिराचा कोराडी, पाचपावली, तहसील, यशोधरानगर, जरीपटका, वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील पाचशे सदस्यांची तपासणी करण्यात आली.