Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आज दीड तास वीजकपात
पुणे, ७ जून/ प्रतिनिधी

 

टाटा पॉवर कंपनीकडून पुरेशी अतिरिक्त वीज मिळणार नसल्याने पुणे व िपपरी- चिंचवड शहरामध्ये उद्या (सोमवार) एक ते दीड तासांची वीजकपात होणार आहे, असे ‘महावितरण’कडून कळविण्यात आले आहे.
‘टाटा पॉवर’कडून अतिरिक्त वीज घेण्याच्या कराराची मुदत ३१ मे रोजी संपल्यानंतर त्यास एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर पुरेशी अतिरिक्त वीज उपलब्ध होत नसल्याचे दिसते आहे. उद्या (सोमवार) ४७.८३ मेगावॉट अतिरिक्त वीज मिळणार आहे. ‘अ’ गटातील पद्मावती, पर्वती, शिवाजीनगर व कोथरूड या विभागात एक तास, ‘ब’ गटातील भोसरी, रास्तापेठ, नगर रस्ता व बंडगार्डन विभागात सव्वा तास, तर ‘क’ गटातील िपपरी विभागात दीड तासांची वीजकपात करण्यात येणार असल्याचे ‘महावितरण’ने कळविले आहे.
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे वीजवाहिन्यांवर झाडे पडल्याने निर्माण झालेली वीजपुरवठय़ाची समस्या आज तिसऱ्याही दिवशी काही भागात कायम होती. पूर्व भागातील काही पेठांमध्ये संध्याकाळी वीजपुरवठा खंडीत झाला होता. रात्री दुरुस्तीचे काम पूर्ण करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

वीज गेल्यास संपर्क करा..
पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘महावितरण’च्या वतीने शहर व जिल्ह्य़ात आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा ९९६०६७७५०९ (पुणे परिमंडल), रास्ता पेठ मंडल अंतर्गत येणाऱ्या पद्मावती, पर्वती, नगर रस्ता, रास्ता पेठ, बंडगार्डन या विभागासाठी ९९६०६७७०४९, गणेशखिंड मंडल कार्यालयाच्या कक्षेत येणाऱ्या शिवाजीनगर, कोथरूड, िपपरी, भोसरी या विभागांसाठी ९९६०६७७३५१, तर पुणे ग्रामीण मंडल कार्यालयांतर्गत येणाऱ्या मुळशी, राजगुरुनगर, मंचर, बारामती, केडगाव या विभागासाठी ९९६०६७७४०९.