Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

महिलेची बॅग हिसकावणाऱ्यास अटक
पिंपरी, ७ जून/प्रतिनिधी

 

चिंचवड-शाहूनगर येथील एचडीएफसी कॉलनीच्या रस्त्यावर शनिवारी दुपारी एका महिलेची बॅग हिसकावणाऱ्यास िपपरी पोलिसांनी अटक केली.
पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वजित ऊर्फ इशा रमेश जोशी (वय २०, रा. मोरवाडी झोपडपट्टी, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी स्वाती माणिक वाळुंज (वय २७, रा. राघवेंद्र सोसायटी, शाहूनगर, चिंचवड) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. शनिवारी दुपारी स्वाती वाळुंज या आपल्या कुटुंबासह पायी जात होत्या. दरम्यान, पाठीमागून आलेल्या आरोपी विश्वजित जोशी याने त्यांच्या हातातील बॅग हिसका मारून पळवून नेली. स्वाती वाळुंज यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. पिंपरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाला याबाबत माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी विश्वजित जोशी याला बॅगेसह अटक केली. त्या बॅगेमध्ये रोख दहा हजार रुपये, एक मोबाईल संच व कपडे असा बारा हजार दोनशे रुपयांचा ऐवज होता. अधिक तपास फौजदार मीना जगताप करीत आहेत.
सव्वा लाखाची घरफोडी
वाकड येथील पलश कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी सायंकाळी ते शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान चोरटय़ांनी बाल्कनीतून प्रवेश करून सव्वा लाख रुपयांचा माल चोरून नेला.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित बाबुराव सासणे (वय ३३, रा. डी ३०२, पलश कॉम्प्लेक्स, ग्रीन ड्राईव्ह, वाकड) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. सासणे हे त्यांच्या कुटुंबासह मावसभावाच्या घराच्या वास्तुशांती पूजेसाठी चार तारखेला सायंकाळी साडेसात ते पाच तारखेच्या रात्री साडेदहापर्यंत गेले होते.
दरम्यान, चोरटय़ांनी इमारतीच्या जिन्यामधून तिसरा मजला गाठला. तेथून त्यांनी सासणे यांच्या बाल्कनीतून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने, दोन डिजिटल कॅमेरे, एक लॅपटॉप असा एकूण एक लाख तीस हजार रुपयांचा माल चोरून नेला. अधिक तपास फौजदार डी. डी. जगदाळे करीत आहेत.