Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांची वाहतूक न करण्याचे आवाहन
नाशिक, ७ जून / प्रतिनिधी

शैक्षणिक वर्षाला सुरूवात होत असताना प्रश्नदेशिक परिवहन विभागही दक्ष झाला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विभाग विशेष लक्ष ठेवून असून आसन क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये, असे आवाहन प्रश्नदेशिक परिवहन अधिकारी

 

कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
ऑटोरिक्षांमधून प्रश्नमुख्याने विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. काही रिक्षा व शैक्षणिक संस्थांच्या बसेस आसन क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांची वाहतूक करताना आढळून येत असल्याने प्रश्नदेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकांव्दारे अशा प्रकारे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची रस्त्यावर पुन्हा तपासणी सुरू करण्यात येत आहे. शैक्षणिक संस्थांनी त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या बसेसमधून क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये, तसेच खासगी विद्यार्थी व प्रवाशांची वाहतूक करू नये, जिवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारे गैरपद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून पालकांनी आपल्या पाल्यास शाळेत पाठवू नये, अशा सूचना विभागातर्फे करण्यात आल्या आहेत.
रिक्षा, टॅक्सी संघटनांनी मालक, चालक यांना अशा प्रकारे गैरपद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यापासून परावृत्त करावे, शैक्षणिक संस्थांनी वाहनांचे व टॅक्सी, रिक्षा चालक, मालक व पालक संघ यांचे प्रबोधन करावे, सर्व वाहनधारकांनी आपली वाहने यांत्रिकदृष्टय़ा योग्य ठेवावी, वाहनांचे सर्व मूळ वैध कागदपत्रे वाहनासोबत ठेवावीत व तपासणी अधिकाऱ्यास तपासणीसाठी सादर करावीत, विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पुढे वा मागे ‘स्कूल बस’ असे ठळकपणे लिहावे, शाळेने भाडेतत्वावर बस घेतली असल्यास ‘ऑन स्कूल डय़ुटी’ असे ठळकपणे लिहावे, प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार व अग्नीशमन यंत्र उपलब्ध ठेवावे.
बसच्या खिडक्यांना जाळी लावावी, बसच्या दर्शनी भागावर शाळेचे नाव, दूरध्वनी क्रमांक ठळकपणे लिहावा, बस चालकाकडे किमान पाच वर्षाचा प्रत्यक्ष वाहन चालविण्याचा अनुभव व सार्वजनिक वाहन चालविण्याचा परवाना व बिल्ला असावा, चालकांव्यतिरिक्त बस चालविण्यास पात्र असलेली दुसरी व्यक्ती उपलब्ध असावी, शालेय दप्तर ठेवण्यासाठी सीटखाली पुरेशी जागा उपलब्ध असावी, बसमध्ये विद्याथ्यांच्या सुरक्षिततेसाठी गाइड शक्यतो शिक्षकच उपलब्ध असावा, असे आवाहन प्रश्नदेशिक परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.