Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

उस्मानाबादमध्ये दहा जणांना अटक
उस्मानाबाद, ७ जून/प्रतिनिधी

उस्मानाबाद शहरात तणाव निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा कार्यकर्त्यांना अटक करण्यात

 

आली आहे. तर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी १७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिवसभर सर्व व्यवहार ठप्प होते.
राजीनाम्याची मागणी
नवनिर्वाचित खासदार म्हणून निवडून आलेल्या खासदार पद्मसिंह पाटील यांचे नाव थेट हत्येच्या प्रकरणात असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
उमरगा येथे रास्ता रोको
पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी डॉ. पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने शनिवारी रात्री अटक केल्यानंतर तालुका शिवसेनेच्या वतीने रविवारी शिवसेना आमदार प्रश्न. रवींद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून खासदार पद्मसिंह पाटील व त्यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
कळंबमध्ये दगडफेक
पद्मसिंह पाटील यांना मुंबईच्या सी.बी.आय. पथकाने अटक केल्यानंतर आज कळंब तालुक्यातील शिराढोणजवळ अज्ञात जमावाने दोन बसेसवर दगडफेक केली.