Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

राज्य

राजकीय गुन्हेगारीचा धोका पाकिस्तानच्या दहशतवादापेक्षा भयंकर- अण्णा हजारे
ठेवी परत न मिळाल्यास जेलभरो आंदोलनाचा इशारा

नाशिक, ७ जून / प्रतिनिधी

वेगवेगळ्या बँका व पतसंस्थांमध्ये ठेवीदारांच्या एक हजार कोटी ठेवी अडकल्या असून त्या परत न मिळाल्यास एक ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देतांनाच बँका, पतसंस्था बुडण्यास राजकीय वरदहस्त कारणीभूत असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला. नाशिकसह सर्वत्र वाढणाऱ्या राजकीय गुन्हेगारीचा धोका पाकिस्तानच्या दहशतवादापेक्षा अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले.

क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांची वाहतूक न करण्याचे आवाहन
नाशिक, ७ जून / प्रतिनिधी

शैक्षणिक वर्षाला सुरूवात होत असताना प्रश्नदेशिक परिवहन विभागही दक्ष झाला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विभाग विशेष लक्ष ठेवून असून आसन क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये, असे आवाहन प्रश्नदेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचा गलथानपणा; आजपासून बेमुदत उपोषण
कर्जत, ७ जून/वार्ताहर

कर्जतमधील शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या गलथान कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि या रुग्णालयाच्या कारभारात त्वरित सुधारणा व्हावी, या मागणीसाठी सोमवार (८ जून) पासून कर्जतच्या टिळक चौकामध्ये बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय कर्जत तालुका मराठी पत्रकार संघ आणि कर्जतमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने घेण्यात आला.

तारापूर अणुऊर्जा केंद्रात आपत्कालीन यंत्रणेची चाचणी
पालघर, ७ जून/वार्ताहर

तारापूर अणुऊर्जा केंद्रात आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास त्या काळात त्या परिसरात व्यवस्थापन कसे करता येईल, यासंबंधीची रंगीत तालीम आज पहाटेपासून घेण्यात आली. अणुकेंद्रात उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत शेजारचे कंबोडे हे गाव प्रस्तावित झाल्याचे गृहीत धरून परिस्थिती हाताळण्यात यंत्रणा यशस्वी ठरल्याचे यावेळी सांगण्यात आले, तर या रंगीत तालमीदरम्यान ज्या काही त्रुटी-उणिवा राहिल्या, त्या दूर करण्याबरोबर काही आवश्यक सुधारणा करण्याच्या दृष्टीने पुढील काळात प्रयत्न केले जातील,

उद्योजकांच्या विकासासाठी प्रयत्न करणार- पी. वेलरासु
नाशिक, ७ जून / प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील उद्योजकांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पी. वेलरासु यांनी केले. येथील निमा हाऊसमध्ये आयोजित जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा व जिल्हा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी निमाचे अध्यक्ष रमेश वैश्य, एमआयडीसीचे प्रश्नदेशिक व्यवस्थापक आर. के. गावंडे, आयमाचे संदीप सोनार, महापालिकेचे उपायुक्त सतीश खडके, रमेश निमाणी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक डॉ. भास्कर पालवे हे प्रश्नमुख्याने उपस्थित होते. जिल्ह्य़ात विकासास प्रचंड वाव आहे. परंतु पाहिजे तसा विकास झालेला नाही. उद्योजकांनी उद्योग क्षेत्रात आपल्या कामगिरीची छाप पाडण्यासाठी सदैव प्रयत्न करावे, त्यासाठी जिल्हा व महानगरपालिका प्रशासन पाठीशी उभे असल्याचेही ते म्हणाले. यावेळी २००५, २००६-०७ या वर्षात लघु उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेले उद्योजक बी. जे. फेरवाणी, अरूण केळकर, प्रकाश वारी, संतोष मंडलेचा, अलका पाटील आणि मदन साकलाजी या उद्योजकांना वेलरासु यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी धनंजय बेळे यांनी आभार मानले.

बँकांना कर्ज वसुलीसाठी कठोर भूमिका घेण्याची गरज- खा. आनंद अडसूळ
नाशिकरोड, ७ जून / वार्ताहर

कर्ज वसुलीअभावी सहकारी बँका अडचणीत येत असल्यामुळे वसुलीसाठी वेळप्रसंगी साम, दाम, दंड, भेद यासारखी भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष खा. आनंद अडसूळ यांनी येथे केले. नाशिकरोड-देवळाली सहकारी व्यापारी बँकेतील कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीचा करार अडसूळ यांच्या उपस्थितीत झाला. स्पर्धेच्या युगात सेवा देण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी चांगली सेवा देण्याबरोबर मेळावे घ्यावेत, व्यवहार वाढवावेत, यासाठी संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी यापुढे प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशा प्रकारांनीच बँका जिवंत राहतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बँकेचे अध्यक्ष रामदास सदाफुले, माजी अध्यक्ष दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, अशोक सातभाई, जयंत दिंडे, राजन पाटील, स्थायी समितीचे सभापती संजय बागूल उपस्थित होते.

भारनियमन स्थगित झाल्याने ग्राहकांना दिलासा
संगमेश्वर, ७ जून/वार्ताहर

वाढता उष्मा व पाणीटंचाई, लांबलेला पाऊस यामुळे कोकणातील जनता त्रस्त झालेली असताना महावितरण कंपनीने गेले काही दिवस विजेचे भारनियमन स्थगित केल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दिवसातून दोन वेळा वेगवेगळ्या वेळी विजेचे भारनियमन केले जाते. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढल्यानंतर विजेचे भारनियमन त्रासदायक ठरत असते. मात्र महावितरण कंपनीने जिल्ह्यातील ग्राहकांना विजेचे भारनियमन स्थगित करून दिलासा दिला आहे.