Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

शेतीवाडी

सागरतीरावरची निसर्गाची नवलाई
तिवर, खारपुटी म्हणजे सागरतीरीचे सैन्यच. तिवराचेही काही प्रकार आहेत. लाल खारपुटी म्हणजे कांदळ. ही सर्व एकत्र कुटुंबात राहाणारी, फक्त कुळं वेगळी. हा दलदलीत वाढणारा. कारलिया तेवढा डोंगरावर, गोडय़ा मातीत राहातो. पण खरा तिवर खाऱ्या चिखलातच राहातो. सुरुंड हाही खाऱ्या, ओल्या, उष्ण कटिबंधात खाडय़ांच्या काठी, नदीमुखांच्या दुआबात राहातो. तेथेच वास्तव्य व तेथेच प्रजनन. ते याहीपेक्षा खाऱ्या पाण्याच्या भरती-ओहोटीच्या जमिनीतच जास्त दिसतात. ती बारा महिने हिरवीगार, काळवंडत नाहीत. शरीरातला रस बाहेर पाझरू नये म्हणून तो रस उत्क्रांतिचक्रात तीव्र करणे, श्वासोच्छवास व अन्ननिर्मितीत व्यत्यय न येण्यासाठी द्रव्यांची साठवण योग्य प्रमाणातच करण्याचं कसब यांच्या अंगी आहे, हे विशेष!

शेतक ऱ्यांच्या मारेक ऱ्यांचे रखवालदार कोण?
कत्तलखान्यात तरी थोडी दया दाखवली जात असेल? त्यापेक्षाही शेतकऱ्यांना जगणे असह्य़ करणारी यंत्रणा अस्तित्वात आहे. या यंत्रणेचे रक्षण करण्यात धन्यता मानणारा वर्ग सक्षम असल्यामुळे शेतकऱ्यांचे जिणे, ‘रोजचे मडे त्याला कोण रडे’ असे झाले आहे. ज्यांचा शेती व्यवसायाशी प्रत्यक्ष संबंध येत नाही अशा मंडळींना, शासन शेतकऱ्यांना प्रचंड सवलती देते, मतासाठी शासन चुकीचे पायंडे पाडत आहे असे वाटू शकते. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या नावावर लाभ मिळवणारे भलतेच असून शेतकऱ्याला मात्र दिवसेंदिवस पाण्यातील भोवऱ्यातल्या जागेतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेनासा झाला आहे.

शेतकरी आत्महत्या अमेरिकेतही!
गेल्या दशकाच्या अखेरच्या पर्वात आपल्या देशात लक्ष वेधणारे एक दुष्टचक्र सुरू झाले ते म्हणजे जगाला अन्न देणाऱ्या बळीराजाच्या आत्महत्यांचे. खरे तर आर्थिक उदारीकरणाचे धोरण सुरू झाले १९९० नतंर. त्याच काळापासून जगभर खुल्या व्यापाराचे धोरण स्वीकारले जाऊ लागले. एकेकाळाचे कट्टर वैर असलेले देशही परस्परांच्या बाजारपेठांसाठी प्रयत्न करू लागले. क्युबासारख्या देशावर प्रचंड आर्थिक र्निबध घालणाऱ्या अमेरिकेनेही नंतर हे र्निबध हटविण्यासाठी स्वत: च पावले उचलली. खऱ्या अर्थाने जग जवळ येऊ लागले. जागतिक व्यापार संघटनेच्या रूपाने अनेक देश एकमेकांच्या हातात हात घेऊ लागले. युरोपीय समुदायाने आपला एकगठ्ठा गट कायम केला व स्वत:चे स्वतंत्र चलन बाजारात आणले. अशा अनेक गोष्टी घडत असताना भारतानेही आपली दमदार पावले जगाच्या विकासाच्या वाटेने टाकली.

‘प्रक्रिया’ उद्योगातून स्थैर्याकडे
शेतीमध्ये आज प्रक्रिया व्यवसायाला मोठे महत्त्व प्रश्नप्त झाले आहे. शेतीमालाचे भाव वर्षभर सतत अनिश्चिततेत असतात. कधी खाली तर कधी वर असा त्याचा लंबक हेलकावत असतो. भाजीपाला व तत्सम पिकांबाबत हे चित्र कायम असते. शेतीमालास बाजारभाव अपेक्षेप्रमाणे चांगला मिळाला तर खर्चाचे गणित आणि नफ्याचे सूत्र साधले जाते, तसेच बाजारभाव कमी असेल वा कोसळल्यास पिकासाठी केलेला खर्चही वसूल होईल की नाही, याचीच भ्रांत! ही अनिश्चितताच शेतीतील गुंतवणूक व एकूणच शेतीव्यवसाय आतबट्टय़ातील आहे असे म्हणण्यास पूरक ठरत असते.

छतावर पाण्यातील शेती
पर्यावरण हानी व तापमानवाढीला तोंड देण्यासाठी हरतऱ्हेने जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहेत. दुसऱ्या बाजूला आजवरच्या अनेक कल्पनांना धक्का देत विज्ञानाच्या साहाय्याने वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. अनेक प्रयोगांची जन्मभूमी ठरलेल्या इस्रायलने मातीशिवाय शेतीचा प्रयोग यशस्वीही केलेला आहे. ऑस्ट्रेलियात बायोचारचा वापर करून कृत्रिम, पण कसदार माती तयार करण्याचा प्रयोग प्रगतिपथावर आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने पवनऊर्जा प्रकल्पातून वीजनिर्मिती व जंगल बचाव मोहीम हाती घेतली आहे. कार्बन व्यापार किंवा कार्बन रेशनिंग हेदेखील यातीलच उपाय. पण कृषी क्षेत्रामुळे ऊर्जेची मागणी व खर्च यांचा आलेख वेगाने खाली-वर होऊ शकतो. कारण हे क्षेत्र ऊर्जेच्या संदर्भात अधिक संवेदनशील आहे. उदाहरण घ्या, कॅलिफोर्नियाचे! प्रश्नंतामध्ये तयार होणाऱ्या विजेपैकी चार टक्के वीज सुमारे २०० अन्न व पदार्थाच्या पिकांचे उत्पादन, प्रक्रिया व साठवणुकीसाठी वापरली जाते. अन्नाचे उत्पादन, टिकाऊपणा व दर्जा यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचा कार्यक्षमतापूर्वक वापर किंवा बचतीची संधी मिळू शकते. यात कल्पना करायला हरकत नाही, की ऊर्जेचा परिणामकारक विनियोग, उच्च उत्पादन व वर्षभर भाज्यांचे उत्पादन शहरातील भागात बाजारपेठेनजीकच होते आहे. ही कल्पना आता न्यूयॉर्कसाठी फार लांब नाही. सप्टेंबर २००८ मध्ये तेथे स्थापन करण्यात आली गोथम ग्रीन्स फम्र्स ही कंपनी. या कंपनीचा जन्मच मुळी न्यूयॉर्क शहरातील व्यावसायिक तत्त्वावर इमारतीच्या टपावरील पाण्यात उत्पादन करावयाच्या शेतमालाच्या पहिल्या प्रकल्पासाठी झालेला आहे. जमेकामध्ये एकमजली इमारतीवर १२ हजार फुटांचे हे शेत आहे. ते आहे पाण्याचे. म्हणजे मातीशिवाय केवळ पाण्यात ही शेती करण्यात येणार आहे. छतावरील या शेतीमध्ये पिकवली जाणार आहेत ३० टन उत्तम दर्जाची फळे व भाजीपाला. न्यूयॉर्कमधील किरकोळ बाजारात व हॉटेल व्यावसायिकांसाठी ही जाती फळे व भाजीपाला अधिक किफायतशीर ठरणार आहे. या ऊर्जा बचतीच्या नावीन्यपूर्ण मार्गासह नियंत्रित पर्यावरणीय कृषी तंत्रज्ञानाचा पाया घातला जाणार आहे. या शेती प्रकल्पामध्ये फोटोव्होल्टिक उपकरणे वापरून ऊर्जेची गरज भागविली जाणार आहे. पीक काढणीच्या वेळी कार्बनचाही प्रश्न येणार नाही. हा ऊर्जा बचतीचा प्रयोग म्हणजे अफलातून असल्याचे मानले जाते. गोथम ग्रीन्स कंपनी कार्यक्षम ऊर्जावापर व शाश्वत शेती तंत्राच्या प्रश्नगतिक मार्गाचा वापर करणार आहे. ते आपल्या पिकांना सिंचन करणार आहेत ते साठवलेल्या पावसाच्या पाण्यातून. विजेचा कमीत कमी वापर करीत नैसर्गिक वायुवीजन, बाष्पीभवनातून शीतकरण, उच्च कार्यक्षमतेचे पंप व पंखे यांचा वापर यात करण्यात येणार आहे. या प्रयोगातील पर्यावरणाच्या लाभामध्ये जमीन व पाणी बचतीसह खते, कीडनाशकांचा वापर पूर्णपणे टाळण्याचा समावेश आहे. हरितगृह वायू विसर्जनाचा धोका यात नाहीच, पण अशा नव्या प्रकारची शहरी शेती करण्याची संकल्पना यातून अधिक जोमाने पुढे येऊ शकते, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
फिरस्ता