Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

काऊंटी क्रिकेट क्लबला जेतेपद
मुंबई, ७ जून/ क्री. प्र.

निखिल जाधव, ऐश्वर्य सुर्वे आणि धवल पांचाळच्या अचूक गोलंदाजीमुळे शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात डिप्लो स्पोर्टस् क्लबला काऊंटी क्रिकेट क्लबविरुद्ध ६ धावांनी पराभव

 

पत्करावा लागला आणि इरा घोष स्मृतिचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या १९ वर्षाखालील मुलांचे जेतेपद काऊंटी क्रिकेट क्लबने संपादले. यापूर्वी झालेल्या १४ वर्षाखालील गटात पालघर-डहाणू संघाने, तर १६ वर्षाखालील गटात स्पोर्टिग युनियन क्लबने बाजी मारली होती.
काऊंटी क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना अभिनव जगताप (२४), धवल पांचाळ (२१) आणि मिराज खान (२१) यांच्या उपयुक्त खेळींमुळे २० षटकांत ७ बाद ११६ धावा केल्या होत्या.
पण या धावांचा पाठलाग करणाऱ्या डिप्लोने जबरदस्त खेळ करीत सामन्याची रंगत शेवटपर्यंत ठेवली.
मात्र त्यांची शेवटची जोडी अपेक्षित लक्ष्य गाठण्यास सहा धावांनी अपयशी ठरली.
स्पर्धेतील उदयोन्मुख क्रिकेटपटूंचे दोन्ही पुरस्कार काऊंटीच्याच किसन घोष आणि अक्षय पावलेला मिळाले. तसेच मिराज खान सवरेत्कृष्ट अष्टपैलू ठरला.
डिप्लोचे सुमित घाडीगावकर (फलंदाज) आणि विशाल धनेरा (गोलंदाज) हेसुद्धा पुरस्कारांचे मानकरी ठरले.
संक्षिप्त धावफलक
काऊंटी क्रिकेट क्लब- २० षटकांत ७ बाद ११६ (अभिनव जगताप २४, धवल पांचाळ २१, मिराज खान २१, आशुतोष गोखले २६/ ३, विशाल धनेरा १९/३) विजयी विरुद्ध डिप्लो स्पोर्टस् क्लब- २० षटकांत ९ बाद ११० (निनाद कदम २५, आशुतोष गोखले २८, वीरेंद्र पांडे २१, निखिल जाधव १२/३, ऐश्वर्य सुर्वे १०/ ३, धवल पांचाळ १९ धावांत ३ बळी).