Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

विविध

कायदा आपले काम करील- शरद पवार
नवी दिल्ली, ७ जून/पीटीआय

काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या खून प्रकरणाच्या चौकशीत कायदा आपले काम करील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केली. निंबाळकर खून प्रकरणात राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने अटक केली आहे.खासदार पद्मसिंह पाटील यांच्या अटकेबाबत पवार यांनी पीटीआयला प्रतिक्रिया देताना सांगितले, की या प्रकरणात कायद्यानुसार चौकशी होईल. त्यात आपण प्रतिक्रिया देऊन कुठलाही हस्तक्षेप करणार नाही.