Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विकास कामांचा सपाटा
संजय राऊत

 

गोंदिया विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विकासाचा सपाटा लावला. नक्षलवाद ही या जिल्ह्य़ाला लागलेली कीड. यामुळे विकास कामात अडथळे येतात. पक्के रस्ते करण्यास नक्षलवाद्यांचा विरोध असतो. त्यावर आता काही प्रमाणात का होईना अंकुश लावण्यात प्रशासनाला यश लाभले आहे. आमदारांनी जिल्ह्य़ाला नक्षलवादग्रस्त घोषित करून शासकीय कर्मचाऱ्यांना १५ टक्के अतिरिक्त भत्ता शासनाकडून मंजूर करून घेतला. आमदार गोपालदास अग्रवाल यांनी गोंदिया जिल्ह्य़ाला रात्रीच्या भारनियमनापासून मुक्त केले. राज्य शासनातर्फे राबवली जाणारी ठक्कर बाप्पा योजना पूर्वी ठराविक ठिकाणीच होती पण, आमदार अग्रवाल यांनी संपूर्ण महाराष्ट्राकरिता ती अमलात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी गोंदिया बायपासकरिता केंद्र शासनाकडून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करवून आणला. शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ६३ कोटी रुपयांच्या अतिरिक्त पाणीपुरवठा योजनेला शासनाची मंजुरी मिळवली. केंद्र शासनाकडेही ही योजना पाठवली असून ती पूर्ण झाल्यानंतर गोंदिया शहराला २४ तास पाणी मिळणार आहे. आमदार अग्रवाल यांनी विधिमंडळात धानाला ९३० रुपये हमीभावासाठी प्रश्न लावून धरल्यावर हमीभाव घोषित करावा लागला.
आमदार अग्रवाल यांच्या पुढाकाराने रजेगाव काटी उपसा सिंचन योजनेच्या बांधकामाकरिता ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. धान पिकांच्या हानीकरिता शासनाकडून ४ हजार रुपये प्रती हेक्टर आर्थिक मदत मंजूर झाली. ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत जवाहर विहिरींचे वाटप करण्यात आले. बाघ जलसिंचन प्रकल्पातील जीर्ण कालव्यांच्या दुरुस्तीकरिता ३८.३० कोटी रुपये मंजूर झाले. विविध योजनेंतर्गत ५०० विंधन विहिरी पूर्ण, दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्ह्य़ाकरिता अतिरिक्त ४ कोटी मंजूर झाले. आर्थिकदृष्टय़ा मागास नागरिकांना नि:शुल्क विद्युत जोडणी, के.टी.एस. जिल्हा रुग्णालयाची जीर्ण इमारतीला सुसज्ज तसेच, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात अतिरिक्त कक्ष व रुग्णांच्या कुटुंबीयांकरिता धर्मशाळा व सुलभ शौचालय, पिंडकेपार सिंचन प्रकल्पांची वनकायद्यातून मुक्तता, नागरा-चांदनीटोला, कटंगटोला, दासगाव खुर्द, माकडी, कासा, बघोली, पांढराबोडी, किन्ही, पिंडकेपार पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली आहे.
विधानसभा मतदारसंघातील जातीय समीकरणात कुणबी, पोवार, मुस्लिम, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मतदारांची संख्या सारखीच आहे. शहरी क्षेत्रात सिंधी, मारवाडी, गुजराती, बंगाली, पंजाबी आदी अन्य जातींचेही मतदार आहेत पण, कोणत्याही जातीचे बाहुल्य नाही. नवीन परिसीमनात गोंदिया विधानसभा मतदारसंघाला गोरेगाव महसूल मंडळाशी जोडून प्रशासनिकदृष्टय़ा संतुलित करण्यात आले आहे. नवीन परिसीमनानुसार या मतदारसंघात गोंदिया, दासगाव, रावणवाडी, कामठा आदी महसूल मंडळांना जोडून एक विधानसभा मतदारसंघ बनवण्यात आला आहे.

मार्गी लागलेली कामे
*छत्तीसगढ वस्तीमध्ये समाज मंदिराचे बांधकाम
*६० महिन्याच्या काळात दोनशेवर समाज भवनांची निर्मिती
*कामठी मार्गावरील चौकात शहीद स्मारकाची निर्मिती
* अन्नपूर्णा योजनेंतर्गत ६५ वषार्ंवरील नागरिकांना
अन्नधान्य सवलती मिळवून दिल्या.
* नागरा-चांदनीटोला, कटंगटोला, दासगाव खुर्द, माकडी, कासा,
बघोली, पांढराबोडी, किन्ही, पिंडकेपार पाणीपुरवठा
योजनांना मंजुरी
*पिंडकेपार सिंचन प्रकल्पांची वनकायद्यातून मुक्तता
* बाघ जलसिंचन प्रकल्पातील जीर्ण कालव्यांची दुरुस्ती
* जेगाव काटी उपसा सिंचन योजनेचे बांधकाम
अपूर्ण राहिलेली कामे
* डांगोर्ली, तेढवा-शिवनी उपसा जलसिंचन योजना
*गोंदियातील उड्डाणपूल, कारंजा, र्मुी, ढाकणी, भागवतटोला
गोंदिया-तिरोडा राज्य मार्गापर्यंत बायपास
*शहरात शॉपिंग कॉम्लेक्स
*पार्किंग व्यवस्था, टाऊन हॉलचे काम,
*स्थानांतरण करणाऱ्या कुटुंबांचा प्रश्न,
*बेरोजगार बिडी कामगारांचे प्रश्न,
*शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालय,
*६३ कोटीची पाणीपुरवठा योजना.
मतदारसंघातील प्रमुख प्रश्न
धर्मदाय आयुक्त कार्यालय, जिल्हा नगर रचनाकार कार्यालय, श्रम न्यायालय, शहरातील खडतर सडक मार्ग, भूमिगत गटारी योजना, पाणीटंचाई, जयस्तंभ चौक बसस्टॅण्डची दुरावस्था, फक्त नावापुरता प्रवासी निवारा, शासकीय रुग्णालयातील अनास्था, क्षयरोग रुग्णालय बंद, प्राथमिक स्वास्थ केंद्राकडे दुर्लक्ष, नवीन उद्योगांची वानवा, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पार्किंग व्यवस्था, टाऊन हॉल.
वचननामा - अनुकंपा धारक, प्रकल्पग्रस्त आणि अंशकालिनांना नोकरीत समाविष्ट करण्याकरिता प्राधान्य, पालिकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याकरिता प्रयत्न, सुशिक्षित बेरोजगारांकरिता पोलीस भर्ती, नाटय़गृहाकरिता प्रयत्न, शहरातील भूमिगत गटारी मंजुरीकरिता प्रयत्न, नक्षलवादग्रस्त भागातील रावणवाडी येथे अतिरिक्त पोलीस ठाणे, कटंगी, कुडवा, पिंडकेपार, र्मुी, फुलचूर, कारंजा, नागराकरिता ६० कोटीच्या पाणी पुरवठा योजनेसाठी प्रयत्न, जिल्हा सत्र न्यायालयासाठी प्रयत्न, पांढराबोडी, बनाथर, आसोली, चुटिया, खमारी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरीकरिता प्रयत्न. गोंदियात जिल्हा क्रीडा संकुल तर, कामठा येथे तालुका क्रीडा संकुलासाठी प्रयत्न, जिल्ह्य़ातील मुस्लिम बांधवाच्या समाजभवनासाठी प्रयत्न, सतनामीनगर, संजयनगर, गौरीनगर, फुलचुर टोला व पिंडकेपारच्या नागरिकांना कायम जमिनीचे पट्टे मिळविण्याकरिता प्रयत्न.