Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

व्यापार-उद्योग

गरीबांसाठीच उलट जोरकसपणे उदारीकरण राबवायला हवे - डॉ. दीपा नारायण
व्यापार प्रतिनिधी: गरीबांना आर्थिक उत्कर्ष साधण्यासाठी पुरेशा आर्थिक संधी आणि बँका व वित्तीय संस्थांचे अर्थसाहाय्य आणि बाजारपेठेशी संलग्नता मिळायला हवी; एकापरीने भांडवलशाही व्यवस्था आजच्या काळात सर्वतोपरी याच वर्गासाठी उपकारक ठरेल; किंबहुना उदारीकरणाची प्रक्रिया त्यांच्यासाठीच अधिक जोरकसपणे राबवायला हवी, असे मत डॉ. दीपा नारायण यांनी व्यक्त केले. दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रश्नावर जागतिक बँकेच्या अध्यक्षांच्या वरिष्ठ सल्लागार म्हणून डॉ. नारायण कार्यरत असून, वर्ल्ड बँकेच्या आर्थिक साहाय्यातून त्यांनी लॅन्ट प्रिचेट आणि सौम्या कपूर यांच्या साथीने ‘मूव्हिंग आऊट ऑफ पॉवर्टी: सक्सेस फ्रॉम द बॉटम अप’ या जगभरात सुरू असलेल्या दारिद्र्य निर्मूलनांच्या प्रयत्नांचा वेध घेणाऱ्या ग्रंथाचे लेखन केले आहे.

ऊर्जाबचतीबाबत अमेरिकेच्या तुलनेत भारतात अधिक दक्षता
ईएफआय सर्वेक्षणाचा निष्कर्ष

व्यापार प्रतिनिधी: उत्तर अमेरिकेच्या तुलनेत भारतीय उद्योगजगतात एनर्जी एफिशिएन्सीसंबंधाने अधिक स्वारस्य दिसत असून, सर्व उद्योग क्षेत्रांमध्ये आणि व्यवस्थापन स्तरावर या गोष्टीच्या वाढत्या महत्वाला पाहता येईल. शिवाय एनर्जी एफिशिएन्सीचेलक्ष्य निश्चित करून गुंतवणुकीबाबत कटिबद्धता उत्तर अमेरिकेच्या तुलनेत भारतात अधिक आहे, अशी उल्लेखनीय निरीक्षणे जॉन्सन कन्ट्रोल्स इन्क. च्या क्लिंटन क्लायमेट इनिशिएटिव्हचे संचालक निर्देशक मनोज राठोड यांनी नोंदविली आहेत.

व्यापार संक्षिप्त

‘नाहर्स अमृत शक्ती’मधील फ्लॅटस्ची विक्री १५ दिवसांत पूर्ण

 


व्यापार प्रतिनिधी: ‘नाहर्स अमृत शक्ती ग्रुप’ने जॉनक्वील्ल आणि जमैका या दोन निवासी टॉवर्समधील ३२९ टू-बीचके फ्लॅटस्च्या विक्रीचा शुभारंभ केल्यानंतर ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि केवळ १५ दिवसांमध्ये हे सर्व फ्लॅटस् विकले गेले आहेत. या प्रतिसादापासून प्रेरणा घेत या समूहाने आणखी दोन टॉवरच्या उभारणीला सुरुवात केली असून ‘नाहर्स अमृत शक्ती’ मध्येच कॉम्पॅक्ट फ्लॅटस् बांधले जाणार आहेत. लॉरेल आणि लायलॅक या दोन विशेष निवासी टॉवर्सचा शुभारंभ करत असल्याची समूहाने घोषणा केली. या दोन्ही टॉवर्समध्ये प्रत्येकी १६० टू-बीएचके फ्लॅटस् असणार आहेत आणि त्यांचा आकार ९२४ चौरस फुटांपासून सुरू होतो. या फ्लॅटस्ची किंमत ५५ लाखांपासून सुरू होते आणि त्यात कार पार्किंगचाही समावेश आहे.

‘क्लिनिक ऑल क्लिअर’ नव्या रूपात
व्यापार प्रतिनिधी: हिंदुस्थान युनिलिव्हर या अँटी डॅनरफ शाम्पू ‘क्लिनिक ऑल क्लिअर’ आता क्लिअर शाम्पू म्हणून सादर करण्यात आला आहे. नवीन क्लिअर शाम्पूमध्ये उपयुक्त तेलासमवेत क्लिअर टेक सॉफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे केस अधिक मुलायम होण्यास मदत होते. असा कंपनीचा दावा आहे. क्लिअर अँटी डॅनरफ शाम्पूची किंमत २०० मिलीसाठी १३४ रु. व १०० मिलीसाठी ६० रु. आहे.

‘विनातारण कर्ज’ या विषयावर कार्यशाळा
व्यापार प्रतिनिधी: लघु व मध्यम उद्योग विकास चेंबर ऑफ इंडियाच्या वतीने ‘विनातारण कर्ज’ या विषयावर लघु व मध्यम उद्योजकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १३ जून रोजी दुपारी तीन ते सात या वेळेत ही कार्यशाळा ३, अप्पर ग्राऊंड मजला, समृद्धी व्हेंचर पार्क, सीप्झ जवळ, हॉटेल तुंगा पॅरेडाईजच्या पुढे, मरोळ एमआयडीसी, इंडस्ट्रियल एरिया, अंधेरी, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहिती आणि नोंदणीकरिता- ०२२-६१५०९८००, २८२५०४१५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

‘बँकांनी उत्पन्नवाढीसाठी नवीन स्रोतांचा अवलंब करावा’
व्यापार प्रतिनिधी: बँकांच्या ठेवी व कर्जावरील व्याजदर दिवसेंदिवस कमी होत जाणार असून, बँकेच्या उत्पन्नाचे स्रोत कायम राखण्यासाठी बँकांनी विम्यासारख्या बिनव्याजी उत्पन्न देणाऱ्या उपक्रमांवर भर देणे आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र बँकेच्या पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे उपसरव्यवस्थापक विलास आंबेकर यांनी व्यक्त केले. महाबँकेच्या सोमवार पेठ शाखेला सलग तिसऱ्या वर्षी ‘विमा बँक’ मानांकन मिळाल्याबद्दल आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे सोमवार पेठ शाखेने विमा क्षेत्रात उत्कृष्ट व्यवसाय करून हॅट्ट्रिक मिळवली आहे. अशा प्रकारची विमा व्यवसाय करणारी पुणे शहरातील ही एकमेव शाखा आहे, अशा शब्दांत आंबेकर यांनी सोमवार पेठ शाखेच्या कामगिरीचे कौतुक केले.

‘पुणे सराफ असोसिएशन’च्या सचिवपदी सौरभ गाडगीळ
व्यापार प्रतिनिधी: पुणे सराफ असोसिएशनच्या सचिवपदी, ‘पीएनजी’चे भागीदार सौरभ गाडगीळ यांची नुकतीच एकमताने निवड झाली. सोन्याच्या बाजारपेठेबद्दल त्यांचा असलेला अभ्यास आणि अनुभव यामुळे त्यांची निवड झाली आहे. पुणे सराफ असोसिएशनची स्थापना १९३९ मध्ये झाली असून संस्थेच्या इतिहासात तरुण व्यक्तीची या पदावर निवड होण्याची पहिलीच वेळ आहे. सौरभ गाडगीळ १९९९ पासून ‘पीएनजी’मध्ये कार्यरत आहेत.

कामधेनू पीव्हीसी पाईपच्या उत्पादनास सोलापुरात प्रश्नरंभ
व्यापार प्रतिनिधी: पीव्हीसी पाईपच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या कामधेनू स्टील कंपनीच्या उत्पादनास सोलापुरात चिंचोळी एमआयडीसीमध्ये लिंगे उद्योग समूहाच्या माध्यमातून प्रश्नरंभ झाल्याची घोषणा कंपनीचे अध्यक्ष पंकज अग्रवाल यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
दरमहा १५० टन पीव्हीसी पाईपचे उत्पादन होणाऱ्या या प्रकल्पासाठी सुरुवातीला पाच कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून, येत्या काही दिवसांत ही गुंतवणूक १० कोटींपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे लिंगे उद्योग समूहाचे प्रमुख शंकरराव लिंगे यांनी या वेळी बोलताना सांगितले, तसेच २०११ पर्यंत २०० कोटींची गुंतवणूक करून या प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. चिंचोळी एमआयडीसीमध्ये बंद पडलेला ऋषी मायक्रोन हा कारखाना ताब्यात घेऊन पीव्हीसी पाईप उत्पादनाचा प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे सांगताना लिंगे पुढे म्हणाले की, या प्रकल्पात आगामी काळात दरमहा तीनशे टनापर्यंत उत्पादन वाढविण्यात येणार आहे. या उद्योगावर सुमारे एक हजार तरुणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. कामधेनू स्टील कंपनीकडून लिंगे उद्योग समूहास सोलापूरपासून पाचशे किलोमीटर अंतरापर्यंत म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटक व गोव्यापर्यंत उत्पादनांचा पुरवठा करता येऊ शकेल. या प्रकल्पात २० मि.मी.पासून ते २०० मि.मी.पर्यंत पीव्हीसी पाईपसह एचडीपी पाईप, स्प्रिंक्लर पाईप, ड्रिप आदी उत्पादने घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस कामधेनूचे सरव्यवस्थापक भास्कर चौधरी, जयदीप लिंगे, रत्नाकर बँकेचे शाखाधिकारी प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

मोबाईल फोनच्या माध्यमातून विमा सेवा
व्यापार प्रतिनिधी : विमा नियामक ‘आयआरडीए’ने एप्रिल ते डिसेंबर २००८ वर्षासाठी जाहीर केलेल्या अ-लेखापरिक्षित आकडेवारीनुसार आयसीआयसीाय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स विमा कंपनी आरोग्यविमा सेवा क्षेत्रात देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी आहे. या कंपनीने प्रथमच देशात मोबाईल वाणिज्य सेवा माध्यमातून आपल्या ग्राहकांना विमा पॉलिसी खरेदी व पॉलिसी नूतनीकरण सेवा देण्याची सोय उपलब्ध केली आहे. ही सेवा अत्यंत सोपी, सुलभ व सुरक्षित आहे. या सेवेअंतर्गत लोक उत्पादन निवडून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून हप्ता (प्रीमियम) भरून तात्काळ विमा पॉलिसी उतरवू शकतात. यासाठी कोणत्याही प्रकारचे कागदोपत्री लिखापढीचे काम करण्याची गरज भासत नाही. ग्राहक जेव्हा प्रवास करीत असतात किंवा ते परदेशी असतात तेव्हा त्यांना तात्काळ व सुरक्षित व्यवहार सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीने मोबाईल वाणिज्य सेवेअंतर्गत ही सेवा उपलब्ध केली आहे. ही सेवा उपलब्ध करून ग्राहक आपल्या विमा पॉलिसीचे नूतनीकरण करू शकतात तसेच नवी पॉलिसीसुद्धा खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे पॉलिसीवरील दाव्याची (क्लेम) मागणीसुद्धा करू शकतात. ही सेवा १८०० २०९८८८८ या टोल फ्री क्रमांकावर अहोरात्र म्हणजेच २४x७ तत्त्वावर उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे जगातील कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही क्षणी ही सेवा उपलब्ध करणे ग्राहकांस शक्य आहे.