Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

मंदिरांच्या दुरवस्थेप्रकरणी कोल्हापुरात धरणे
कोल्हापूर, ९ जून / विशेष प्रतिनिधी

 

मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिर परिसरातील रामाच्या मंदिरासह सभोताली असलेल्या अन्य प्राचीन मंदिरांच्या दुरवस्थेची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी या मागणीसाठी मंगळवारी हिंदूू युवा प्रतिष्ठानच्या वतीने मंदिरासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष अशोक देसाई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनानंतर लक्ष न घातल्यास आंदोलन उग्र करण्याचा इशारा देण्यात आला.
मिरजकर तिकटी येथे प्राचीन शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले राममंदिराची दुरावस्था होत आहे. या मंदिरात रामाची मूर्ती संपूर्ण वालूकाश्माची असून सीतेला मांडीवर घेतलेल्या स्वरूपातील अत्यंत दुर्मिळ आणि वैशिष्टय़पूर्ण अशी आहे. या मंदिराची गेल्या दोन वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात पडझड सुरू आहे. ही पडझड रोखण्यासाठी आंदोलक सातत्यानेआवाज उठवत आहेत.
या मंदिराखेरीज शेजारी असलेल्या विठ्ठल मंदिर व महादेव मंदिराचीही अवस्था अशीच कांहीशी आहे. या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.
आंदोलनात दीपक मगदूम, संजय साडवीलकर, केरबा जाधव, बाजीराव पाटील, गणेश मोरे, किरण पाटील, उदय जाधव, रणजित काटकर सहभागी झाले होते.
हिंदूुत्ववादी संघटनांची निदर्शन
मालेगाव बाँबस्फोटातील संशयीत आरोपी साध्वी प्रज्ञासिंग यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात विलंब लावणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी हिंदूुत्ववादी संघटनांच्या वतीने शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. या निदर्शनामध्ये हिंदूू एकता, बजरंग दल, हिंदूू जनजागृती,भाजप, हिंदूू महासभा आदी संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. साध्वी प्रज्ञासिंग यांना सध्या मणक्याच्या विकाराने त्रस्त असून उपचारांसाठी त्यांना मुंबईतील जे.जे.इस्पितळात आणण्यात आले होते. पण तेथे त्यांना उपचारांअभावी १८ तास ताटकळत ठेवण्यात आले होते. प्रज्ञासिंग यांना दवाखान्यात आणले होते तेव्हा तेथे अजमल कसाब या अतिरेक्यालाही आणले होते. पण त्याला एखाद्या मंत्र्यासारखी वागणूक दिली जात होती. याबद्दल हिंदूुत्ववादी संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. अतिरेक्यांचे लाड आणि साध्वी प्रज्ञासिंग यांच्यावर अत्याचार जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी हिंदूुत्ववादी संघटनांच्या वतीने शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य आणि केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. श्रीकांत पौंडकर, आण्णा पोतदार, हिंदूुराव शेळके, देवेंद्र रासकर, दिलीप दिवटे, विक्रम चौगुले, शिवानंद स्वामी, संभाजी साळोखे, सुरेश चव्हाण, मधुकर नाझरे, सुनील चौगुले आदी उपस्थित होते.