Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘पालखी मार्ग सुधारण्यासाठी शासनाकडे १५ कोटींची मागणी’
फलटण, ९ जून / वार्ताहर

 

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आगमनाच्या पाश्र्वभूमीवर सातारा जिल्ह्य़ातल पालखी मार्ग व पालखी तळांची सुधारणा करण्यासंदर्भात शासकीय यंत्रणेमार्फत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे १५ कोटी १३ लाख रुपयांचे प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी बी. एस. पऱ्हाड यांनी दिली.
लोणंद पालखी तळाची सुधारणा करणे, पालखी तळावर काँक्रीट करणे व पोहोच रस्त्याची सुधारणा करणे यासाठी ३ लाख, लोणंद पाणीपुरवठा विभागाकडे जाणाऱ्या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी (४८० मी.) १५ लाख ७६ हजार, बरड (ता.फलटण) पालखी तळाची सुधारणा करणे व पालखी तळावर खडीकरण करण्यासाठी ३ लाख, लोणंद ते फलटण या २७ कि.मी. पालखी मार्गाची सुधारणा करणे, १० मीटरने रुंदीकरण करणे व २१ मोऱ्या बांधण्यासाठी १२ कोटी, लोणंद गावांतर्गत रस्ते डांबरीकरण करणे (२५० लांबीत खडीकरण व डांबरीकरण व १०२५ लांबीत बीबीएम कारपेट करणे) यासाठी १५ लाख, लोणंद येथे स्नानगृह बांधणे ४ लाख ७५ हजार, लोणंद येथे पालखीशेजारील नाल्यावर संरक्षक भिंत बांधणे २७ लाख ६२ हजार, खंडाळा-लोणंद रस्त्यावरील ते पाडळी लिंबाजी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे २१ लाख ३३ हजार, लोणंद- शिरवळनाका ते पिंपरे खडीकाम, डांबरीकरण करणे ६७ लाख ८७ हजार, तरडगाव (ता.फलटण) येथील पालखी तळावर न्हाणीघर कठडा बांधणे १ लाख, तरडगाव येथील पालखी मार्गावरील कॉजवेची सुधारणा करणे १५ लाख, तरडगाव
येथील पालखी मार्गावर काँक्रीट गटर्स बांधणे व रस्ते रुंदीकरण करणे (एस.टी. स्टँड ते सावता माळी मंदिर व तरडगाव अंतर्गत रस्ते) १५ लाख, बरड येथे पालखी मार्गावर काँक्रीट गटर्स व स्नानगृह बांधणे ८ लाख ४० हजार, बरड येथे पालखी मार्गाची सुधारणा करणे १५ लाख, बरड येथे पालखी मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण करणे १५ लाख, बरड पालखी तळावर
नळ पाणीपुरवठा योजना करणे ६४ लाख असा १५ कोटी १३ लाखांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.