Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सतराजण यशस्वी
सांगली, ९ जून / प्रतिनिधी

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत सांगली जिल्हय़ातील १७ जणांनी यश संपादन केले आहे. त्यात दहाजणांची वर्ग एक अधिकारी व सातजणांची वर्ग दोन अधिकारी म्हणून निवड झाली आहे. येथील कर्मवीर प्रबोधिनीच्या श्रीमती शर्मिला घारगे-वालावलकर या राज्यात अठराव्या आल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दि. २ सप्टेंबर २००७ ला पूर्व परीक्षा, दि. १४ जून २००८ ला मुख्य परीक्षा व एप्रिल २००९ मध्ये मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आला. आष्टा येथील नेताजी प्रबोधिनीच्या तब्बल १२ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविले आहे. त्यात श्रीमती शर्मिला घारगे-वालावलकर, सुदर्शना पाटील, जे. पी. जाधव व जितेंद्र जाधव यांची पोलीस उपअधीक्षकपदी, अभिजित बापट व विनायक औंधकर यांची मुख्याधिकारी, चंचल पाटील, मनीषा मिरजकर व दीप्ती पाटील यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अर्चना कापसे यांची गटविकास अधिकारी, बाबूराव महामुनी, हणमंत म्हेत्रे, श्रीमती सुजाता म्हेत्रे व शारदा पाटील यांची तहसीलदार, प्रवीण लोकरे, अमर प्रसाद व सरस्वती पाटील यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे.