Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

सर्व लक्ष आमदार जेथलिया यांच्या भूमिकेकडे!
पुनर्रचनेनंतर जालना जिल्ह्य़ातील परतूर विधानसभा मतदारसंघातील पूर्वीची गावे कायम राहिली असून बदनापूर विधानसभा मतदारसंघातील नेर महसूल मंडलातील गावे मात्र नव्याने जोडली गेली आहेत. भारतीय जनता पक्षाचे आमदार बबन लोणीकर मागील दोन निवडणुकांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. १९९५ मध्ये बबन लोणीकर यांचा या मतदारसंघातून जवळपास सव्वाबाराशे मतांनी काँग्रेसकडून पराभव झाला होता. परंतु पुढच्याच म्हणजे १९९९ मधील निवडणुकीत लोणीकर झालेल्या मतदानापैकी ४५ टक्के मते घेऊन विजयी झाले. २००४ मध्ये शिवसेनेचा बंडखोर उमेदवार असतानाही लोणीकर पुन्हा निवडून आले.

इच्छुकांची भाऊगर्दी!
जालना जिल्ह्य़ातील बदनापूर विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अनुसूचित जातींसाठी राखीव झाला असून त्याच्या भौगोलिक रचनेतही मोठा बदल झाला आहे. पूर्वीचा बदनापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या प्रभावाखाली होता. २००४ मध्ये राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार अरविंद चव्हाण या मतदारसंघातून निवडून आले. त्यापूर्वी १९९०, १९९५ आणि १९९९ मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार नारायण चव्हाण निवडून आले. २००४ मधील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार भानुदास घुगे यांचा पराभव झाला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र शिवसेनेचाच प्रभाव राहिला.

काँग्रेस आघाडीच्या मदतीने सेनेचा भाजपला ‘देधक्का’!
बदलापूर, ९ जून/वार्ताहर

नगरपालिकेत शिवसेना-भाजप यांची युती असतानाही आज झालेल्या शिक्षण मंडळाच्या सभापती-उपसभापती निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसह आघाडी करत भाजपाला धक्का देत सभापती पद पटकावले आहे. नगराध्यक्ष राम पातकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण मंडळाच्या सभापती-उपसभापती पदासाठी आज निवडणूक झाली. संजय भोईर यांनी भाजपतर्फे तर शिवसेनेतर्फे विजय मांडवकर यांनी स्वबळावर निवडणूक लढविली. या निवडणुकीत १३ सदस्यांपैकी शिवसेनेच्या मांडवकर यांना आठ तर भाजपच्या भोईर यांना पाच मते मिळाली.

नक्षलवाद व दहशतवाद अजिबात खपवून घेतला जाणार नाही
मंदी व दहशतवादाचे आव्हान असूनही ८-९ टक्क्यांचा विकास दर शक्य - मनमोहन सिंग
नवी दिल्ली, ९ जून/खास प्रतिनिधी
जागतिक मंदी आणि दहशतवाद अशा दुहेरी विळख्यात देशाची अर्थव्यवस्था सापडली असताना प्रतिकूल परिस्थितीतही सामूहिक इच्छाशक्तीच्या जोरावर भारत ८ ते ९ टक्के आर्थिक विकासाचा दर सहज गाठू शकतो, असा विश्वास आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रस्तावाच्या चर्चेला संसदेच्या उभय सभागृहांमध्ये उत्तर देताना विकासाच्या प्रक्रियेत मोठा अडसर ठरलेल्या दहशतवाद आणि नक्षलवाद मोडून काढण्याचा दृढसंकल्प मनमोहन सिंग यांनी केला.

सारे कसे ‘शांत.. शांत’ !
सत्तासंग्राम ०९

लोकसभा निवडणुकांनंतर सर्व देशातील राजकीय परिस्थिती तशी शांत आहे. काँग्रेसला मिळालेल्या २०६ जागा व युपीएकडे ३०० च्या आसपास असलेले पाठबळ यामुळे आता पुढील पाच वर्षे तरी केंद्रात फारशी हालचाल होणार नाही. मात्र देशातील लोकसभेच्या जागांच्या अनुषंगाने दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मात्र वरून शांत वाटत असले तरीही सर्वाधिक राजकीय अशांतता धुमसते आहे ती इथल्याच मातीत. येत्या एक दोन महिन्यात महाराष्ट्राच्या सारीपाटावर जो अबीर - गुलाल उधळला जाणार आहे, त्यातून राज्यातील जनतेला अनेक गमतीजमती पहायला मिळणार आहेत.

मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधकांचा अर्थसंकल्पावरील चर्चेवर बहिष्कार
मुंबई, ९ जून/प्रतिनिधी

अर्थमंत्री, अर्थराज्यमंत्री तसेच अधिकारी यांच्या अनुपस्थितीमुळे संतप्त झालेल्या शिवसेना-भाजपच्या सदस्यांनी अर्थमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची दिलगिरी धुडकावून लावत विधान परिषदेत आज अर्थसंकल्पावरील चर्चेवर बहिष्कार घातला. तत्पूर्वी वेगवेगळ्या खात्यांचे पाच मंत्री अनुपस्थित असल्याने संतापाचा पारा चढलेल्या विरोधी पक्षांची संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनाही दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. मंत्र्यांच्या ‘दांडी’मुळे विधान परिषदेचे कामकाज दिवसभरात चारवेळा तहकूब करण्यात आले.