Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९


रंग जुळवू पर्यावरणाशी.. प्रदूषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल कितीही चर्चा केली तरी अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. किमान निसर्गातील सौंदर्याकडे पाहून तरी आपण पर्यावरणाची काळजी घेण्याच्या दृष्टीने अधिक प्रयत्न करू, याच विश्वासातून हिंदुजा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मुलांनी ‘क्लीन अ‍ॅण्ड ग्रीन मुंबई’चा संदेश जनसामांन्यांमध्ये पोहोचविण्यासाठी इमारतीच्या कंपाऊंडवर निसर्गसौंदर्य चितारले. छाया : वसंत प्रभू

अ‍ॅड‘मिशन’
मॅनेजमेंट कोटय़ाचे दर भडकले!
११ वी, १३ वीच्या प्रवेशाची मागणी वाढली

प्रतिनिधी

वैद्यकीय, अभियांत्रिकी या अभ्यासक्रमांच्या मॅनेजमेंट कोटय़ातील प्रवेशासाठी चालणारा घोडेबाजार आता अधिक व्यापक झाला असून यंदा ११ वी व १३ वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्येही त्याचा शिरकाव झाला आहे. ११ वी व १३ वीसाठी ‘मॅनेजमेंट कोटय़ा’चे दर यंदा प्रथमच एक लाखाच्या पुढे जाणार आहेत. विशेष म्हणजे, ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा विपरित परिणाम होऊन ११ वीच्या मॅनेजमेंट कोटय़ाचे दर मोठय़ा प्रमाणात भडकणार असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.

‘बीएमएम’मध्ये मराठीला हिंदीचा पर्याय
मराठीप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पुन्हा एकदा आंदोलन होणार

प्रतिनिधी

परराज्यातून मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकणे शक्य होणार नाही, असे कारण पुढे करून ‘बॅचलर ऑफ मास मीडिया’ (बीएमएम) या इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रमात मुंबई विद्यापीठाने मराठीला हिंदीचा पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयावर ज्येष्ठ पत्रकार, विद्यार्थी संघटना व अधिसभा सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

विदेशी नागरिकांच्या सेवेत ‘कुटुंबसखी’!
प्रश्नजक्ता कदम

गेली अनेक वर्षे खवय्यांना अस्सल मराठमोळ्या आणि घरगुती पदार्थाचा आस्वाद घडविणारी ‘कुटुंबसखी’ आता परदेशी नागरिकांची भूक भागविण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या आठवडय़ापासून ‘कुटुंबसखी’ने आपला मुक्काम थेट अमेरिकन सेंटरमध्ये ठोकला असून सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच निरनिराळ्या बैठकांच्या निमित्ताने जगभरातून अमेरिकन सेंटरमध्ये येणाऱ्या परदेशी नागरिकांना ‘कुटुंबसखी’ मराठी खाद्यपदार्थाचा आस्वाद घडवित आहे. ‘सखी’ची ही भरारी नक्कीच उल्लेखनीय आहे.

माहितीचा अधिकार कायदा अधिक कडक करण्याची मागणी
प्रतिनिधी

पळवाटा काढण्यात पटाईत असलेल्या नोकरशाहीतील कारकुनी करामतींमुळे माहितीचा अधिकार या कायद्याची सध्या थट्टा सुरू असून, तो परिणामशून्य व निष्प्रभ बनत चालला आहे. त्यामुळे त्यात तातडीने सुधारणा करून तो अधिक कडक करावा किंवा त्याला कायमची जलसमाधी तरी द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन भाजपचे माजी राष्ट्रीय सदस्य ओमप्रकाश शर्मा यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठविले आहे. देशात सुमारे १६ लाख, तर राज्यात आत्तापर्यंत सव्वा दोन लाखाहून अधिक अर्ज वर्षानुवर्षे प्रलंबित असून, ही माहितीचा अधिकार या कायद्याची क्रूर थट्टा असल्याचे त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रजासत्ताक भारताच्या ५६ वर्षांनंतर नागरिकांना कायद्याने मिळालेल्या या अधिकाराची धार कारकुनी करामतींमुळे पायमल्ली होऊन अधिकाअधिक बोथट बनत आहे. कोटय़वधींच्या भ्रष्टाचारात अडकलेले अधिकारी एकतर उत्तरेच देत नाहीत किंवा चुकीची उत्तरे देतात. त्यावर अपिलात गेल्यास दोन-दोन वर्षे उत्तरही मिळत नाही. एवढे करून प्रकरणाची माहिती आयुक्तांकडे सुनावणी झालीच तर संबंधित अधिकाऱ्याला २५ हजारांचा दंड होतो. कोटय़वधींच्या भ्रष्टाचाराची माहिती दडविणारे अधिकारी ही किरकोळ दंडाची रक्कम भरून मोकळे होतात. त्यामुळे कायदा परिणामकारक करायचा असेल तर खोटी माहिती वा माहितीच न देणाऱ्या कर्मचारी वा अधिकाऱ्याला निलंबन अथवा बडतर्फीची शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात करावी, अशी शर्मा यांनी मागणी केली आहे.

दशरथ लोखंडे यांचे निधन
प्रतिनिधी

‘मुंबई मिरर’ या इंग्रजी वृत्तपत्राचे महानगर संपादक दीपक लोखंडे यांचे वडील दशरथ लोखंडे यांचे सोमवारी वृद्धपकाळामुळे निधन झाले. ते ७० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी हिरावती, दीपक , मिलिंद आणि प्रकाश हे तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. कामगार क्षेत्रातील चळवळींमध्ये सक्रिय सहभागी असलेल्या दशरथ लोखंडे यांचे बोरिवली येथील चिकुवाडीतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. मंगळवारी बाभई नाका येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.