Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

विधानसभा निवडणुकीसाठी समता परिषद सज्ज
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकीत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा विशेषत नागपूर, रामटेक आणि भंडारा-गोंदियात जोरदार प्रचार केला. यामुळे कार्यकर्त्यांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज रहावे, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे विदर्भ अध्यक्ष किशोर कन्हेरे यांनी केले.
विदर्भातील विभागीय प्रमुख आणि पदाधिकारी कन्हेरे यांच्या अध्यक्षतेखाली रविभवनात अलीकडेच बैठक झाली. यात परिषदेच्या कामाचा आणि निवडणुकीत कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना कन्हेरे म्हणाले, येत्या निवडणुकीसाठी सर्व जिल्ह्य़ात अधिकाधिक मतदारांची नावे मतदार यादीत नोंदवावी, तसेच त्रुटी दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
याप्रसंगी परिषदेचे तरुण नेते समीर भुजबळ, केंद्रीय मंत्रीद्वय प्रफुल्ल पटेल व मुकुल वासनिक आणि विलास मुत्तेमवार यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच समीर भुजबळ यांचा नागरी सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. किशोर कन्हेरे यांना विधानसभेत उमेदवारी देण्यात यावी, असा ठराव संमत करण्यात आला. यावेळी शहर अध्यक्ष श्याम चौधरी, प्रा. दिवाकर गमे, निलिमा कोरडे, भीमराव बनसोड, एजाज खान, प्रा. एस.के. सिंह व्यासपीठावर उपस्थित होते. बैठकीला प्रा. सुरेंद्र आर्य, दशरथ तालेवार, भुजंगराव काटरपवार, अरविंद लोखंडे, ऋषी कारोंडे, विनोद शेवारे, नरेंद्र आगलावे, निलेश नौकरकर, सुरेश गजभिये, अलका कांबळे, वंदना लांडगे, तमिजा शेख, रमेश गिरडकर, प्रभाकर अंजनकर, जीवन गायकवाड, विजय नाडेकर, राजू रंगारी, शैलेश मानकर, शाहिस्तेखान पठाण, संतोष भेदे, विलास मुळे, माधुरी रंगारी, रंगराव गेचोडे आणि हिरालाल रंगारी आदी उपस्थित होते.