Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

स्पर्धा परीक्षांसाठी सातत्य गरजेचे -प्रा. नाथे
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

 

स्पध्रेत यश मिळवण्यासाठी उमेदवारांमध्ये सातत्या आवश्यक असते. अलीकडे विदर्भातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेकडे कल वाढत आहे, ही समाधानाची बाब आहे, असे प्रतिपादन नाथे करिअर अकादमीचे संचालक प्रा. संजय नाथे यांनी केले. आदिम यूथ फाउंडेशनद्वारा आयोजित दहावी, बारावी, पदवीनंतर करिअरच्या संधी या विषयावर ते बोलत होते.
एमपीएससी, युपीएससी, रेल्वे भरती बोर्ड, बँक, स्टाफ सिलेक्शन कमिशन, जिल्हा निवड मंडळ दरवर्षी स्पर्धा परीक्षेमार्फत हजारो कर्मचाऱ्यांची भरती करत असतात.
प्रशासनातील सर्वोच्च दर्जाची पदे एमपीएससी व युपीएससीद्वारे भरली जातात. यासाठी किमान पात्रता असावी लागते. प्रशासकीय पदे मिळवण्यासाठी पदवीच्या प्रथम वर्षांपासून योग्य दिशेने प्रयत्न केल्यास जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार ही पदे मिळवणे फारसे अवघड जात नाही, असे यावेळी प्रा. नाथे म्हणाले. अलीकडेच आयएएसची परीक्षा उत्तीर्ण झालेले डॉ. संदीप राठोड यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. विदर्भातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेविषयी पूर्वग्रह न बाळगता मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. राठोड यांनी केले. एमपीएससी परिक्षेत नागपूर केंद्रातून प्रथम आलेल्या व उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेल्या हरिश धार्मिक यांनी स्पर्धा परिक्षांची तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी एनएफसीसीचे प्रमुख प्रा. निलेश निमजे, प्रा. हेडाऊ यांनी करिअरच्या संधीविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक वाघ व संचालन आदिम यूथ फाउंडेशनचे सचिव ओमप्रकाश पाठराबे यांनी केले.