Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या कुटुंबाला मासिकाच्या वर्गणीत सूट
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

 

पर्यावरण संवर्धनाचा कार्यक्रम राबवणाऱ्या कुटुंबाला मासिकाच्या वार्षिक वर्गणीत अध्र्या किमतीची सूट देण्यात येणार आहे. ३६० रूपये वार्षिक वर्गणीत सूट देऊन त्यांना केवळ १८० रुपये द्यावे लागणार आहेत.
‘बेस्ट हेल्थ फॉर यू’ आरोग्य साक्षरता उपक्रम राबवणाऱ्या आरोग्यविषयक मासिकातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘पर्यावरण मित्र’ हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात येत आहे.
ज्यांच्या अंगणात एखादे मोठे झाड असेल अथवा पावसाचे पाणी जिरवण्याची सोय केलेली असेल, कचऱ्याची विल्हेवाट लावून खत निर्माण करून पर्यावरण संवर्धन करीत असेल त्यांना पॅथॉलॉजी, सिटी स्कॅन, ब्लड बँक, ऑपरेशन तसेच आरोग्यविषयक सामग्रीवर १५ ते २५ टक्के सूट मिळणार आहे. ही योजना ५ ते ३० जूनपर्यंत राबवण्यात येत आहे. मानव व पर्यावरण यातील समतोल म्हणजेच आरोग्य. हा समतोल बिघडला म्हणजे रोग निर्माण होतात. पर्यावरणाचा मानवी आरोग्याशी अतिशय जवळचा संबंध आहे म्हणूनच जागतिक पर्यावरण दिन हा आरोग्यदिन म्हणूनही साजरा व्हायला पाहिजे. याविषयी अधिक माहितीकरता ९४२२११३९८८, ६४५८३८८ यावर संपर्क साधण्याचे आवाहन ‘बेस्ट हेल्थ फॉर यू’ या मासिकातर्फे करण्यात आले आहे.