Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

नागपूर जिल्ह्य़ात आजपासून तंटामुक्त गावांचे मूल्यमापन
हिंगणा, ९ जून / वार्ताहर

 

नागपूर जिल्ह्य़ात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत तालुकास्तरीय मूल्यमापन समित्या स्थापन करण्यात आल्या असून या समित्या गाव तंटामुक्त समितीच्या कार्याचे मूल्यमापन १० ते २५ जूनदरम्यान करणार आहेत. तहसीलदार समितीचे अध्यक्ष असून पंचायत समितीचे सभापती, पोलीस निरीक्षक, विधि अधिकारी व पत्रकार हे समिती सदस्य म्हणून काम पाहतील.
जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत स्थापन झालेल्या तेरा तालुकास्तरीय मूल्यमापन समितीची कार्यशाळा व प्रशिक्षण नुकताच पार पडले. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी प्रवीण दराडे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामीण पोलीस अधीक्षक सी.एच. वाकडे उपस्थित होते.
तंटामुक्त गाव जाहीर करण्यासाठी स्थानिक समितीने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेकरता एकूण २०० गुणांचे मूल्यमापन होणार असून यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ८० गुण, दाखल तंटे मिटवणे १०० गुण, नव्याने निर्माण होणारे तंटे मिटवण्यासाठी २० गुण, निश्चित केले असून यासाठी अनुक्रमे ५६, ७०, १४ असे किमान १४० गुण प्राप्त करणे आवश्यक असले तरी तंटामुक्त पात्रतेसाठी एकत्रित १५० गुण मिळवणे आवश्यक राहील. एखाद्या गावात दाखल तंटेच नसतील किंवा नव्याने तंटे निर्माण झालेच नाहीत तर त्या गावाला तंटय़ाच्या प्रकारातील पात्रतेसाठी आवश्यक किमान गुण दिले जातील. तसेच १९० गुण मिळवणाऱ्या गावाची विशेष पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणार आहे. तंटामुक्त झालेल्या सर्व गावांना त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर शासनाच्या वतीने रोख रकमेचा पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल. एक हजार लोकसंख्येपर्यंत एक लाख, दोन हजार लोकसंख्येपर्यंत २ लाख, तीन हजारांपर्यंत लोकसंख्या असेल तर तीन लाख पाच हजार व दहा हजार लोकसंख्या असणाऱ्या गावांना अनुक्रमे पाच आणि दहा लाख पुरस्काराची रक्कम मिळणार आहे.
कार्यशाळेत जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, जिल्हा पोलीस अधीक्षक वाकडे यांनी मार्गदर्शन करून समिती सदस्यांच्या तक्रारी ऐकल्या. यावेळी नागपूर ग्रामीणतर्फे तहसीलदार अशोक फेंडकर, डी.ए. ठोसरे, प्रमिला पवार, अ‍ॅड. पंकज शेंडे, सुरेश फलके, हिंगणातर्फे तहसीलदार एम.व्ही. पोटे, पोलीस निरीक्षक अशोक बागुल, संजय खडतकर, अ‍ॅड. अर्चना सोनारे, भिवापूरतर्फे- एस. मोटघरे, डी. अलोणे, नंदा नारनवरे, अ‍ॅड. प्रभाकर नागोसे, पुरुषोत्तम भिसीकर, कामठी- ए.एच. माडवे, व्ही.व्ही. खुळे, सुदाम राखडे, काटोल- ए.आर. झलके, के.बी. गवई, शालिनी सलाम, विजय कडू, कळमेश्वर- सुशील वैद्य, व्ही.एस. वांदिले, अ‍ॅड. निंबाळकर, चंद्रशेखर श्रीखंडे, कुही- जी.ए. पाजनकर, दीपक कोळी, यशोधरा नागदेवे, प्रदीप पोडे, भालचंद्र गांगलवार, मौदा तालुक्याच्यावतीने अलका शिंगाळे, डी.एस. बिजवे, विमल परतेती, मधुकर तिघरे, रघुनाथ तिजारे, नरखेड- एस.के. अवघड, जी.आर. कांबळे, व्ही.जे. उके, पारशिवनी- शिवराज पडोळे, आर.एल. तायडे, शरद डोणेकर, राकेश कभे, रामटेक- तालुक्याच्यावतीने एस.जी. समर्थ, बी.आर. खंडारे, धनंजय बोरकर, सावनेर- संतोष देशमुख एम.एम. कोटनाके, गुणवंत चौधरी उमरेडकडून- प्रवीण फुलारी, मधुकर गीते, रामकृष्ण जुनघरे आदी पदाधिकाऱ्यांनी समस्या मांडल्यात.
संचालन पोलीस निरीक्षक विलास वांदिले यांनी तर प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.