Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

गुणवंतांवर शुभेच्छांचा वर्षांव
नागपूर,९ जून / प्रतिनिधी

 

नुकताच बारावीचा निकाल लागला. बारावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांवर विविध संघटना, मान्यवर व्यक्ती व शैक्षणिक संस्थेतर्फे सत्कार व शुभेच्छांचा वर्षांव सुरू आहे.
इयत्ता बारावीच्या परीक्षेत राज्यातून प्रथम आलेल्या अलमास सय्यद हिचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. नागपुरातील एक विद्यार्थिनी संपूर्ण राज्यातून प्रथम आल्याने आम्हाला अभिमान वाटतो, या शब्दात विद्यापीठ अध्यक्ष मंगेश डुके यांनी अलमासचे कौतुक केले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अजय तायवाडे, कामठी तालुका उपाध्यक्ष राजेश मोहोड, अनिता सावरकर, चंदू लाडे, दीपक ठाकरे, मनीषा परदे, मंगेश तरार, सुधीर धुरिया, दिनेश सावरकर, इम्रान पठाण आदी मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
त्याचप्रमाणे खासदार विलास मुत्तेमवार यांनी अलमास सय्यद हिचे तिच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण, आमदार दीनानाथ पडोळे, मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष दाऊद शेख, ताजाबाद ट्रस्टचे अध्यक्ष शेख हुसेन, माजी महापौर विकास ठाकरे, किशोर डोरले, मारोतराव कुंभलकर, प्रशांत धवड, यशवंत कुंभलकर, तनवीर अहमद, किशोर दुरुगकर उपस्थित होते.
रात्रशाळेतून राज्यात प्रथम आलेल्या ताजाबाद नाईट ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी नफिसा अंजुम हिचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागातर्फे अभिनंदन करण्यात आले. अल्पसंख्याक विभागाचे महामंत्री शेख फिरोज यांनी नफिसाचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी कमल हिरयानी, मुस्तफा ठेकेदार, बब्बु, मुश्ताक, अमीर उपस्थित होते.
अमरज्योतीनगर, नारा रोड येथील भदंत धर्मकीर्ती कनिष्ठ महाविद्यालयातून विज्ञान विभागातून श्रृती आर. बोलखोडे (८२.८३ टक्के), निशा तेजवानी (७९.१९ टक्के), कला शाखेतून नागेश रामदास वासनिक (८२.६७ टक्के), सचिन रमेश भारती (७७.३३ टक्के) तसेच एम.सी.व्ही.सी. शाखेतून आषीश मेश्रामने ७९ टक्के व प्रियंका गायमुखे हिने ७३ टक्के गुण प्राप्त केले. या विद्यार्थ्यांचे प्राचार्य भदंत महाथेरो यांनी अभिनंदन केले.
सौरभ बाळकृष्ण येरपुडे याने बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून ९१.६७ टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल भारतीय स्वर्णकार समाजाचे केंद्रीय कोषाध्यक्ष ओंकारेश्वर गुरव, महासचिव रामचंद्र येरपुडे, चंद्रशेखर करंडे, अरविंद येरपुडे, विवेक डुमरे यांनी त्याच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तर सौरभने यशाचे श्रेय महाल येथील न्यू इंग्लीश माध्यमिक शाळेतील शिक्षक वृंद व आई-वडिलांना दिले आहे.
मिरची बाजार, आयुर्वेदिक ले-आऊट येथील नवप्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयातील कला विभागाचा ७५.७५ टक्के, वाणिज्य विभागाचा ७४.५४ टक्के, एम.सी.व्ही.सी.चा ९५ टक्के, उद्यानविद्या विभागाचा ९५ टक्के निकाल लागला. विज्ञान विभागातून समीर केळकर (८१.६६ टक्के), कला विभागातून भारती शशिकांत राऊत (६४.१६), वाणिज्य विभागातून श्रीदेवी रतनलाल प्रजापती (७९ टक्के), एम.सी.व्ही.सी.तून शिल्पा रामदास मालखेडे (७१ टक्के), लेखाशास्त्र मनोज कृष्णाजी भोंडगे (६६.८३ टक्के) व उद्यानविद्या विभागातून प्रीती मनोहर बोपचे ७० टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम आले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष बाबुराव झाडे, सचिव विजय वैद्य, प्राचार्य गजानन गंपावार यांनी अभिनंदन केले आहे.