Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

सार्वजनिक डम्पिंग ग्राऊंडना परवानगी द्या
एमएमआरडीएचे साकडे
विकास महाडिक
मुंबई महानगर प्रदेश विकास प्रधिकरण क्षेत्रातील सात महानगरपालिका आणि १३ नगरपालिकांतील ११ हजार मेट्रिक टन घनकचऱ्याचा प्रश्न अत्यंत बिकट झाला असल्याने एमएमआरडीएने निश्चित केलेल्या सहा जागांवर लवकरात लवकर शास्त्रोक्त पद्धतीने सार्वजनिक डम्पिंग ग्राऊंड विकसित करावे अन्यथा दिवसेंदिवस वाढत असलेल्या कचऱ्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती एमएमआरडीएने सरकारकडे अलीकडेच सादर केलेल्या अहवालात व्यक्त केली आहे.

पालिका पोसणार अपंग केंद्राचा पांढरा हत्ती
नवी मुंबई/प्रतिनिधी : नवी मुंबईतील रबाळे विभागात अपंग विद्यार्थ्यांंच्या शिक्षण तसेच प्रशिक्षणासाठी महापालिकेने सुरू केलेल्या योजनेस यशस्वी प्रतिसाद मिळाल्यानंतर हुरळून गेलेल्या योजना विभागाने आता वाशी रेल्वे स्थानकालगत काही शेकडो कोटींची किंमत असलेल्या सुमारे चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या फाईव्ह स्टार भूखंडावर भलेमोठे केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त विजय नाहटा यांनी या नव्या योजनेवर सुमारे चार कोटी रुपयांची भलीमोठी रक्कम खर्च करण्याचा निर्णय घेतला असून, अपंगांच्या नावाने सुरू करण्यात येणाऱ्या या केंद्रात नेमके असणार तरी काय, याचा कोणताही आराखडा प्रशासनाने पुढे आणला नसल्याने या केंद्राच्या विरोधात शहरातील काही अपंग संस्थाच आता पुढे सरसावल्या आहेत.

पनवेलमधील शवदाहिनीच्या मार्गातील अडथळे दूर
पनवेल/प्रतिनिधी : पनवेलच्या ‘अमरधाम’ स्मशानभूमीमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनतर्फे बसविण्यात आलेली गॅसवरील शवदाहिनी लवकरच नव्याने सुरू होणार आहे. या शवदाहिनीत बिघाड झाल्याने ती अनेक महिने बंद होती. तिच्या दुरुस्तीसाठीचा खर्च रोटरीने पालिकेकडे मागूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने, नागरिकांना परंपरागत खर्चिक पद्धतीने नातेवाईकांचे अंत्यसंस्कार करावे लागत होते. या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता-वृत्तान्तमध्ये’मध्ये (२१ मे) प्रसिद्ध झालेल्या ‘पालिका-रोटरी वादात, मरण झाले महाग’ या बातमीनंतर सूत्रे हलली आणि हा प्रश्न मार्गी लागला.