Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

फोफावती गुंडगिरी अन् तटस्थ नेतागिरी
‘सुरक्षेसाठी मनसेची तटबंदी उभारणार’

प्रतिनिधी / नाशिक

गुंडगिरी आणि गुन्हेगारी घटनांचा रतीब शहरात अव्याहत सुरू असताना एकाच रात्री सिडको परिसरातील सुमारे ४० वाहने जाळण्याचा ‘पराक्रम’ करून स्थानिक गुंड टोळ्यांनी आपली दहशत कमालीची वाढविली आहे. त्याबरोबरच अवैध धंद्यांना लगाम आणि गुंडांना तडीपार करण्याच्या पोलिसांनी सुरू केलेल्या हालचालींना उत्तर म्हणून हे कृत्य असल्याचे काही पोलीस अधिकारी सांगत असल्याने एकप्रकारे ते संपूर्ण यंत्रणेलाच खुले आव्हान ठरत आहे.

वाढती गुंडगिरी आणि राजकीय धुळवड
प्रतिनिधी / नाशिक
गुन्हेगारीच्या ज्वालामुखीवर बसलेल्या नाशिक शहरात अराजक निर्माण होण्यास पोलीस यंत्रणा दोषी असल्याचे बहुतांश राजकीय पक्षांचे मत असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई होत नसल्यानेच ते कायद्याला जुमानत नसल्याची स्थानिक राजकारण्यांची भावना आहे. त्यामुळे शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी रात्रीच्या सुमारास काही पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांमार्फत गस्त घालण्याची तयारी दर्शविली आहे. सिडको येथे वाहनांच्या झालेल्या जाळपोळीच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या वातावरणाविषयी राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भूमिका, त्यांच्याच शब्दात..

गौरव एका जिद्दीचा..गौरव मोनिकाचा!
प्रतिनिधी / नाशिक
भोसला सैनिकी विद्यालयाचे मैदान. अ‍ॅथलिटपटूंची नेहमीची सरावाची वेळ होऊनही कुणाचेच तिकडे लक्ष नव्हते. सर्वाना उत्सुकता होती, त्यांच्यातीलच एक असलेल्या राष्ट्रीय विक्रमवीर मोनिका आथरेच्या सत्कार सोहळ्याची. नेहमीच्या शिस्तीला फाटा देत हा सोहळा झाला अगदी घरगुती. ही कथा त्याचीच. भारतीय क्रीडा प्रश्नधिकरण अर्थात ‘साई’ च्या नाशिकमधील अ‍ॅथलेटिक्स केंद्राने विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविले आहेत. भोसलाच्या मैदानावर नियमित सराव करणाऱ्या खेळाडूंमधील मोनिका आथरे हे एक नाव. आठवीत असल्यापासून धावण्याचा सराव करणाऱ्या मोनिकाची एकच इच्छा होती की, कधीतरी कविता राऊतप्रमाणे आपल्याकडूनही एखादा विक्रम व्हावा. परंतु महत्वपूर्ण स्पर्धेत सहभाग घेतल्यावर तिच्यापुढे अचानक अशा काही समस्या येऊन उभ्या राहात की, त्याचा परिणाम तिच्या कामगिरीवर होई. त्यामुळे व्दितीय, तृतीय क्रमांकावर तिला समाधान मानावे लागे. स्पर्धा संपल्यावर स्वत:ला दोष देण्याशिवाय तिच्या हातात काही राहात नसे.

‘प्रियदर्शिनी २०१०’ प्रदर्शनाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन
नाशिक / प्रतिनिधी

नाशिकच्या अ‍ॅसेंट एक्सपो मल्टीमीडियातर्फे फेब्रुवारी २०१० मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ‘प्रियदर्शनी २०१०’ या फॅशन, ज्वेलरी, आर्ट व इंटिरिअर प्रदर्शनाच्या माहिती पुस्तिका व संकेत स्थळाचे उद्घाटन नुकतेच हॉटेल सिटीप्रश्नईड येथे झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष दिग्विजय कापडिया होते. यावेळी सॅवी फॅशन कॉलेजच्या संचालिका श्रुती मणियार-भूतडा व तनिष्कच्या संचालिका कीर्ती सेठी उपस्थित होत्या.

ऋतुरंग परिवारतर्फे व्यक्तिरेखा छायाचित्र प्रदर्शन
नाशिकरोड / वार्ताहर

नाशिकरोड येथील ऋतुरंग परिवारातर्फे छायाचित्रकार मिलींद देशमुख यांच्या ‘व्यक्तीरेखा’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून १२ जून रोजी सायंकाळी चार वाजता ऋतुरंग भवन येथे उपमहापौर अजय बोरस्ते यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नुकताच प्रदर्शित झालेला ‘निशाणी डावा अंगठा’ हा मराठी चित्रपट ज्यांच्या कादंबरीवर आधरित आहे ते लेखक कवी रमेश इंगळे उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शन १४ जूनपर्यंत सर्वासाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या प्रदर्शनात नाशिकरोड परिसरातील काही व्यक्तीरेखा नव्याने सामावलेल्या असणार आहेत. व्यक्तीरेखा प्रदर्शनात अतिशय सुंदर लाइट इफेक्ट, योग्य व शास्त्रोक्त कंपोझिशन, त्याला साजेशी पाश्र्वभूमी, व्यक्तींचे कपडे व स्टुडिओ प्रश्नॅपर्टीज् या सर्वाचा समतोल राखून अतिशय सुंदर छायाचित्रे देशमुख यांनी काढली आहेत. २००८ मधील ‘जर्नी ऑफ लाईफ’ या प्रदर्शनात देशमुख यांनी चुरगाळलेला कागद हे माध्यम वापरून टेबलटॉप फोटोग्राफीव्दारे सुंदर कलाकृती रसिकांसमोर मांडल्या. या प्रदर्शनात देखील नाविण्याने परिपूर्ण अशा कलाकृती अनुभवास मिळणार असून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

प्रस्तावित पाणी दरवाढीबाबत नाशिकमध्ये आज बैठक
प्रतिनिधी / नाशिक

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्रश्नधिकरणाने राज्यातील पाण्याचे दर निश्चित करणे व त्यासाठीचे विनियम तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचे दूरगामी परिणाम लक्षात घेता नाशिकमधील विविध पक्ष, संघटना, संस्था व लोकप्रतिनिधींची बैठक बुधवारी सायंकाळी ६ वाजता हुतात्मा स्मारक येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रश्नधिकरणाच्या या भूमिकेचा विविध घटकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव पडणार आहे. त्यामुळे या विषयावर र्सवकष चर्चा अपेक्षित आहे. या संदर्भात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्रश्नधिकरणाची नाशिक विभागासाठीची सल्लामसलत बैठक येत्या १५ तारखेला सकाळी ११ वाजता ‘मेरी’च्या सभागृहात होणार आहे. त्यामध्ये नाशिक विभागातील विविध पक्ष, संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी लोकांच्या वतीने सूचना करणे, अपेक्षा मांडणे गरजेचे असल्याने त्याची पूर्वतयारी म्हणून बुधवारी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंचाचे श्रीधर देशपांडे, छाया देव, मिलिंद वाघ, अरूण धामणे, राजेंद्र शिंदे, प्रगती अभियानच्या अश्विनी कुलकर्णी, सर्वोदय परिवाराचे मुकुंद दीक्षित, वासंती दीक्षित, श्रीकांत नावरेकर, प्रभाकर पाटील, पुष्पा जोशी, विलास शिंदे, नीलिमा साठे, मंगला गोसावी, राजू देसले, रोहिणी नायडू, निनाद पुरोहित, गौरव धामणे, प्रसाद महाले, दीपाली छाजेड, सुनीता पिंगळे आदिंनी केले आहे.

विभागीय लोकशाहीदिनात ३६७ प्रकरणे निकाली
नाशिक / प्रतिनिधी

विभागीय लोकशाहीदिनात आतापर्यंत ३६७ प्रकरणे निकाली काढण्यात आली असल्याची माहिती विभागीय महसूल आयुक्त डॉ. संजय चहांदे यांनी दिली. लोकशाहीदिनात प्रश्नप्त होणाऱ्या तक्रारींवर लवकरात लवकर कार्यवाही करून निकाली काढाव्यात आणि सामान्य माणसास न्याय देण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. येथील विभागीय आयुक्त कार्यालयात चहांदे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय पातळीवरील लोकशाहीदिनाचा कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. विभागीय स्तरावरील लोकशाहीदिनात आतापर्यंत एकूण ३७७ प्रकरणे प्रश्नप्त झाली असून त्यापैकी ३६७ प्रकरणे निकाली निघाली आहेत. १० प्रकरणे प्रलंबित आहेत. आजच्या लोकशाहीदिनात एकूण १६ प्रकरणे प्रश्नप्त झाली. त्यामध्ये नाशिक जिल्हाधिकारी ३, उपसंचालक अभिलेख १, नाशिक महानगरपालिका ४, नाशिक जिल्हा परिषद १, विभागीय सहनिबंधक ४, जळगाव जिल्हाधिकारी १, अहमदनगर जिल्हाधिकारी १ आणि एस. टी. महामंडळ १ अशी एकूण १६ प्रकरणे प्रश्नप्त झाली. नागरिकांनी आपल्या तक्रारी प्रथम जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहीदिनी मांडाव्यात, त्यानंतर विभागीयस्तरावर तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहनही चहांदे यांनी केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सुभाष पंचगल्ले, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता न. ला. गवळे, महसूल उपायुक्त ओमप्रकाश देशमुख, उपायुक्त प्रकाश ठुबे, गोकुळ भुसारे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक
नाशिक / प्रतिनिधी

विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. चहांदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रशासकीय कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचारास वाव राहू नये यासाठी नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचारांसंबंधीची माहिती भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सादर करावी, असे आवाहन चहांदे यांनी केले. आजच्या बैठकीत भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस अशासकीय सदस्य विद्या पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सुभाष पंचगल्ले, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता न. ला. गवळे, महसूल उपायुक्त ओमप्रकाश देशमुख आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सच्या अध्यक्षपदी अविनाश शिरोडे
नाशिक / प्रतिनिधी
येथील ज्येष्ठ सिव्हिल इंजिनियर अविनाश शिरोडे यांची असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तसेच हेमंत धात्रक यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष (पश्चिम विभाग) पदी निवड झाली आहे. एसीसीई ही देशातील कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सची राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी संस्था आहे. सर्व सिव्हिल इंजिनियर्सना एकत्र आणणे, चर्चासत्र, कार्यशाळा, बैठकांव्दारे ज्ञान, अनुभव, नवीन व आधुनिक तंत्राची चर्चा व्यवसाय व समाजासाठी करण्याचा प्रयत्न हेच या संस्थेचे मुख्य उद्दीष्ट व कार्य आहे. सिव्हिल इंजिनियर्सना जागतिकीकरण व नव्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देणे, सदस्य संख्या वाढविणे, व्यावसायिक हक्कांचे रक्षण करणे, इतर देशांमध्ये समविचारी संस्थांशी संलग्नता जोडणे, जागतिक स्तरावर भारतीय इंजिनियर्सना इतर देशांमध्ये प्रश्नेजेक्टमध्ये सहभागी होण्यास मदत करणे आदी शिरोडेंच्या अध्यक्षपदाच्या दोन वर्षाच्या कार्यकाळातील संकल्पना आहेत.

प्रश्न. आरती म्हात्रे-मोरे यांची आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड
नाशिक / प्रतिनिधी

मुंबई एज्युकेशन ट्रस्ट संचलित येथील भुजबळ नॉलेज सिटीमधील इन्स्टिटय़ुट ऑफ मॅनेजमेंटच्या प्रश्न. आरती म्हात्रे-मोरे यांची ऑक्सफर्डच्या ‘२००९ ऑक्सफर्ड बिझीनेस अ‍ॅण्ड इकॉनॉमिक कॉन्फरन्स’ या आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेसाठी निवड झाली आहे. सेंट ह्य़ुग्ज कॉलेजमध्ये २४ ते २६ जून या कालावधीत होणाऱ्या या परिषदेसाठी प्रश्न. आरती म्हात्रे-मोरे १८ जून रोजी इंग्लंडला रवाना होत आहेत. एस्थेटिक कन्सिडरेशन्स फॉर फॉर्मास्युटिकल ओटीसी प्रश्नॅडक्टस’ हा शोधनिबंध त्या परिषदेत सादर करणार आहेत.


नेपाळमध्ये आयोजित कराटे स्पर्धेत नाशिकच्या आर्यन कराटे स्पोर्टस् अकॅडमीच्या अनिषा परदेशी, धनंजय पाटोळे, दीपक पांडे, प्रथमेश आहिरे, अक्षय गमरे, नरेश पवार, अंकुश पाटील यांनी सुवर्णपदक मिळविले. त्यांच्यासह अकॅडमीचे अध्यक्ष प्रवीण सानप, प्रशिक्षक उत्तम सानप आदी.


नाशिक जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे आयोजित प्रशिक्षण समारोप प्रसंगी महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गंधे, जिल्हा संघटनेचे अनंत जोशी, मिलिंद जोशी, प्रमुख प्रशिक्षक दिलीप महाजन आदी. यावेळी उत्कृष्ट खेळाडू म्हणून धिरा भन्साळीची निवड करून तिला गंधे यांच्यातर्फे रॅकेट भेट देण्यात आली.

नाशिक जिल्ह्य़ात मान्सूनचे अजूनही आगमन न झाल्याने उष्णतेचे प्रमाण कायम आहे. अशा वेळी उष्म्याच्या तडाख्याने हैराण गजराजाला बादलीभर पाण्यानेही मोठा दिलासा मिळाला आहे.