Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

समर्थ पतसंस्थेत अडीच कोटींचा अपहार
पतसंस्थांमधील गैरव्यहाराचे प्रकरण ऐरणीवर

वार्ताहर / जळगाव
जिल्ह्य़ाच्या पारोळा येथील स्वामी समर्थ पतसंस्थेत विशेष लेखा परीक्षणात अडीच कोटीचा अपहार झाल्याचे उघड होताच ठेवीदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी, आजी-माजी अध्यक्ष, संचालक, अधिकारी, कर्जदार मिळून १०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी राबविलेल्या व्यापक धरपकड मोहिमेत तीन कर्जदारांना अटक करण्यात आली आहे.

तळोदा रेल्वे फाटक वाहतुकीसाठी खुले करण्याचे निर्देश
नंदुरबार / वार्ताहर

शहर परिसरातील तळोदा रेल्वे फाटक बंद असल्याने नळवा रस्त्याने वाहतूक सुरू असून त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी रेल्वे फाटक आठवडाभरात वाहतुकीसाठी खुले करण्याचे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी गुलाब पवार यांनी दिले आहेत.

सामाजिक कार्यातील आदर्श: जमनाबेन कुटमुटिया ग्रुप
नि:स्पृह व प्रश्नमाणिक तळमळीतून सेवाभाव जोपासण्याऐवजी केवळ प्रसिद्धीची हौस भागविणे तसेच केलेल्या अथवा न केलेल्या कार्याचे अवडंबर माजवून श्रेय लाटण्यासाठी धडपडणारी मंडळे आणि सामजिक संस्थांची वाणवा नाही. परंतु प्रसिद्धीचा हव्यास टाळून अव्याहतपणे सामाजिक कार्य नेटाने पुढे नेणाऱ्या संस्था देखील कमी नाहीत. कित्येकदा अशा संस्थांचे कार्य समाजापुढे येत नसले तरी त्यांचे कार्य खरोखरच समाजापुढे आदर्शवत असेच असते.

जागतिक बँकेसमवेत जैन इरिगेशन तामिळनाडूतील प्रकल्पात सहभागी
जळगाव / वार्ताहर

तामीळनाडूमध्ये जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्यातून साकारत असलेल्या कृषी आधुनिकीकरण व पाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे ७७.८ कोटी रुपयांचे काम येथील जैन इरिगेशन सिस्टीम कंपनीला जागतिक बँकेकडून मिळाले आहे. कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणात भरीव योगदान व गुणवत्तापूर्ण उत्पादन देणाऱ्या जैन इरिगेशनला या प्रकल्पाच्या माध्यमातून जागतिक बँकेच्या समवेत काम करता येणार आहे. तामीळनाडूतील इरिगेटेड अ‍ॅग्रीकल्चर मॉर्डनायजेशन अ‍ॅण्ड वाटर बॉडीज रिस्टोरेशन अ‍ॅण्ड मॅनेजमेंट हा अत्यंत प्रतिष्ठेचा प्रकल्प मानला जात असून राज्यातील लहान मोठय़ा ६३ नद्यांच्या उपखोऱ्यातील कृषी क्षेत्राला यात समाविष्ट करण्यात आले आहे. यातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात २५ उपखोऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तामीळनाडूचा कृषी अभियांत्रिकी विभाग व तामीळनाडू कृषी विद्यापीठाचा सदर प्रकल्पात सहभाग असून २५ उपखोऱ्याील १५ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. सुमारे २२ हजार ३४५ हेक्टर क्षेत्रावर जैन ठिबक व सुक्ष्म सिंचन पुरविण्याची जबाबदारी जागतिक बँकेने जैन इरिगेशनवर टाकली आहे. त्याचबरोबर कृषी शिक्षण विस्ताराचे कामही जैन इरिगेशनलाच देण्यात आले आहे. शेतीतून अधिक उत्पन्न काढण्यासाठी पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे ओळखून जैन इरिगेशन विशिष्ठ कृषी पिकांच्या उत्पादनास शेतकऱ्यांना प्रश्नेत्साहित करून त्यांना व्हॅल्यु चेनचेही ज्ञान देणार आहे.

जकात वसुली ठेक्यासाठी महापालिका फेरनिविदा काढण्याची शक्यता
मालेगाव / वार्ताहर

महापालिकेच्या हद्दीत १ जुलैपासून वर्षभरासाठी जकात वसुलीकरिता द्यावयाच्या ठेक्यासाठी निर्धारित रकमेपेक्षा सहा कोटी कमी असलेली निविदा प्रश्नप्त झाल्याने पालिका प्रशासन या ठेक्यासाठी फेरनिविदा काढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वर्षभराच्या जकात वसुली ठेक्यासाठी पालिका प्रशासनाने ३७ कोटी ७१ लाख १११ रुपये एवढा किमान दर निर्धारित केला होता. त्यासाठी गेल्या महिन्यात निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदा सूचनेला अनुसरून सहा अभिकर्त्यांनी कोऱ्या निविदा घेतल्या होत्या. मात्र त्यातील उल्हासनगर येथील कोणार्क एंटरप्रश्नयझेस आणि सध्या जकात वसुली करीत असलेल्या मेघा एंटरप्रश्नयझेस या दोन संस्थांनीच विहित मुदतीत निविदा दाखल केल्या. सोमवारी दुपारी आयुक्त जीवन सोनवणे यांनी सर्व संबंधितांच्या समक्ष या निविदा उघडल्या. त्यात विद्यमान अभिकर्ता, मेघा एंटरपायझेस यांची सर्वाधिक ३१ कोटी ३१ लाखाची तर कोणार्क एंटरप्रश्नयझेस या संस्थेची त्याहून कमी म्हणजे ३१ कोटी पाच लाख रुपयांची निविदा मिळाल्याचे उघड झाले. निर्धारित केलेल्या किमान दरापेक्षा हा दर तब्बल सहा कोटी ४० लाख रुपये कमी आहे. त्यामुळे या ठेक्यासाठी पालिकेला फेरनिविदा काढावी लागण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्य़ात किटकनाशक फवारणी मोहीम
धुळे / वार्ताहर

पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर साथीची लागण होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्य़ातील १६४ अतिसंवेदनशील गावात ८ जून ते २ जुलै या कालावधीत किटकनाशक फवारणी करण्यात येणार आहे. ही मोहीम जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्य़ात पावसाळ्यात डासांची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणावर होऊन त्यांच्यामुळे साथीची लागण होण्याची शक्यता असते. साथींवर उपाययोजना म्हणून जिल्हा हिवताप निर्मुलन कार्यालयातर्फे किटकनाशक फवारणी मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्य़ातील १६४ अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या गावांमध्ये ही फवारणी करण्यात येणार आहे. अतिसंवेदनशील गावांमध्ये सर्वात जास्त गावे ही शिंदखेडा तालुक्यातील आहेत. धुळे ४०, शिंदखेडा ५२, शिरपूर ३० आणि साक्री तालुक्यात ४२ याप्रमाणे एकूण १६४ गावांचा समावेश राहणार आहे. ही मोहीम राबविताना ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी केले आहे.