Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

मार्केट मेकर्स
चंद्रशेखर टिळक
निर्गुतवणुकीचे संकेत

मुंबई शेअरबाजाराच्या निर्देशांकाने आता पंधरा हजार अंशांची पातळी पार केली आहे. गेल्या दोन-तीन आठवडय़ात हा निर्देशांक असा काही वेगाने वाढला आहे की, अवघ्या काही आठवडय़ांपूर्वी हाच निर्देशांक नऊ हजार अंशांच्या पातळीवर घुटमळत होता याचा विसर पडावा. ब्लूमबर्गसारख्या संस्था तर त्यावेळी हा निर्देशांक सात हजार अंशांपर्यंत खाली जाईल असे भाकित वर्तवत होत्या. गेल्या तीन-चार आठवडय़ांत आपल्या देशाच्या मूलभूत आर्थिक कामगिरीत अगदी पराकोटीचा सकारात्मक बदल झाला आहे असा त्याचा बिलकूल अर्थ नाही. आपल्या देशाचे अर्थकारण जगातील इतर देशांच्या तुलनेत आधीही सक्षम होते आणि आजही आहे.

व्हयं म्हाराजा
आज बाबल्या काडीचोय येळ नव्हतो. बाबल्याची घे म्हणान धावपळ.. तुमका वाटात बाबल्याच्या घरात कोणाचो तरी बारसो आसा की काय.. पण तसा नाय, बाबल्याच्या पक्षाचो आज धाववो वाढदिवस आसा. म्हणजे बाबल्याच्या घरच्याच कार्य. तुमी कायय म्हणा बाबल्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्यांक आजचो दिवस म्हणजे सोन्याहून पिवळो. सायबान पक्ष स्थापनो केलो त्यावेळी इमानदारीत इच्छा नसताना केवळ सायबाब ‘लॉयल’ म्हणान बाबल्यान घडय़ाळ हातीत बांधल्यानी. गेली धा वर्षा बाबल्या ह्या घडय़ाळ मोठय़ा शान के साथ मिरयतासा. दरवर्षी पक्षाचो हो स्थापना दिस आणि सायबांचो वाढदिवस तो मोठय़ा श्रद्धेन साजरो करता.

अवकाश वेध
अंतराळ तंत्रज्ञानाचे आविष्कार

कुठलाही उपग्रह किंवा अंतराळयान अवकाशात पाठवले जाते तेव्हा त्यासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च केला जातो, यात सामान्य माणसाला पडणारा नेहमीचा प्रश्न असतो, की यामुळे माझ्यासारख्याच्या जीवनात काय फरक पडणार आहे. याला एक उत्तर असे, की अवकाशात फिरणारे उपग्रह हे नेहमीच आपल्याला उपयुक्त ठरणारी माहिती देत असतात. वादळे, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना त्यांनी दिलेल्या छायाचित्रातून मिळते. शेतीमध्ये पिकांचे नियोजन करण्यात उपग्रहांनी पाठवलेल्या माहितीचा उपयोग होऊ शकतो.