Leading International Marathi News Daily
बुधवार, १० जून २००९
  ‘ऑफ बीट ट्रॅक्स’ सायन्सेस
  इक्विटी अॅनालिस्ट
  तेलसंपन्न देशांचे शैक्षणिक औदार्य : ओएफआयडी स्कॉलरशिप
  समृद्ध सवय
  ‘स्टील फ्रेम’चा ध्यास!
  लोकराज्य स्पर्धा परीक्षा विशेषांक ‘गुरुकिल्ली यशाची’
  फॉरेन्सिक अकाउन्टन्ट्
  ‘लोकसत्ता’ करिअर व्हिजनचे आयोजन
  हॉस्पिटॅलिटी उद्योगातील संधी
  हॉटेल मॅनेजमेंट दुसरी बाजू
  करिअरच्या वेगळ्या वाटा कोणत्या?
  मरीन इंजिनीअरिंग, र्मचट नेव्हीला पुन्हा उभारी
  बँकअॅश्युरन्समधील करिअर संधी
  तरुणाईचा ओढा हेअर स्टाइलिंगकडेच!

‘ऑफ बीट ट्रॅक्स’ सायन्सेस
विज्ञान क्षेत्रातील करिअर म्हणजे आशा, आव्हान, विकास, प्रगती, चुका आणि शिक्षण, अपयश आणि यश असे असते. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्णत: नोकरीचे समाधान देणारे हे क्षेत्र आहे. हे क्षेत्र कंटाळवाणे, धोका नसलेले, अंदाजावर चालणारे नसते. या सर्वामुळेच या क्षेत्रात जेवढी जोखीम आहे तेवढीच शाश्वतीही आहे. म्हणूनच हे क्षेत्र मोठे आव्हानात्मक आहे. ज्यांची आव्हान पेलण्याची तयारी आहे, अशा विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात प्रवेश करण्यास हरकत नाही..
विज्ञान शाखेत करिअर करणे ही संकल्पना दिवसेंदिवस कमी होत जात आहे. या मागचे मुख्य कारण म्हणजे आयटी क्षेत्राची
 

बूम आणि या शाखेतील संधीची अपूरी माहिती आणि मुलभूत संशोधनातील उदासीनता हेच आहे. आयटीक्षेत्रात मिळणाऱ्या भरघोस सुविधा, पगार या सर्वानी विद्यार्थ्यांना भूरळ घातली आणि विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञानाकडून परावृत्त केले. १२वी पर्यंत विज्ञान शाखेत असणारे विद्यार्थी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्राकडे वळतात. अगदीच नाहीतर बीएससी इन आयटी करतात किंवा इतर विषयातील पदवी अभ्यासक्रमासोबत एखादा सॉफ्टवेअरचा अभ्यासक्रम करतात आणि आयटीमध्ये पाय रोवण्यास सुरूवात करतात. नाईलाजाने बीएससीकडे वळलेले काही विद्यार्थी एमएससीपर्यंत पोहोचतात. एवेढे केल्यानंतरही अनेक जण हे क्षेत्र सोडून इतर क्षेत्राकडेच वळतात. पण प्रत्यक्षात विज्ञान क्षेत्रात मोठय़ा संधींकडे त्यांचे दुर्लक्ष होते. सध्या विज्ञान क्षेत्रात सरकारतर्फे माठय़ाप्रमाणावर गुंतवणूकही करण्यात येत आहे.
विज्ञान क्षेत्रातील पारंपरीक करिअरच्या पलिकडे जाऊन जर आपण विचार केला तर यात खरोखरच फार मोठय़ा संधी आहेत. शिवाय अनेकदा एखादा विद्यार्थी बारावीनंतर अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शाखेकडे वळतो पण त्याला मूलभूत संशोधनात काम करण्याची इच्छा असते अशा विद्यार्थ्यांनाही मोठी संधी उपलब्ध आहेत. पण नेहमीच्याच संधींकडे पाहणारे आपण करिअरच्या ‘ऑफ बीट ट्रॅक्स’ वरून जाण्यास सहसा धजत नाही. संशोधक अथवा वैज्ञानिक म्हणून आपण करिअर करू शकतो याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढणे गरजचे आहे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देशाला चांगले वैज्ञानिक मिळणे कठीण आहे. सध्या विद्यार्थ्यांचा कल काठेही असू देत पण प्रश्नमाणिकपणे विज्ञानासाठी वर्षानूवष्रे काम करणाऱ्या आणि करिअरची मोठी संधी देणाऱ्या काही वेगळ्या अभ्यासक्रमांची आणि हे अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्थांची आपण ओळख करून घेऊया.
होमी भाभा विज्ञान प्रशिक्षण केंद्र
विज्ञान शिक्षण आणि विद्यार्थ्यांची या क्षेत्रातील मूलभूत संशोधनाकडे पाहण्याची दृष्टी याबाबत बोलताना होमी भाभा विज्ञान प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. हेमचंद्र प्रधान म्हणाले ‘विद्यार्थी हे प्रज्ञावान असतात पण त्यांना वाव देणे गरजेचे असते. ही गरज संस्थांनी, शिक्षकांनी भागविणे गरजेचे आहे.’ ऑलिम्पियाड चे विद्यार्थी तयार करणारी संस्था म्हणून या संस्थेची ख्याती आहे. शालेय विद्यार्थ्यांना त्याच काळात विज्ञानातील विविध शाखा, गणित यामध्ये आवड निर्माण व्हावी यादृष्टीने ऑलिम्पियाड महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे डॉ. प्रधान यांनी सांगितले. शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्यूनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना ऑलिम्पियाडमध्ये झळकण्याची संधी मिळते. यामध्ये विद्यार्थ्यांना आंतराराष्ट्रीय पातळीवरील स्पध्रेत सहभागी होण्यासाठी परदेशात जाण्याची संधीदेखील मिळते. याशिवाय या केंद्रातर्फे अणुऊर्जा आयोग आणि टीआयएफ आरच्या सहाय्याने ‘नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ अंडर ग्रॅज्यूएट सायन्स’ (एनआययूएस) नावाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांमध्ये आवड असणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी अभियांत्रिकी अथवा वैद्यक शाखेमध्ये पदवी घेत आहे, पण त्या विद्यार्थ्यांला मूलभूत विज्ञानामध्ये काही करण्याची आवड आहे अथवा त्याला विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये अभ्यास करावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांना या प्रकल्पांतर्गत या अभ्यासाची संधी मिळते. या प्रकल्पातील अभ्यासक्रम सुटय़ांच्या कालावधीत होत असल्याने नियमित शिक्षण सुरू असलेल्या विद्यार्थ्यांनाही याचा फायदा घेता येतो. दरवर्षी वर नमूद केलेल्या तिन्ही शाखांमध्ये प्रत्येकी ५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये त्या-त्या विषयातील विविध प्रकल्प विद्यार्थ्यांना देण्यात येतात. यामध्ये विद्यार्थ्यां विविध विषयांवर संशोधनासाठीही मूभा देण्यात येते. यावेळी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रातील तसेच बीएआरसी, टीआयएआर अशा संस्थांमधील तज्ज्ञ उपस्थित असतात. २००४ पासून सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पांतर्गत अभियांत्रिकीचे नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन जागतिक स्तरावर मान्यता मिळविण्यास यशस्वी झाले आहेत. या प्रशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोयही केंद्रात उपलब्ध आहे. या इमारतीचे नुकतेच अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. ही संस्था वि. ना. पुरव मार्ग, मानखुर्द येथे आहे.
सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस
मूलभूत विज्ञानाला आणि विद्यार्थ्यांना प्रश्नेत्साहन देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. बारावीनंतर पाच वर्षाचा इंटर एमएससीचा अभ्यासक्रम या संस्थेत उपलब्ध आहेत. या संस्थेचा अभ्यासक्रम संस्थेतील तसेच विविध शैक्षणिक संस्थांमधील तज्ज्ञ प्रश्नध्यापकांनी तयार केला आहे. यामुळे हा अभ्यासक्रमाला विशिष्ट दर्जा प्रश्नप्त झाला आहे. पाच वर्षाच्या या अभ्यासक्रमात विविध प्रकल्प आणि संशोधनाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येते, अशी माहिती संस्थेचे डॉ. मयांक वाहीया यांनी दिली. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाकडे आकर्षित करून घेण्यासाठी विद्यावेतन देण्यात येत असल्याचे ही त्यांनी सांगितले. या संस्थेत भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत अशी माहिती येथील अॅडजन्ट फॅकल्टी डॉ. जसिन्ता डीसोझा यांनी दिली. तसेच येत्या काळात कॉम्प्युटर सायन्सचाही अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संस्थेतील सर्व विषयांतील अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम एकसारखा असून दुसऱ्या वर्षापासून त्यांना विशेष विषयांमध्ये अभ्यास करण्यास वाव देण्यात येतो. यात थेअरी आणि प्रश्नत्यक्षिके समान पातळीवर घेण्यात येत असून विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये मोठी संधी देण्यात येते. तसेच येथील विद्यार्थ्यांना इंटन्शिपची संधीही देण्यात येते. पाच वर्षाचा हा अभ्यासक्रम पूर्णत: निवासी असून येथे विद्यार्थ्यांना वाचनालय, ग्रंथालय, वसतिगृह आदी सुविधाही देण्यात येतात. या केंद्रात दरवर्षी इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुटीच्या काळात संशोधनासाठी संधी देण्यात येते अशी माहितीही डॉ. डिसोझा यांनी दिली. हे केंद्र मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पस मध्ये आहे.
आय.सी.टी.
इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी म्हणजेच आयसीटी. रसायनशास्त्रातील अत:पासून इतिपर्यंत सर्व अभ्यास या संस्थेत उपलब्ध आहे. १९३३ मध्ये स्थापन झालल्या या संस्थेत रसायनशास्त्रातील उद्योगांना आवश्यक असे संशोधन आणि विकासाचे कामदेखील सुरु असते. या संस्थेला नुकताच अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आले यावेळी त्याचे आयसीटी असे नामकरण करण्यात आले.
टेक्स्टाइल आणि केमिकल इंजिनिअरिंग हे या संस्थतील महत्त्वाचे आणि सर्वात जूने अभ्यासक्रम आहेत. पण कालानुरुप संस्थेने अभ्यासक्रमात बदल केले. सध्या या विद्यापीठात बी.केम. (बॅचलर इन केमिकल इंजिनिअरिंग), बी. फार्म (बॅचलर इन फार्मासी), बी. टेक (बॅचलर इन केमिकल टेक्नॉलॉजी) अभ्यासक्रम सात विशेष विषयांमध्ये आहे. यात टेक्स्टाइल, फूड, ऑइल, पॉलिमर, प्रिंट, डाय, फार्मा या विषयांचा समावेश आहे. या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रीया इतर अभियांत्रिकी शाखेतील प्रवेशांप्रमाणेच होते. यात इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानातील अभ्यासक्रमासाठी १२वीत पीसीएम ग्रूप तर बी.फार्म अभ्यासक्रमांसाठी पीसीबी ग्रूप असणे गरजेचे आहे. याशिवाय येथे अंडरग्रॅज्यूएट आणि पदव्युत्तर पदवीचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामधील काही अभ्यासक्रम खास याच संस्थेत उपलब्ध आहेत. यात एमटेक इन फ्लेवर्स अॅण्ड परफ्यूमरी हा विशेष अभ्यासक्रम आहे अशी माहिती संस्थेतील प्रश्नध्यापिका एस. एस. लेले यांनी दिली. उत्तम नोकरी, पदरेशी शिक्षणाची संधी यामुळे येथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या उल्लेखनीय संधींमूळे ही संस्था विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे. रसायनशास्त्रात तज्ज्ञ होण्यासाठीचे सर्व पर्याय या संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. ही संस्था माटुंगा येथील नाथलाल पारिख मार्ग येथे आहे.
मराठी विज्ञान परिषद
विज्ञानाच्या प्रसारसाठी महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या मराठी विज्ञान परिषदेचेही विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांना उपयुक्त असे आहेत. यातील काही कार्यक्रम विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेकडे जाण्यास प्रवृत्त करणारे आहेत. परिषदेचे तीन मुख्य भागांमध्ये काम होते. यामध्ये पहिल्या भागात राज्यभर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते. ही व्याख्याने विद्यार्थ्यांना प्रश्नेत्साहीत करणारी असल्याने यात यूआयसीटी, टीआयएफ आर आदी मान्यवर संस्थांमधील पीएचडी केलेले अथवा अभ्यास करत असलेले विद्यार्थी व्याख्याते म्हणून जातात. दुसऱ्या भागात विविध वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळांचे आयोजन परिषदेतर्फे करण्यात येते. यात विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात विज्ञान विषयातील प्रयोग प्रश्नत्यक्षिकांद्वारे करण्याची संधी मिळते. याशिवाय विद्यार्थ्यांना काही विषय देऊन त्यावर आधारीत प्रयोग करण्याची संधीही त्यांना मिळेते. विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रयोग सादर विविध ठिकाणी सादर करण्यात येतात. तर तिसऱ्या भागात शालेय विद्यार्थ्यांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यत सर्वाना विज्ञान क्षेत्रात प्रश्नेत्साहन देण्यसाठी विविध पुरस्कार देण्यात येतात. पण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी प्रवेशिका न आल्याने पुरस्कार देता येणे शक्य न झाल्याची खंत परिषदेचे राजू चिटणीस यांनी व्यक्त केली. शिवाय विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयक संकल्पना विकसित व्हाव्या यासाठी आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांंना पुस्तकातील ‘वैज्ञानिक संकल्पना’ नावाचा कार्यक्रम परिषदेतर्फे राबविण्यात येतो. शिवाय परिषदेची काही प्रकाशने आणि शहरी शेती या विषयावर होणारी कार्यशाळा सर्वाना विज्ञान विषयात आवड निर्माण करण्यास उपयुक्त ठरत आहेत. ही संस्था विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी येथे आहे.
सध्या शासन आणि खाजगी पातळीवरून मोठय़ाप्रमाणावर गुंतवणूक होत आहे. विज्ञानाच्या प्रसारासाठी देशभरात अनेक संस्था वेगवेगळ्या प्रकारचे काम करत आहेत. पण त्या संस्था विद्यार्थ्यांपर्यंत अथवा विद्यार्थी या संस्थांपर्यंत पाहोचण्यास कुठेतरी कमी पडत आहेत. अगदी शालेय जीवनापासून विज्ञानाकडे प्रवृत्त करणाऱ्या या सर्व संधींचा योग्य फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी आयटीच्या बूमच्या थोडे पलिकडे पाहण्यास सुरुवात करुन विज्ञान क्षेत्रात सवरेत्कृष्ट करिअर देणाऱ्या या ‘ऑफ बीट ट्रॅक्स’च्या दिशेने पाऊल उचलण्यास हरकत नाही.
नीरज पंडित
nirajpandit@in.com