Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आर्यलड अडचणीत झहीर खानचे चार बळी
ट्रेन्ट ब्रिज, १० जून / वृत्तसंस्था

 

डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खानने आपल्या दर्जाला साजेशी गोलंदाजी करताना आयर्लंडचे चार फलंदाज झटपट तंबूत धाडत ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील साखळीतील अखेरच्या सामन्यात आयर्लंडला चांगलेच अडचणीत आणले. आयर्लंडने तरीही शतकाचा टप्पा ओलांडत ८ बाद ११२ अशी मजल मारली. झहीरने पोर्टरफिल्ड (५), ब्रे (०), बोथा (१९) या आघाडीच्या फलंदाजांना माघारी धाडत आयर्लंडच्या आव्हानातली हवाच काढून टाकली. या स्पर्धेत सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रज्ञान ओझानेही ओब्रायन व मूनी यांच्या रूपात दोन बळी घेऊन आयर्लंडला धक्के दिले. आयर्लंडतर्फे अ‍ॅन्ड्रय़ू व्हाइटने २९ धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याचा अडसरही झहीर खाननेच दूर केला. झहीरने १९ धावांत ४ बळी घेतले तर ओझाने दोन बळी घेताना १८ धावा दिल्या.
अखेरच्या षटकात हरभजनने १५ धावा मोजल्यामुळे आयर्लंडला शतकाची वेस ओलांडता आली. अन्यथा, त्यांना शंभर धावा पूर्ण करण्यापूर्वीच माघारी धाडण्यात भारताला यश आले असते.
त्याआधी, पावसाने या सामन्याच्या सुरुवातीलाच अडथळा निर्माण केल्यामुळे हा सामना १८ षटकांचाच करण्यात आला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि धोनीचा हा निर्णय गोलंदाजांनी अचूक ठरविला.