Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विकासाची गंगा पण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची खंत ..
प्रशांत देशमुख

 

नव्या परिसीमनामुळे गांधीभूमी सेवाग्राम आश्रम परिसर वगळला असला, विनोबांच्या पवनार आश्रमाचा आशीर्वाद लाभलेला वर्धा विधानसभा मतदारसंघ आता शहरी तोंडवळ्याचा झाला आहे. वर्धा विधानसभा मतदारसंघ एक विक्रमही राखून आहे. शेकापचे गणपतराव देशमुख यांच्यापाठोपाठ राज्यात सर्वात अनुभवी तसेच, राज्यात काँग्रेसचा सर्वात ज्येष्ठ आमदार हे बिरूद मिरवणारे आमदार प्रमोद शेंडे यांचा वर्धा मतदारसंघ त्यांच्या कर्तृत्वानेच पायाभूत सेवांचा आगर ठरला आहे. मात्र, हा मतदारसंघ परिसीमनाने बदलला. वर्धा, सेलू तहसील भाग तसेच, हिंगणी, झडशी व सेलू गाव मिळून नवा मतदारसंघ बनला तर, सेवाग्राम, सिंदी रेल्वे व सेलू तालुक्याचा काही भाग इतरत्र जोडला गेला. नवे मतदार मिळून एकूण २ लाख २८ हजार १७० मतदार आहेत. काँग्रेस व प्रामुख्याने शेंडेंना अनुकुल असणारा सेलू-सिंदी परिसर कापला गेल्याने हा मतदारसंघ शहरी म्हणजेच काँग्रेसनिष्ठ मतदारांपासून दुरावला आहे. वर्धेलगतच्या पिपरी, सिंदी, बोरगाव, सालोड, नालवाडी हा खेडेवजा शहरी वसाहतीचा परिसर मतदारसंघाला जोडला गेला आहे.
१९९५ चा अपवाद वगळता प्रमोद शेंडेंना सातत्याने विजय मिळाला. त्यामुळे वर्धेच्या विकासाचे श्रेय-अपश्रेयाचा हिशेब त्यांच्याच नावे लागतो. मात्र, शेंडे हे श्रेयाचेच धनी असल्याची आकडेवारी आहे. शेंडेंनी ‘गाव तेथे रस्ता, रस्ता तेथे एस.टी.’ हा विकास फोर पूर्वीच साधला. त्यानंतर डांबरीकरण व आता सिमेंटीकरणाचे ईप्सित गाठले. रस्ता, पाणी, आरोग्य सेवा, दळणवळण, सिंचन व प्राथमिक शिक्षण यात वर्धा राज्यात अव्वल झाल्याचा दावा शेंडेंकडून केला जातो. त्यांच्या कामाच्या स्वरूपाबद्दल पक्षांतर्गत तसेच, पक्षविरोधी नेतेही एक शब्द विरोधात बोलत नाही, यातच शेंडेंचे कार्यस्वरूप स्पष्ट व्हावे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी वर्धेच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करताना शेडेंचा केलेला गौरव आजही नमूद केला जातो.
विकास कामांसाठी येणारा निधी खर्ची घालतानाच स्वत:च्या आमदार निधीचा पै न् पै मार्गी लागावा म्हणून त्यांनी कटाक्ष ठेवला परंतु विशेष बाब म्हणजे, विधान परिषद आमदारांचा (जे राज्यात कुठेही निधी देऊ शकतात) निधीही विकास कामांसाठी खेचला. किशोर काशीकर, निशीगंधा मोगल, खतीब, रणजीत देशमुख, रामदास फु टाणे, उल्हास पवार, सुधाकर गणगणे, शिवाजीराव देशमुख, धनाजीराव साठे, प्रा. फ ौजिया खान, शरद रणपिसे या निधान परिषद सदस्यांचा निधी शेंडेंनी वर्धेत वळवला. सर्वपक्षीय आमदारांकडून असा निधी खेचत शेंडेंनी वर्धा विभागात पायाभूत सेवांचे विणलेले जाळे सर्वाच्या क ौतुकास पात्र ठरले आहे. शिवाय, सिंचनाच्या पूर्वीच्या सोयींमध्ये मदन उन्नयी धरणाची भर पडली आहे. राज्यात सर्वाधिक परिपूर्ण गृहरक्षक दल, अशी पावती मिळालेले वर्धेचे गृहरक्षक कार्यालय, काउ बॅक, हेलीपॅड, दहेगावला पोलीस ठाणे, सेवाग्राम ठाण्याची नवी सुसज्ज इमारत, आदिवासी खेडय़ांची दूरध्वनीने जोडणी, नागपूर विभागीय आदिवासी प्रकल्पात सर्वाधिक सोयी वर्धा विभागात खेचणे, विहिरी व घरकुल वाटप, विद्युत जोडणी, वर्ग खोल्यांचे बांधकाम, प्रवासी निवारा, धोबीघाट, प्रतीक्षा कक्ष, पशुवैद्यकीय दवाखाने, बालउद्यान कं पाउंड, पूल, आरोग्य कें द्र अद्ययावत करणे, धाम नदी घाटाचे सौंदर्यीकरण, लघु आरोग्यकेंद्र उभारणी, दलित वस्ती, घरकुल, सामाजिक सभागृह असा शेंडेंच्या कामाचा आवाका शहरी, खेडी चौफु ल्या, तांडे परिसरात पोहोचल्याची आकडेवारी आहे.
विकास कामांची अशी गंगा आणतानाच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावर शेंडेंना खंत वाटते. शेतकरीच नव्हे तर, अडला अडाणी ग्रामीण माणूस जेव्हा शासकीय अधिकाऱ्यांकडून त्रस्त होतो, तेव्हा शेंडेचे वाग्बाण अधिकाऱ्यांना घाम फ ोडत असल्याचे चित्र प्रशासनास नवे नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे तात्कालिक नसून सामाजिक-आर्थिक पैलू त्यास कारणीभूत ठरल्याचे आमदार शेंडेंचे प्रतिपादन आहे.

मार्गी लागलेली कामे
* मदन उन्नयी धरण,
* सेवाग्राम ठाण्याची नवी सुसज्ज इमारत,
*आदिवासी खेडय़ांची दूरध्वनीने जोडणी,
* लघु आरोग्यकेंद्र उभारणी,
* दलित वस्ती, घरकुल, सामाजिक सभागृह
अपूर्ण राहिलेली कामे
* रस्ते, पाणी, आरोग्य व प्राथमिक शिक्षणाच्या सुविधांबाबत ओरड नाही पण, सौंदर्यीकरण किंवा डागडुगी मात्र शिल्लक
*धाम नदी घाट परिसराचे तसेच, दिवंगत कुसुमताई देशपांडे यांच्या स्मारकाचे नव्यानेच मंजूर झालेले काम. निधी मंजूर मात्र शहरातील नव्या मार्गाचे काम अर्धवट
*बेरोजगारांसाठी नव्या उद्योगांची उभारणी, औद्योगिक वसाहतीचा चेहरा बदलण्याचे प्रयत्न झालेले नाही.
महत्त्वाचे प्रश्न
*नव्या उद्योगांची उभारणी
* आरोग्यकेंद्र उभारणी
पुन्हा निवडून आल्यास
यावेळी निवडणुकीस उभे राहणार नसल्याची आमदार प्रमोद शेंडे यांची घोषणा.