Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी विविध कार्यक्रम
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नगरसेवक प्रगती पाटील यांच्या पुढाकाराने रक्तदान व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी पक्षाचे नेते गिरीश गांधी व नगरेसवक वेदप्रकाश आर्य व डॉ. सेनगुप्ता उपस्थित होते. यावेळी ५१ कार्यकर्त्यांंनी रक्तदान केले असून त्यात महिलांचा समावेश जास्त होता. याशिवाय रक्तगट तपासणी, सोनोग्राफी, रक्तदाब, इसीजी तपासणी करण्यात आली. यावेळी गिरीश गांधी म्हणाले, शरद पवार यांना पंतप्रधानपदी बसविण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते कुठेतरी कमी पडले आहे. महिलांच्या विकासासाठी, दलितांसाठी, शेतकऱ्यांसाठी व युवकांसाठी असलेले धोरण सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करणे आवश्यक आहे. पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांंनी प्रयत्न करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी वेदप्रकाश आर्य यांचे भाषण झाले.
यावेळी डॉ. सेनगुप्ता यांचा अजय पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन जावेद हबीब यांनी केले. आभार अजय पाटील यांनी मानले.
गणेशपेठमधील पक्षाच्या कार्यालयात शहराचे उपाध्यक्ष यादव वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला राजा खान, देविदास घोडे, राजू नागुलवार, राजेश माटे, विजय चिटमिटवार, अनिल मदने, ऋषी कारोंडे, ईश्वर बाळबुधे, महेंद्र भांगे, मधुकर बुचे, ताराचंद चरडे आदी उपस्थित होते. ग्रामीण कार्यालयात जिल्हाध्यक्ष सदानंद निमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी निमकर म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटना मजबूत करून शरद पवार यांचे हात मजबूत करा, असे आवाहन केले. प्रवीण कुंटे यांनी दहा वर्षांतील अहवाल सादर केला. यावेळी सेलचे अध्यक्ष मधुकर भावसार, सुनील रावत, राजाभाऊ आकरे, महेश बंग, नीलेश दुबे, एजाज खान, आशीष पाटील, अनिता दरणे, योगिता देवतळे आदी उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. लाईफ लाईन बल्ड बँकेचे डॉ. रवि भांगे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी रक्तदान शिबिरासाठी सहकार्य केले. यावेळी नीलेश दुबे, आशीष पाटील, राजाभाऊ ताकसांडे, राजाभाऊ आकरे, डॉ. विलास मूर्ती, ओमप्रकाश खिरवार, ललित देवारे उपस्थित होते.