Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

(सविस्तर वृत्त)

तरुणसागर महाराजांच्या चातुर्मास कार्यालयाचे उद्घाटन
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

 

लकडगंज कच्छी विसा भवनासमोरील साजन गोयल यांच्या निवासस्थानी तरूणसागर महाराज यांच्या चातुर्मास कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी आसाराम नाहटा, बिरदीचंद चोरडिया, साजन गोयल, अरविंद कोटेचा, रमेश मोदी, कार्याध्यक्ष संतोष जैन पेंढारी, चंद्रकुमार रावंका, नरेश पाटनी उपस्थित होते.
तरूणसागर महाराज एका राज्यात एकदाच चातुर्मास करतात पण, महाराष्ट्रात यापूर्वी नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद येथे चातुर्मास झाले असून चौथा चातुर्मास नागपुरात आयोजित करण्यात आला आहे. तरूणसागर महाराज २१ किंवा २२ जूनला शहरात येणार असून इतवारी येथून २८ जूनला कच्छी विसा भवनासमोरील माधोकुंज येथे त्यांचे आगमन होईल. ५ जुलैला सकाळी ८.३० वाजता तरूणसागर महाराजांचे प्रवचन, ६ जुलैला वर्षांयोग मंगल कलश स्थापना, ७ जुलैला गुरू परिवार संमेलन, प्रत्येक रविवारला प्रवचन आणि २ ते १६ ऑगस्ट दरम्यान कडवे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
चातुर्मास कार्यक्रमाकरता विविध समित्या तयार करण्यात येत असून इच्छुकांनी संतोष जैन पेंढारी, ९८२२२२५९११, नरेश पाटनी ९८२३०१०४९७ यांच्याशी संपर्क साधावा.