Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

‘कायद्याचे राज्य आहे हे दाखवून द्या’
गुन्हे आढावा परिषदेत पोलीस अधीक्षकांच्या सक्त सूचना
नगर, १० जून/प्रतिनिधी
पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी छोटय़ा-छोटय़ा अडचणी न सांगता सक्षमपणे काम करावे. कायद्याचे राज्य आहे हे दाखवून देऊन जिल्हा दलाची प्रतिमा उंचवावी, अशी सक्त सूचना नवे जिल्हा पोलीस अधीक्षक विजय चव्हाण यांनी त्यांच्या पहिल्या गुन्हे आढावा परिषदेत आज केली.
चव्हाण यांनी आज पोलीस मुख्यालयात वरिष्ठ व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची आढावा परिषद घेतली. सूत्रे स्वीकारून आपल्याला तीनच दिवस झाले आहेत.

निळवंडय़ाच्या भूपृष्ठीय जलविज्ञान अभ्यासास मान्यता
केंद्राच्या निधीचा मार्ग मोकळा

प्रकाश टाकळकर
अकोले, १० जून

पंच्याहत्तर टक्के विश्वासार्हतेप्रमाणे निळवंडे प्रकल्पाच्या भूपृष्ठीय जलविज्ञान अभ्यासास (‘हैड्रॉलिजीस’) केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिली आहे. अंतिम मान्यता मिळण्यासंदर्भातील प्रमुख अडथळा दूर झाला असून, पुढील चार-सहा महिन्यांत नियोजन आयोगाची मान्यता अपेक्षित आहे. त्यामुळे निळवंडे प्रकल्पास केंद्र सरकारच्या विविध योजनांचा निधी उपलब्ध होऊ शकेल.

‘सायकलींचा पुरवठा न करणाऱ्या मीना एन्टरप्रायझेसला काळ्या यादीत टाका’
जिल्हा परिषदेची तक्रार
नगर, १० जून/प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने ९ लाख रुपये किमतीच्या सायकलींचा पुरवठा करण्याचा आदेश देऊनही पुरवठा न करणाऱ्या मीना एन्टरप्रायझेजला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस जिल्हा परिषदेने केल्याचे समजले. सायकलींचा पुरवठा न होण्यामागे वेगळेच गौडबंगाल असल्याचे समजले. नाशिक जिल्ह्य़ातील निफाड येथील ही संस्था आहे.

महसूल व पोलिसांमधील सुसंवादाअभावी तंटामुक्ती ठप्प
अभियानाला गती देण्याची तंबी
नगर, १० जून/प्रतिनिधी
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे महसूल आणि पोलीस यांनी संयुक्तपणे राबविण्याचे अभियान आहे. या दोन घटकांमध्ये काही ठिकाणी समन्वय नसल्याने तेथे अभियान थांबलेले दिसते. याची संबंधितांनी दखल घ्यावी व सुधारणा करून अभियानाला गती द्यावी, अशी तंबी प्रभारी जिल्हाधिकारी बी. आय. केंद्रे यांनी आज दिली.

भय इथले संपत नाही..
अगदी बालपणी ‘बागुलबुवा’ या काल्पनिक, पण खरोखरीच कुठंतरी वावरणाऱ्या भीतीची आपली ओळख झालेली असते. बागुलबुवाचं भय दाखविणाऱ्या व्यक्तीचा हेतू नसतो तसा वाईट, पण त्या मनात निर्माण झालेल्या आणि खरं तर त्यामुळे अधिकच भयंकर दिसणाऱ्या त्या भयाकाराची पुढं साऱ्या आयुष्यभर, विविध वळणावर आणि निरनिराळ्या रूपांत मनापासून नकोच असणारी सोबत सावलीगत असते पाठलाग करीत. भीतीचं भूत म्हणतात ते लहानपणीच जे मानगुटीवर बसतं ते आयुष्यात बहुधा न उतरण्यासाठीच.

आरोपांच्या फैरींनीच साजरा वर्धापनदिन!
पाचपुतेंच्या विकासकामांचे पुस्तक
श्रीगोंदे, १० जून/वार्ताहर
वनमंत्री बबनराव पाचुते यांच्या पाच वर्षांंतील विकासकामांचे पुस्तक प्रसिद्ध करतानाच पक्ष बळकट करण्यासाठी तालुक्यात पुन्हा एकदा नव्या जोमाने सभासद नोंदणी हाती घेण्याचा निर्णय आज राष्ट्रवादीच्या बैठकीत घेण्यात आला. पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या बैठकीत घनश्याम शेलार पक्षशिस्तीचा भंग करीत असून, एसटी महामंडळाचे संचालक असताना त्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही करण्यात आला.

‘केडगाव दत्तक घेण्याचे आधी का सुचले नाही?’
कोतकर यांची विरोधकांवर टीका
नगर, १० जून/प्रतिनिधी
केडगाव पाणीपुरवठा योजनेचे काम बघून नगरमधील काही मंडळींना आता केडगाव दत्तक घ्यायची उकळी फुटत आहे. मात्र, इतकी वर्षे लोकप्रतिनिधी असताना त्यांना ही दत्तक योजना सूचत नव्हती, अशी टीका माजी महापौर संदीप कोतकर यांनी केली.

‘दाखल्यांसाठी ‘सेतू’त गर्दी नको;
शाळा-महाविद्यालयाशी संपर्क साधा’
नगर, १० जून/प्रतिनिधी
‘दाखला आपल्या शाळेत’ ही जिल्हा प्रशासनाची मोहीम विद्यार्थी व पालकांसाठीच आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही दाखल्यासाठी सेतू कार्यालयात गर्दी न करता आपल्या शाळा, महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रांताधिकारी महेश पाटील यांनी केले.

हजारेंच्या हत्येची सुपारी देणाऱ्यांवर कारवाई व्हावी
श्रीरामपूर, १० जून/प्रतिनिधी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या खुनाची सुपारी देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.जनआंदोलनाचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम क ोळपकर, शहराध्यक्ष रंजन लोखंडे, डॉ. राजाराम जोंधळे, रत्नाकर हरदास, जगदीश सोनार, रामदास वैद्य, सुरेश जाधव, रामराव दरेकर, वासुदेव भांबारे आदींनी पोलीस निरीक्षक शंकरराव जाधव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. हजारे यांच्या जीवाला धोका आहे. परंतु त्यांनी पोलीस संरक्षण नाकारले आहे. तरीदेखील सरकारने त्यांच्या जीविताची जबाबदारी घ्यावी, असे निवेदनात नमूद केले आहे.

शेतीमाल वाहतुकीच्या वाहनांवर श्रीरामपूरला जाणीवपूर्वक कारवाई
श्रीरामपूर, १० जून/प्रतिनिधी
शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा जाणीवपूर्वक बडगा उगारण्यात आला असून, त्याची झळ शेतकऱ्यांना बसत असल्याची तक्रार छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी केली आहे.शहरात वाळू, सिमेंट व वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात नाही. त्यामागे अर्थकारण आहे. क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक होते. परंतु शेतीमाल वाहनाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते. कारवाईत दुजाभाव केल्यास आंदोलन करण्याचा इशारा छावाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पटारे, तालुकाध्यक्ष विजय बडाख, दत्तात्रय करंडे, दीपक भालेराव, जितू चव्हाण यांनी दिला.

‘नवसाला पावणारी मतमाऊली’चित्रपट काढणार - माळवेकर
श्रीरामपूर, १० जून/प्रतिनिधी

ख्रिश्चन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हरेगाव येथील मतमाऊलीवर तरूण दिग्दर्शक समीर माळवेकर यांनी ‘नवसाला पावणारी मतमाऊली’ हा चित्रपट काढण्याचे जाहीर केले.माळवेकर हे कॅटराईज मोशन एंटरटेंन्मेंट बॅनरखाली चित्रपट तयार करीत असून, चित्रपटात ग्रामीण कलाकारांना संधी दिली जाणार आहे. माळवेकर हे स्वत अभिनेते असून, मुंबई येथील प्रसिद्ध निर्माता निखिल अडवाणी यांच्या ‘पीपल्स ट्री’ या चित्रपटाच्या निर्मितीच्या कामात ते साहाय्य करीत आहेत.