Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

‘.. तर टोळ्यांच्या विरोधात सेनेच्याही टोळ्या’
प्रतिनिधी / नाशिक

गुंडगिरी आणि गुन्हेगारी घटनांचा रतीब शहरात अव्याहत सुरू असताना एकाच रात्री सिडको परिसरातील सुमारे ४० वाहने जाळण्याचा ‘पराक्रम’ करून स्थानिक गुंड टोळ्यांनी आपली दहशत कमालीची वाढविली आहे. त्याबरोबरच अवैध धंद्यांना लगाम आणि गुंडांना तडीपार करण्याच्या पोलिसांनी सुरू केलेल्या हालचालींना उत्तर म्हणून हे कृत्य असल्याचे काही पोलीस अधिकारी सांगत असल्याने एकप्रकारे ते संपूर्ण यंत्रणेलाच खुले आव्हान ठरत आहे. घडल्या घटनेबद्दल शहरातल्या सगळ्या भागांमध्ये तसेच सर्व स्तरातून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून पोलिसांची निष्क्रियता, गुन्हेगारांना मिळणारा राजकीय आसरा आणि नेतेमंडळींचा वरदहस्त हीच त्यामागची कारणे असल्याचे स्पष्ट होत आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या गुन्हेगारी कारवायांमुळे सर्वसामान्य नाशिककरांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास उडत चालला आहे. एवढे होऊनही अर्ज-निवेदनांसारख्या दिखाऊगिरीव्यतिरिक्त राजकीय पक्षांकडे कोणताही कार्यक्रम दिसत नाही. या पाश्र्वभूमीवर, सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची काय भूमिका आहे, त्याचा वेध घेणारी ही मालिका..

राष्ट्रवादीचा असाही ‘पण’!
प्रतिनिधी / नाशिक

गुंडगिरी आणि गुन्हेगारी घटनांचा रतीब शहरात अव्याहत सुरू असताना एकाच रात्री सिडको परिसरातील सुमारे ४० वाहने जाळण्याचा ‘पराक्रम’ करून स्थानिक गुंड टोळ्यांनी आपली दहशत कमालीची वाढविली आहे. त्याबरोबरच अवैध धंद्यांना लगाम आणि गुंडांना तडीपार करण्याच्या पोलिसांनी सुरू केलेल्या हालचालींना उत्तर म्हणून हे कृत्य असल्याचे काही पोलीस अधिकारी सांगत असल्याने एकप्रकारे ते संपूर्ण यंत्रणेलाच खुले आव्हान ठरत आहे. घडल्या घटनेबद्दल शहरातल्या सगळ्या भागांमध्ये तसेच सर्व स्तरातून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून पोलिसांची निष्क्रियता, गुन्हेगारांना मिळणारा राजकीय आसरा आणि नेतेमंडळींचा वरदहस्त हीच त्यामागची कारणे असल्याचे स्पष्ट होत आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या गुन्हेगारी कारवायांमुळे सर्वसामान्य नाशिककरांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास उडत चालला आहे. एवढे होऊनही अर्ज-निवेदनांसारख्या दिखाऊगिरीव्यतिरिक्त राजकीय पक्षांकडे कोणताही कार्यक्रम दिसत नाही. या पाश्र्वभूमीवर, सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची काय भूमिका आहे, त्याचा वेध घेणारी ही मालिका..

नुकसानीच्या पाहणीसाठी नेत्यांमध्ये चढाओढ
प्रतिनिधी / नाशिक

गुंड टोळ्यांकरवी सिडको परिसरात वाहनांची जाळपोळ करण्यात आल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी राजकीय मंडळींमध्ये जणू चढाओढ लागली होती. सकाळी खा. समीर भुजबळ यांनी तर दुपारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी घटनास्थळी भेट देवून नागरिकांशी चर्चा केली. घटनेमुळे हादरलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या नेत्यांकडून झाला.

शासकीय अभियंते सामुदायिक रजेवर गेल्याने कार्यालयीन कामकाज विस्कळीत
प्रतिनिधी / नाशिक
राज्य शासनात कार्यरत अभियंत्यांना केंद्र शासनाच्या वेतनश्रेणीनुसार वेतन मिळावे या मागणीसाठी बुधवारी जिल्ह्य़ातील सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, महापालिका, जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील शेकडो अभियंते एक दिवसाच्या सामुदायिक रजेवर गेल्याने या कार्यालयांमधील कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले. या प्रश्नी त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलनाच्या पुढील टप्प्यात २२ जून रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा महासंघाने स्पष्ट केले आहे.

प्रेरक!
विज्ञान प्रसारक, आकाश निरीक्षक, खगोलतज्ज्ञ, दुर्बिणी व आकाश निरीक्षणाच्या फिल्टर्सचे तंत्रज्ञ, फलज्योतिषाचे कट्टर विरोधक, सुमारे पाऊणशे पुस्तकांचे लेखक, कवी, व्याख्याते, हाडाचे शिक्षक.. अशा नानाविध विशेषणांनी सुधाकर भालेराव यांचे व्यक्तिमत्व समृद्ध झाले आहे. याशिवाय, वि. स. खांडेकरांचे लेखनिक, डॉ. जयंत नारळीकरांचे निकटचे स्नेही ही देखील त्यांची ओळख बनून राहिली आहे. खगोल, विज्ञान, शिक्षण, साहित्य या क्षेत्रांमध्ये निस्पृहपणे बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांना डझनावारी पुरस्कारांनी गौरवण्यात तर आले आहेच, पण अध्यापन आणि विज्ञान लोकप्रियतेचे कार्य याची दखल घेऊन भालेराव यांचा एकदा नव्हे दोनदा अत्यंत प्रतिष्ठेच्या राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे, हे विशेष!

‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ला प्रथम पुरस्कार
कोल्हापूर, १० जून / विशेष प्रतिनिधी

रसिकप्रेक्षकांना उत्तमोत्तम चित्रपटांची अनुभूती आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरलेल्या तरुणांची पाठशाळा अशी दुहेरी भूमिका सशक्तपणे बजावणारे व्यासपीठ म्हणून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढे येतो आहे. अशा व्यासपीठाला अधिकाधिक सशक्त बनवून रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक संस्था व शासनकर्ते यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल यांनी येथे व्यक्त केले. दरम्यान, समारंभात महोत्सवात दाखविण्यात आलेल्या चित्रपटांपैकी सर्वात प्रथम प्रेक्षकपसंतीचा चित्रपट म्हणून परेश मोकाशी दिग्दर्शित हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

कार्यक्षम वीजसेवेसाठी कर्मचाऱ्यांनी तयार रहाण्याचे आवाहन
नाशिक / प्रतिनिधी

वीज ग्राहकांच्या अपेक्षा उंचावल्या असून कर्मचाऱ्यांनी कार्यक्षम सेवा देण्यासाठी आवश्यक असलेला बदल स्वीकारण्यास तयार रहावे, असे आवाहन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता पदाचा नुकताच पदभार स्वीकारलेले एस. टी. वलेकर यांनी केले. कार्यकारी अभियंता चंद्रशेखर हुमणे यांच्या गौरव समारंभात प्रमुखपाहुणे म्हणून ते बोलत होते. गेली साडेचार वर्षे शहरात वीज वितरणाची जबाबदारी हुमणे यांनी सांभाळली. नुकतीच त्यांची बदली झाल्यामुळे त्यांचा सपत्नीक सत्कार वलेकर यांच्या हस्ते येथील रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता एस. ए. चौधरी, हुमणे व त्यांच्या जागी हजर झालेले कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटील यांचे स्वागत करण्यात आले. अधीक्षक अभियंता एस. ए. चौधरी यांनी नाशिक शहर मंडळातील वीज समस्यांचा नव्याने आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. सुभाष काकड, हि. रा. जाधव, शैलजा महाजन, बी. एन. सावंत, शिवाजी अहिरे, प्रकाश राजभोज, साळी वनित आदी वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अनिल बागूल यांनी केले. आभार निलेश रोहणकर यांनी मानले.

आश्रमशाळा शिक्षक संघटनेचे मेळावे
नाशिक / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेच्यावतीने आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळातील कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न व अडीअडचणी समजून घेण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, कळवण, राजूर, नंदुरबार, तळोदा आणि यावल असा विविध प्रकल्पात २० जून २००९ पासून मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने खाजगीकरण, उदारीकरण, जागतिक मंदी, सहाव्या वेतन आयोगाच्या जाचक अटी आदी बाबींचा शासकीय नोकऱ्यांवर होणारा विपरित परिणाम या विषयावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड तसेच अन्य पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. २० ते २८ जून या दरम्यान हे मेळावे होणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस डी. एस. इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली.

सिंधुताई दांडेकर यांचे निधन
नाशिक / प्रतिनिधी
अभिनव भारत चळवळीतील अग्रणी रघुनाथ चिंतामण आमडेकर यांची कन्या सिंधुताई विष्णुपंत दांडेकर यांचे ८७ व्या वर्षी निधन झाले. सिंधुताई या उत्कृष्ट प्रवचनकार व वक्त्या म्हणून ख्यातकीर्त होत्या. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र व स्टेट बँकेचे शाखाधिकारी बाळकृष्ण दांडेकर, तीन कन्या व नातवंडे असा परिवार आहे.