Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९


सटाणा नगराध्यक्षपदी पांडुरंग सोनवणे व उपनगराध्यक्षपदी सुमनबाई सोनवणे यांची अविरोध निवड झाल्यानंतर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला. अभिवादन करताना नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष

‘.. तर प्रशासकीय सेवेमध्ये ग्रामीण टक्का वाढेल’
मालेगाव / वार्ताहर

केंद्रीय अथवा राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठीची बुद्धिमत्ता केवळ शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्येच असते, असे नाही तर ग्रामीण विद्यार्थ्यांमध्येही ती ठासून भरलेली असते. मात्र आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शनाअभावी ग्रामीण भागाची या परीक्षांध्ये पिछेहाट होत असते. जर योग्य वेळी योग्य मार्गदर्शन लाभले आणि चांगल्या आत्मविश्वासाने ग्रामीण विद्यार्थी या परीक्षांना सामोरे गेले तर प्रशासकीय क्षेत्रात ग्रामीण टक्का वाढण्यास मदत होईल, असा विश्वास भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत ३२८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या येथील नितीन सुभाष येवला यांनी ‘वृत्तान्त’ कडे व्यक्त केला आहे.

जळगाव महापालिकेचा अजब कारभार
गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या कर्मचाऱ्यावर समिती प्रमुखाची जबाबदारी

वार्ताहर / जळगाव

महापालिकेचे अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांवर गैरव्यवहार व नियमबाह्य़ कामे करण्याचे आरोप होत असताना त्यांना पाठिशी घालण्यात येत असल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच गंभीर आरोप असलेल्या मधुकर आळंदे या कर्मचाऱ्याची प्रभाग समिती प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. माहितीच्या अधिकारात मागितलेली माहितीही आयुक्तांनी दिली नाही, असा आरोप काँग्रेसचे कार्यकर्ते उल्हास साबळे यांनी केला आहे.

दहावीच्या उत्कृष्ट निकालासाठी असाही ‘फॉम्र्युला’
मनमाड / वार्ताहर

आ पल्या संस्थेचा दहावी परीक्षेचा निकाल दर्जेदार लागावा म्हणून नवव्या इयत्तेतच मोठी कात्री लावण्याचा प्रकार नांदगाव तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या छत्रे न्यू इंग्लिश स्कुलमध्ये होत असल्याचे नाशिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी उघडकीस आणले आहे. शाळेतील शिक्षकांवर अकार्यक्षमतेचा ठपकाही चौकशी अहवालात जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी ठेवला आहे.

गणवेशाच्या रंगावरून शिक्षकांमध्ये असंतोष
शहादा / वार्ताहर

नंदुरबार जिल्ह्य़ातील सुमारे तीन हजार प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेने गणवेश निश्चित करण्याचे ठरविले आहे. नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने या निर्णयाचे स्वागत केले असले तरी गणवेशाच्या रंगाबद्दल असंतोष वाढू लागला आहे.