Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

मानसिक आरोग्य
डॉ. प्रदीप पाटकर
कशी कुणाशी जडती नाती..

जन्मप्राप्त नाती, वाटेत सापडून दृढ झालेले मैत्र, दोन जिवांना जोडणारे प्रेम या काही विलक्षण गोष्टी आहेत. मानवी मनाचे सौंदर्य वाढविणाऱ्या, संस्कृती समृद्ध करणाऱ्या, जीवनार्थाची चाहूल देणाऱ्या, समाजाला आकार, आधार व पोषण देणाऱ्या अशा या गोष्टी आहेत. काही नाती झाडावरील फुलासारखी जपली (झाडापासून तोडली नाही तर) तर टवटवीत राहतात. काही नाती त्यांच्या मानसिक आधारांपासून तोडली व रुक्ष अतिशिस्तित, अवाजवी र्निबधात, मिठीऐवजी मुठीत वागविली तर कोमेजून जातात, त्यांचे निर्माल्य तेवढे हाती उरते.

सांस्कृतिक कट्टा
निखळ पत्रसंवाद

पत्र म्हणजे दोन व्यक्तींमधला संवाद.. विचार, भावनांची देवघेव.. परस्परांमध्ये दृढ होणारं एक निकोप नातं.. पत्र लिहिण्यातली, वाचण्यातली मजा ज्याची त्यालाच ठाऊक. मग हा पत्रसंवाद दोन सामान्य माणसांमधला असो वा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींमधला.. प्रतिष्ठित व्यक्तींमधल्या पत्रसंवादाला तर त्याला वेगळंच महत्त्व प्राप्त होतं. समाजातील अशाच दोन वलयांकित व्यक्तींमधला पत्रसंवाद पुस्तकरूपाने नुकताच प्रसिद्ध झाला आहे. ‘एक संपादक..एक लेखिका..’ हे त्या पुस्तकाचे नाव. शंकरराव किर्लोस्कर आणि आनंदीबाई शिर्के यांच्यातील हा पत्रसंवाद आहे. तो संपादित केला आहे डॉ. अंजली सोमण यांनी. आणि पद्मगंधा प्रकाशनाने तो प्रकाशित केला आहे.

घडामोडी
औरंगाबाद
बळी भ्रष्ट कारभाराचा

३० मे. स्थळ - प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय. अचानक एक तरुण प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक गिरी यांच्या दालनात येतो. दालनात येऊन कनिष्ठ लिपिक असणाऱ्या वडिलांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत घ्यावे अशी मागणी करतो आणि अचानक खिश्यातील पिस्तूल बाहेर काढून लेखापाल धर्माजी कोंडावार यांच्यावर गोळ्या झाडून पलायन करतो. हे एखाद्या चित्रपटात शोभेल असे दृश्य. प्रत्यक्षात मराठवाडय़ाच्या राजधानीत घडले. या थरार आणि गोळीबाराने सारेच जण हबकले.