Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

श्रेयासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत चढाओढ
प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न
पिपरी, १० जून / प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकांचे पडघम सुरू होताच पिपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात चांगलेच राजकारण सुरू झाले असून हा प्रश्न सोडविण्याचे श्रेय घेण्यासाठी दोहोंमध्ये तीव्र रस्सीखेच सुरू झाली आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या विषयासंदर्भात लवकरच बैठक होणार असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला लाखभर नागरिकांशी संबंधित असलेला हा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

सानेगुरुजी मृत्युंजय योद्धा
नितीन पवार

काल-परवा अगदी सहजच ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी हरिभाऊ लिमये यांची गाठ घ्यायला गेलो होतो. खिशात खेळण्याचा चेंडू ठेवण्याच्या वयात स्वातंत्र्यलढय़ात बॉम्बपूरक रसायने ठेवणारे ‘निर्भय’ हरिभाऊ आज वयाची ८५ वर्षे ओलांडली तरी तसेच दिसतात. हो, अगदी शरीरानेही गुलाबी कांती, ताठ कणा व निरागस मन अजूनही जपले आहे. त्यांना भेटून आले की, अनेक क्षुद्र विचारांची पुटे आपोआपच गळून पडतात. त्या दिवशीही समान अनुभव मिळाला. ‘

टेंडर सेलचे टेंडर
मुकुंद संगोराम

कोणत्याही व्यवस्थेत जेव्हा पारदर्शकता असत नाही, तेव्हा, भ्रष्टाचाराला आपोआप खतपाणी मिळत राहते. महापालिकेतील टेंडर नावाचे प्रकरण हे तेथील भ्रष्टाचाराचे मूळ आहे, हे पालिकेतील सर्व संबंधित घटकांना पुरेसे माहीत आहे. देशातील कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत टेंडर हे चराऊ कुरण झाले आहे, कारण त्यात पुरेशी पारदर्शकता ठेवण्यात आलेली नाही. काही वेळा ती मुद्दामही ठेवण्यात येत नाही. त्यामुळे टेंडर भरणाऱ्या सगळ्या कंत्राटदारांचे फावते.

रेशनवर तीन वर्षांनंतर चांगला गहू व तांदूळ
पुणे, १० जून / खास प्रतिनिधी

केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी गहू व तांदळाचा अतिरिक्त कोटा उपलब्ध झाल्यानेशहरातील बहुतेक सर्वच स्वस्त धान्य दुकानातून आता गहू व तांदूळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तब्बल तीन वर्षांनंतर दारिद्रय़ रेषेवरील शिधापत्रिकाधारकांना (एपीएल) स्वस्त धान्य दुकानातून चांगल्या दर्जाचा गहू व तांदूळ मिळणार आहे.

निगडीतील वाढीव बांधकामे नियमित करण्याचा प्रस्ताव
मुख्यमंत्र्यांचे सभागृहात निवेदन
पिंपरी, १० जून / प्रतिनिधी
िपपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील निगडी येथील गृहयोजना प्रकल्पांमधील वाढीव बांधकामप्रकरणी शासनाने नियुक्त केलेल्या विभागीय आयुक्तांच्या समितीने शिफारस केल्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करुन ही बांधकामे नियमित करण्याच्या प्रस्तावावर शासन गांभीर्याने विचार करीत असल्याचे निवेदन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

पिंपरीत सत्तरपैकी चोपन्न नगरसेवकांची गैरहजेरी
राष्ट्रवादीचा दहावा वर्धापनदिन ‘सुन्या-सुन्या’ वातावरणात साजरा
पिंपरी, १० जून / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून न सावरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दहावा वर्धापनदिन िपपरी-चिंचवडमध्ये आज ‘सुन्या-सुन्या’ वातावरणात पार पडला. पक्षाच्या वतीने आयोजित मुख्य कार्यक्रमास ७० पैकी ५४ नगरसेवक तसेच महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनीच पाठ फिरवली.

‘माथाडी कामगारांचा आज लाक्षणिक बंद’
विधानभवनावर मोर्चाचे आयोजन
पिंपरी, १० जून / प्रतिनिधी
माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या (११जून) माथाडी कामगारांचा राज्यपातळीवर लाक्षणिक बंद तसेच विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

राजगुरू स्मारकाच्या कामातील भ्रष्टाचारविरोधी आंदोलन पेटण्याची चिन्हे
दोषी अधिकाऱ्यांवर सहा दिवसात कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
राजगुरुनगर, १० जून/वार्ताहर

हुतात्मा राजगुरु जन्मस्मारक भ्रष्टाचारप्रकरणीचे आंदोलनात आज राजगुरुनगरमध्ये बंद पाळण्यात आला व सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन पुणे-नाशिक महामार्गावर करण्यात आले. वारकऱ्यांचे नेते ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. त्यामुळे या आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केल्याचे स्पष्ट झाले.

पुणे-आग्रा रेल्वे २८ जूनपर्यंत दर रविवारी
पुणे, १० जून/ प्रतिनिधी

रेल्वेच्या वतीने पुणे-आग्रा ही विशेष गाडी २८ जूनपर्यंत दर रविवारी सोडण्यात येणार आहे. पुण्यातून ही गाडी रविवारी दुपारी दोन वाजून १० मिनिटांनी सुटणार असून, सोमवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास ती आग्र्याला पोहोचेल. आग्र्याला हून ही गाडी दर सोमवारी पावणेतीनच्या सुमारास सुटणार असून, मंगळवारी दुपारी तीन वाजून ३५ मिनिटांनी ही गाडी पुण्यात दाखल होईल. या गाडीला द्वितीय क्षेणीचे आठ आरक्षित डबे असणार आहेत. त्याचप्रमाणे एक वातानुकुलीत, चार जनरल व दोन स्लीपर कोच डबे जोडण्यात येणार आहेत.

वीज रोहित्रातील तांबे चोरणारे जेरबंद
देहू, १० जून / वार्ताहर

चिखली शेलारवस्ती येथील विद्यृत रोहित्रातील दोनशे लिटर ऑईल व ३० किलो तांब्याची तार असा सुमारे ७५ हजार रुपये किमतीचा माल चोरी केल्या प्रकरणी पोलीसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांना १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रामजित रामसबद चौहाण (वय ३० वर्षे, मुळ रा. चौकनिया.ता. डुमरियागंज, जि.सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश),धरमवीर राजू गौतम(वय १९, मुळ रा. चौकनिया, .ता. डुमरियागंज, जि.सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश), अतिकुर रहेमान राममुल्ला(वय १९, रा.हेरा कृष्णानगर, ता.जि. कपीलवस्तू, नेपाळ), सिराज अहमद ननकुमिया(वय २०,रा.हेरा कृष्णानगर, ता.जि. कपीलवस्तू, नेपाळ) अशी चोरटय़ांची नावे आहेत.

बस जाळपोळ प्रकरणी पाच जणांना अटक
पिंपरी, १० जून / प्रतिनिधी

पिंपरी काळेवाडी रस्त्यावर अपघात झाल्यानंतर टाटा मोटर्स कंपनीच्या दोन बस पेटविल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ॠतुराज वासुदेव कुलकर्णी (वय २१), गणेश सुखदेव झांजे (वय २२), हंबीराव आदिनाथ खंडागळे (वय ३८), संतोष विरभड आप्पा (वय २५) आणि विजय विलास लोंढे (वय १८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर ८ जूनला सायंकाळी पावणेचारच्या सुमारास श्रीनगर काळेवाडी लिंकरोडवर टाटा मोटर्स कंपनीच्या दोन बस पेटविल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी वीस लाख रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणात आणखी पंधरा जण फरार आहेत. याबाबत बसचा चालक विठ्ठल रामभाऊ कांबळे (वय ५५, रा. मराठी शाळेजवळ, रहाटणी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. अधिक तपास फौजदार बी. डी. कोळी करीत आहेत.

दुचाकी अपघातात एक ठार
पाटस, १० जून / वार्ताहर

भांडगाव (ता. दौंड) येथे पुणे-सोलापूर महामार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात दुपारी चारचे सुमारास घडला. अपघातात ब्रह्मदेव रामचंद्र ठेंगल (वय-३२) रा. यवत, पाटबंधारे वसाहत, मूळ गाव कुर्डुवाडी, जि. सोलापूर हे मृत्युमुखी पडले. ब्रह्मदेव ठेंगल हे पाटबंधारे कार्यालयात यवत येथे नोकरीस होते. काल दुपारी चारचे सुमारास ठेंगल व किसन चोरघे हे दोघेजण दुचाकीवरून कालव्याच्या पाण्याची पातळी घेण्यासाठी दुचाकीवरुन महामार्गाने जात होते. त्याचवेळी महामार्गावर टेस्टीबाईट कंपनीसमोर त्यांच्या दुचाकीस अपघात झाला. यामध्ये दोघेही जखमी झाले. ठेंगल यांना उपचारार्थ दौंड येथे नेल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी किसन चोरघेवर उपचार चालू आहेत. सहायक पोलीस निरीक्षक शंकर आवताडे तपास करीत आहेत.

महिला चित्रकारांसाठी प्रदर्शन व स्पर्धा
पुणे, १० जून / प्रतिनिधी
निवेदिता प्रतिष्ठान तर्फे संचालिका अनुराधा अंततुरकर भारती यांनी महिला चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी स्पर्धकांचे १५ ते २५, २६ ते ४५ व ४५ च्या पुढील अशा ३ गटात विभाजन केले आहे. स्पर्धा १२ जून ते १४ जून ०९ रोजी ‘पेन्टागॉन’ पर्वती टेलिफोन एक्सेंज शेजारी, पुणे येथे भरविण्यात येणार आहे. प्रसिद्ध चित्रकार श्री. रवी परांजपे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, परीक्षक म्हणूनही ते काम पाहणार आहेत. बक्षीस समारंभ १४ जून ०९ रोजी ठेवण्यात आला आहे. प्रत्येक वयोगटातील पहिल्या ३ क्रमांकासाठी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.