Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

सप्टेंबरमध्ये नागपुरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
नागपूर, १० जून / प्रतिनिधी

 

फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया आणि निर्झर फिल्म सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात प्रथमच येत्या सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांनी नुकतीच समितीच्या सदस्यांची बैठक घेतली असून त्यात चित्रपट महोत्सव आयोजित करण्यासंदर्भात कार्यक्रमाची रुपरेषा ठरवण्यात आली. या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकूण २५ चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
दरम्यानच्या काळात लघुचित्रपटांची स्पर्धा आयोजित करून त्यातील निवडक लघुचित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहे. इंडियन पॅनोरमातंर्गत मराठी तसेच इतर भारतीय भाषांमधील दर्जेदार चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. चित्रपट क्षेत्रातील दिग्दर्शक व कलाकार यांच्या उपस्थितीत अनेक चित्रपटांवर मुक्त चर्चा करण्यात येणार आहे. याबैठकीत निर्झर फिल्म सोसायटीचे विश्वस्त गिरीश गांधी, समीर नाफडे, आशीष फडणवीस, डॉ. मनिषा रुईकर, धनंजय पात्रिकर, दिलीप चव्हाण, सुरेंद्र मिश्रा उपस्थित होते.