Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

क्रीडा

द.आफ्रिका-इंग्लंड आणि न्यूझीलंड-आर्यलड लढत आज
लंडन, १० जून / एएफपी

ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा टप्पा आज संपला असून उद्या, शुक्रवारपासून या स्पर्धेतील ‘सुपर एट’ फेरीच्या महत्त्वपूर्ण टप्प्याला प्रारंभ होत आहे. दक्षिण आफ्रिका (ड-२) आणि इंग्लंड (ब-२) या ‘ई’ तसेच न्यूझीलंड (ड-१) आणि आर्यलड (अ-२) या ‘फ’ गटातील लढतीने या महत्त्वपूर्ण फेरीला सुरुवात होत आहे.

दक्षिण आफ्रि केने अखेरच्या चेंडूवर मारली बाजी
न्यूझीलंडची हार; मव्‍‌र्ह सामन्यात सर्वोत्तम

लंडन, १० जून/ पीटीआय

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेमधला साखळी सामना शेवटच्या चंडूपर्यंत रंगला आणि क्रिकेट जगताला एक वेगळयाच अनुभवाची प्रचीती आली. दक्षिण आफ्रिकेचे तुटपुंजे आव्हान आणि ब्रेन्डन मॅक्क्यूलमने न्यूझीलंडला करून दिलेली आक्रमक सुरुवात यामुळे हा सामना दक्षिण आफ्रिका जिंकेल असे कोणालाही वाटले नव्हते. पण फिरकीपटू व्हॅन डर मव्‍‌र्हने ब्रेन्डनला बाद केले आणि सामन्याचा नूरच पालटला. अंतिम दोन चेंडूवर आठ धावांची आवश्यकता असताना जेकब ओरामच्या बॅटची कड घेऊन चेंडूने सीमारेषा गाठली आणि सर्वांचेच टेन्शन अधिकच वाढले.

सेहवागने दुखापतीबाबत संघव्यवस्थापनाला ठेवले अंधारात
नॉटिंगहॅम, १० जून / पीटीआय

वीरेंद्र सेहवागच्या खांद्याला आयपीएलदरम्यानच दुखापत झाली होती, पण त्याने लंडन येथे ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठी भारतीय संघ दाखल होईपर्यंत त्याने ही गोष्ट लपवून ठेवल्याचे स्पष्ट होत आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघव्यवस्थापनाला सेहवागची ही दुखापत दोन-तीन दिवसांत बरी होईल, अशी अपेक्षा होती, पण सरावाच्या सामन्यात तो खेळू शकला नाही आणि बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही त्याला खेळता आले नाही. तेव्हाच त्याची दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याचे उघड झाले.

न्यूझीलंड दुखापतींच्या समस्येने ग्रस्त
लंडन, १० जून / एएफपी

न्यूझीलंडने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर एटमध्ये स्थान मिळविले असले तरी त्यांचा पुढील प्रवास फारसा सुखकर होण्याची चिन्हे नाहीत. संघातील सीनियर खेळाडूंना दुखापतीने ग्रासले असल्यामुळे संघापुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार डॅनियल व्हेटोरी डाव्या खांद्याच्या दुखापतीमुळे अजूनही खेळू शकलेला नाही. सलामीवीर जेसी रायडरलाही दुखापत सतावते आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो या दुखापतीमुळे खेळू शकला नाही.

जयसूर्या तळपला
श्रीलंकेने वेस्ट इंडिजला १५ धावांनी नमविले

नाट्टिंगहॅम, १०, जून/ पीटीआय

बऱ्याच दिवसांनी ‘बॅडपॅच’च्या चक्रव्यूहात अडकलेला श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आज तळपताना दिसला. त्याने सलामीवीर तिलकरत्ने दिलशानच्या साथीने संघाला १२४ धावांची भागीदारी करून दिली. या दोघांनी केलेल्या भक्कम पायाच्या जोरावरच श्रीलंकेने वेस्ट इंडिजला १५ धावांनी नमवित ‘क’ गटात अव्वल स्थान पटकाविले. ४७ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांनिशी ८१ धावा फटकाविणाऱ्या सनथ जयसूर्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

भारतीय कबड्डी महासंघाच्या उपाध्यक्षपदी किशोर पाटील
पेठवडगाव १० जून/ वार्ताहर

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या उपाध्यक्षपदी औरंगाबादचे माजी आमदार किशोर पाटील यांची एकमताने निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे कार्यवाह मोहन भावसार यांनी ही माहिती दिली.पाटणा येथे झालेल्या महासंघाच्या बैठकीत विविध पदाधिकारी व विविध समित्यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय निवड समितीत शांताराम जाधव (पुणे), राजू भावसार (एअर इंडिया) व माया आक्रे-मेहेर (मुंबई) या महाराष्ट्राच्या ज्येष्ठ खेळाडूंचा समावेश आहे. मुंबईचे ज्येष्ठ पंच विश्वास मोरे यांची पंच समितीच्या सचिवपदी निवड झाली आहे. महासंघाच्या अध्यक्षपदी राजस्थानचे जे. एस. गेहलोत यांची, तर सरचिटणीसपदी जगदीश्वर यादव (हैदराबाद) यांची एकमताने निवड झाली. उपाध्यक्ष म्हणून किशोर पाटील यांच्याबरोबरच के. प्रभाकरन (आंध्र प्रदेश), भानेश्वर कलिका (आसाम), विजय प्रकाश (हरयाणा), हेमंत झाला (गुजरात) यांचीही निवड झाली आहे. कार्याध्यक्षपदी कर्नाटकच्या एस. सीताराम यांची निवड करण्यात आली. सहयोगी उपाध्यक्ष म्हणून आर. आर. साहू (विदर्भ), सुरेंद्रकुमार (दिल्ली), एस. एस. रंधवा (चंडीगढ) यांना संधी देण्यात आली आहे. खजिनदारपदाची जबाबदारी उत्तर प्रदेशच्या जे.पी. अगरवाल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सहकार्यवाह म्हणून कुमार विजय (बिहार), कुलदीपकुमार गुप्ता (जम्मू व काश्मीर), एस. एस. लक्कड (मध्य प्रदेश), एल. सुब्रमण्यम (तामिळनाडू) यांची निवड झाली आहे. पंच समितीत गुजरातच्या दिनेश पाटील यांना संधी देण्यात आली आहे.

डबल ट्रॅप नेमबाजीत रंजन सोधीला रजत
नवी दिल्ली, १० जून / पीटीआय

बेलारुस येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदवित भारताच्या रंजन सोधीने डबल ट्रॅप प्रकारात रजत पदकाची कमाई केली.
सोधीने प्राथमिक फेरीत १४५ गुणांची कमाई करीत अंतिम फेरीत ४९ गुण साधत रजत पदक पटकावले. चीनचा बिनयान ह्य़ू प्राथमिक फेरीत १४७ तर अंतिम फेरीत ४९ गुण मिळवत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. रशियाच्या विटेली फोकीव याने प्राथमिक फेरीत १४२ गुण कमावले, तर अंतिम फेरीत ४८ गुणांची नोंद करीत ब्राँन्झ पदक मिळवले.