Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

दहशतवादी वाटाघाटींसाठी तयार होते, पण..

 

दहशतवाद्यांना वाटाघाटीत रस होता याचे संकेत ताज महल हॉटेलमधील अतिरेकी आणि त्यांचे पाकिस्तानातील म्होरके यांच्यातील मोबाईलवरील संभाषणावरून मिळत होते. या संभाषणाचा तर्जुमा ‘इंडियन एक्स्प्रेस’ला मिळाला आहे. हल्ला झाल्यानंतर सहातासांच्या आत चार अतिरेक्यांनी हॉटेलच्या हेरिटेज विंगचा ताबा घेतल्यानंतर २७ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.१० वाजता फोन केला.
फोन घेणारा : शुभेच्छा
फोन करणारा : शुभेच्छा! तीन मंत्री व एक कॅबिनेट सचिव तुमच्या हॉटेलमध्ये आहे. ते कोणत्या खोलीत आहेत ते आम्हाला माहिती नाही.
फोन घेणारा : वा! ही चांगली बातमी आहे. केकवर बर्फ साचल्यासारखे आहे.
फोन करणारा : त्या ३-४ जणांना शोध घ्या आणि भारताकडून तुम्हाला जे काही पाहिजे ते मागून घ्या.
फोन घेणारा : आम्हाला ते सापडू देत अशी प्रार्थना करा.
दुसऱ्या वेळी तर फक्त संकेताऐवजी अधिक अनुभवायला मिळाले. प्रत्यक्षात चाबाद हाऊसवर (नरिमन हाऊस) दोघा अतिरेक्यांनी हल्ला करून पाच मजली इमारतीचा ताबा मिळविल्यानंतर अमेरिकेतील चाबाद-ल्यूबाविट्च सेक्ट यांच्या समर्थकांनी हल्लेखोरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अतिरेक्यांशी थेट संपर्क साधण्यात आला आणि मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनीही अतिरेक्यांशी संपर्क साधावा, असा प्रयत्न केला गेला. मात्र याबाबत कुठलेही सुस्पष्ट धोरण अंमलात नसल्यामुळे तसेच संपर्कासाठी आवश्यक असणारी कॉन्फरन्स यंत्रणा नसल्यामुळे हा प्रयत्न सपशेल फसला. हल्ल्याच्या १२ तासानंतर म्हणजेच २७ नोव्हेंबरच्या सकाळी काय घडले याबाबतचा तपशील हा घ्या. बाबर इमरान आणि नासीर या दोघांनी कुलाब्यातील फारशा परिचित नसलेल्या इमारतीवर हल्ला केल्यानंतर वॉशिंग्टनमधील चाबादची राजनैतिक अधिकारी रब्बी लेव्ही शेमटॉव हिने नरिमन हाऊस चालविणाऱ्या रब्बी गेव्हरिअल बोल्टझ्बर्ग हिच्या मोबाईलवर संपर्क साधला. परंतु त्या मोबाईलवर जो कोणी बोलला ती भाषा न कळल्यामुळे त्याचा काहीच फायदा झाला नाही. खरेतर एक अतिरेकी उर्दूमध्ये बोलला होता.
त्यामुळे वॉशिंग्टन व न्यूयॉर्कमधील चाबाद-लूबविट्च समर्थकांनी उर्दू-हिंदी समजू शकणाऱ्या दुभाषाचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेरीस त्यांना न्यूयॉर्कमधील पेस विद्यापीठात शिकविणाऱ्या पी. व्ही. विश्वनाथ सापडले. नरिमन हाऊसमधील अतिरेकी आणि शेमटाव यांच्यात दुभाषा म्हणून वावरण्याची त्यांनी तयारी दर्शविली. शेमटाव, विश्वनाथ आणि इम्रान यांच्या पहिला कान्फरन्स कॉल सकाळी १०.३० वाजता झाला. विश्वनाथ यांनी अतिरेक्यांना पहिला प्रश्न विचारला की, सर्व ओलीस सुरक्षित आहेत का.‘हमने उनको थप्पड भी नही मारा’ असे उत्तर अतिरेक्यांनी दिले. अशा पद्धतीचे पाच कॉल केले गेले. ओलीस कसे आहेत, त्यांना जेवण वगैरे मिळते का याची चाबादच्या प्रतिनिधींनी चौकशी करताना अतिरेक्यांना बोलण्यामध्ये गुंतवून ठेवले.
परंतु सर्वात महत्त्वाचे संभाषण पहाटे झाले. दहा अतिरेक्यांपैकी एक अजमल अमीर कसाबला आदल्या रात्री मुंबई पोलिसांनी जिवंत पकडल्याची बातमी बाहेर पसरली. ती इम्रान आणि नासीर या दोघांना कळली होती. मात्र त्यांच्यापैकी कोणाला अटक केली होती याची त्यांना माहिती नव्हती. ‘हम भारत सरकारसे बात करना चाहते है. हमारा एक बंदा आपके कब्जेमे है, हमारे सामने उसे पेश कर दो’, असे त्यांनी विश्ननाथ यांना सांगितले.
(क्रमश:)