Leading International Marathi News Daily
गुरुवार, ११ जून २००९
  स्पेलिंग बी!
  ओपन फोरम
  ग्रूमिंग कॉर्नर - दिसतं तसं नसतं..
  क्रेझी कॉर्नर - ‘वाइफ इज ऑलवेज राइट’
  स्मार्ट बाय
  मेल बॉक्स
  दवंडी - गावकुसातली आकाशवाणी
  लँग्वेज कॉर्नर - जर्मनीतील ‘हरित क्रांती’
  यंग अचिव्हर्स - गवसलेलं क्षेत्रं
  एका लग्नाची गोष्ट
  इव्हेंटस कॉर्नर - शिल्पा आनंद यांचे ब्रायडल कलेक्शन
  नेट कॉर्नर - Little girl
with spunk!
  ब्यूटी कॉर्नर - मुलायम, घने लंबे बाल..

स्पेलिंग बी!
टीमला पेचात पाडणाऱ्या शब्दाने काव्याच विजेती हा आनंद मानतोय तोच तिला शेवटच्या शब्दाचं स्पेलिंग बरोबर सांगता आलं तरच ती विजेती घोषित होईल, हे समजल्यावर परत आपण पेचात पडतो आणि परीक्षक Laodicean ्ल हा शब्द उच्चारतात. तिचा शांतपणा आणि मागे बसलेल्या तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावरची खुशी पाहून अंदाज येतो की, हा शब्द तिला माहीत आहे. तरीही परीक्षकांना ती त्या शब्दाचा उच्चार, मूळ शब्द कुठून आला आहे. पर्यायी उच्चार काय आहे ते विचारते. एकेक अक्षराने आपलाही जीव भांडय़ात पडतो. टाळ्यांच्या कडकडाटात भला मोठा चषक तिच्या समोर येतो. आनंदाश्रू पुसत ती हसत चषक उंचावते. कार्यक्रम संपतो.

 

गुरुवार, २८ मे २००९. स्पेलिंग बी! वर्ष ८२ वे. स्पर्धेचा अंतिम टप्पा. स्पर्धक काव्या, ऐश्वर्या आणि टीम. ठरवणं कठीण जातं. पण वाटत राहतं की काव्या किंवा ऐश्वर्या दोघींपैकी एकीकडे विजेतेपद जावं. शांत गोड दिसणाऱ्या टीमनेही ही स्पर्धा जिंकावी असंही वाटत राहतं. आपल्याला नक्की कोण जिंकावं असं वाटतंय हे ठरवेपर्यंत ऐश्वर्याला बाद व्हावं लागतं ते Laodicean या शब्दाचं स्पेलिंग न सांगता आल्याने. राहिले काव्या आणि टीम. स्पर्धेच्या सुरुवातीला काव्या आणि सिद्धार्थ चंद यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल असा अंदाज होता. पण गेल्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलेल्या सिद्धार्थला त्या मानाने फार लवकर स्पर्धेतून बाद व्हावं लागलं, याचा सर्वानाच धक्का बसला. उभं राहून लोकांनी कौतुकाने केलेल्या टाळ्यांच्या कडकडाटात तो पालकांशेजारी जाऊन बसला, ते हाताच्या तळव्यात तोंड लपवूनच. टीमला पेचात पाडणाऱ्या शब्दाने काव्याच विजेती हा आनंद मानतोय तोच तिला शेवटच्या शब्दाचं स्पेलिंग बरोबर सांगता आलं तरच ती विजेती घोषित होईल, हे समजल्यावर परत आपण पेचात पडतो आणि परीक्षक छं्िरूींल्ल हा शब्द उच्चारतात. तिचा शांतपणा आणि मागे बसलेल्या तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावरची खुशी पाहून अंदाज येतो की, हा शब्द तिला माहीत आहे. तरीही परीक्षकांना ती त्या शब्दाचा उच्चार, मूळ शब्द कुठून आला आहे. पर्यायी उच्चार काय आहे ते विचारते. एकेक अक्षराने आपलाही जीव भांडय़ात पडतो. टाळ्यांच्या कडकडाटात भला मोठा चषक तिच्या समोर येतो. आनंदाश्रू पुसत ती हसत चषक उंचावते. कार्यक्रम संपतो.
दोन तासापेक्षा जास्त चाललेला हा कार्यक्रम रंगला तो मधून दाखवलेल्या स्पर्धकांच्या जीवनातील क्षणचित्रांनी. स्पर्धकांना घेऊनच केलेल्या जाहिरातीतून कळत होते स्पर्धेचे नियम आणि स्पर्धकांनी शब्दाचा अर्थ वाक्यातून स्पष्ट करायला सांगितला की, अर्थासाठी निवडलेली विनोदी वाक्यं सभागृहातलं वातावरण हलकं करत होती.
भारतीय मुलांसाठी काव्याचं विजेतेपद हे गेल्या दहा वर्षांतलं सातवं. या वर्षी जवळजवळ एक कोटी दहा लाख मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला. अंतिम टप्प्यात पोहोचले २९३ विद्यार्थी. यात होती ३२ भारतीय मुलं. उपांत्य फेरीतील ४१ मुलांपैकी भारतीय होती १४ आणि अंतिम फेरीत हा आकडा होता अकरापैकी सहा. ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान शाळा या स्पर्धेसाठी अर्ज भरतात. शाळेत प्राथमिक फेरी होते. त्यातील स्पर्धक आंतरशालेय स्पर्धेत पोचतात. सोळा वर्षं किंवा आठवीनंतर या स्पर्धेत भाग घेता येत नाही. या स्पर्धावर आधारित आतापर्यंत दोन चित्रपटही प्रसिद्ध झाले आहेत- ‘स्पेलबाऊंड’ आणि ‘अकिला अ‍ॅड द बी.’
स्पेलबाऊंड! २००२ साली अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्डसाठी नामांकित झालेला माहितीपट. बारा ते चौदा वयोगट असलेल्या, आठ स्पर्धक मुलांच्या दैनंदिन जीवनाचं चित्र दाखवीत माहितीपटाला सुरुवात होते. पाच मुली, तीन मुलगे. स्पर्धेसाठी रोजच्या रोज ती मुलं काय आणि कशी तयारी करतात. पालकांचा सहभाग, शाळांकडून मिळणारं उत्तेजन, भावंडांची मदत, गावातील लोकांना या मुलांबद्दल वाटणारा अभिमान, अशा कितीतरी बाजू या माहितीपटातून पुढे येतात. मुलांच्या कौटुंबिक पाश्र्वभूमीत वैविध्य असल्याने त्याचीही बाजू बघणं रंगतदार होतं. उपांत्य फेरीतील तीव्र स्पर्धेचं दर्शनही यातून घडतं. आठही मुलं आधीच्या वर्षी बाद होऊन पुन्हा या वर्षी स्पर्धेत भाग घेतलेली आणि या वेळेस विजेतेपद मिळवायचं, असा ध्यास धरलेली प्राथमिक फेरीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत या मुलांना कॅमेऱ्यात बंदिस्त केलं आहे. यात आहेत नूपुर लाला आणि नील कडाकिया, दोन्ही भारतीय कुटुंबातील सुखवस्तू घरातील मुलं.
नीलचे वडील त्याची या स्पर्धेसाठी तयारी करून घेत आहेत. वडिलांनी आतापर्यंतच्या स्पर्धेतील सगळे शब्द एकत्र तर केले आहेतच पण कोणत्या शब्दामुळे मुलं हरली आहेत त्या शब्दांचाही त्यांनी अभ्यास केला आहे. नीलला संगणकाचा मुबलक वापर, चार चार शिकवण्या अशा साऱ्या सुविधा आहेत. शिवाय पूर्वी या स्पर्धेत भाग घेतलेल्या बहिणीचा अनुभव आणि मार्गदर्शनही आहे. इतकंच नाही तर प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळेस नीलला यश मिळावं म्हणून नीलच्या बाबांनी हजार माणसांना भारतात प्रार्थना करण्यासाठी पैसे दिले आहेत. अर्थातच नीलच्या वडिलांना त्याला विजेतेपद मिळेल किंवा नाही यापेक्षा एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन त्यासाठी केलेले प्रयत्न महत्त्वपूर्ण वाटतात.
नूपुर लाला. अंतिम फेरीत पोचण्यासाठी प्राथमिक फेरीतच नूपुरला तिच्याच शाळेतल्या तीन हुशार मुलांबरोबर सामना करावा लागला. ती मुलं म्हणतात, आम्हाला खरं तर नूपुरला हरवायचं होतं, पण तिला सगळी स्पेलिंग येत होती.
एंजला आरनेवर आहे एका साध्यासुध्या फार वर्षांपूर्वी बेकायदेशीररीत्या या देशात आलेल्या मेक्सिकन कामगाराची मुलगी. फारसं इंग्लिश बोलू न शकणाऱ्या आई -वडिलांच्या या मुलीची, एंजलाची धडपड फार कौतुकास्पद वाटते.
एप्रिल डेजिडीओचे बाबाही छोटंस दुकान चालवितात. ही स्पर्धा जिंकली तर आर्थिक विवंचना थोडीफार कमी होईल अशा आशेवर जिद्दीने तयारी चालू आहे. इतर मुलांची कौटुंबिक स्थिती उत्तम आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात या माहितीपटाने डोकावता आल्याने, मुलांची मेहनत पाहता आल्याने उपान्त्य आणि अंतिम फेरी फारच उत्कंठावर्धक वाटते. कुणीच बाद होऊ नये असं वाटत राहतं, पण एकेक मोहरा गळायला लागतो तेव्हा इथे पोचेपर्यंत रोजचे सहा सात तास त्यांनी इतर गोष्टी बाजूला ठेवून केलेली शब्द, स्पेलिंग यासाठी घेतलेली मेहनत आठवते. आई- वडिलांनी त्यांचं जीवन कसं याच भोवती वेढलं गेलं आहे आणि स्पर्धा होईपर्यंत त्यांना मौजमजेचा विचारही करता येत नाही याचा केलेला उल्लेख मनाला छळत राहतो आणि अंतिम फेरीपर्यंत मजल मारता न आलेल्या या मुलांबद्दल वाईट वाटतं. विशेषत: वयाच्या अटीमुळे ज्या मुलांना पुन्हा पुढच्या वर्षी भाग घेता येणार नाही त्यांच्याबद्दल. अंतिम फेरीत या आठ मुलांमधले चारचजण पोचतात. त्यात नील कडाकिया आणि नूपुर लालाचा समावेश आहे. माहितीपट संपतो तो १९९९ च्या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या चषकाने. शेवटच्या शब्दाचं स्पेलिंग सांगतानाच नूपुरच्या चेहऱ्यावर विजेतेपदाचं स्मित दिसतं आणि लगेचच तिच्या नावाची घोषणा होते. नूपुर दोन्ही हात उंचावत खुशीने उडी मारते. हातातला चषक आनंदाने उंचावते.
‘अकीला एंड द बी’ हा २००६ साली प्रसिद्ध झालेला याच विषयावरचा दुसरा चित्रपट. कृष्णवर्णीय अकीला, लॉस एंजिलिसच्या सहसा कुणी फिरकतही नाही अशा भागात वाढणारी अकरा वर्षांची मुलगी. चित्रपटाच्या सुरुवातीलाच तिची ओळख करून देताना ती म्हणते, आमच्यासारखी मुलं कुठेही गेली तरी आम्हाला पटकन कुणी सामावून घेत नाही. ती हे बोलत असतानाच त्या भागातील अस्वच्छता, रस्त्यावरून फिरणारी टारगट मुलं अशी दृश्य पाहता पाहता आपण अकिलाच्या शाळेत पोहोचतो. नंतरच्या दृश्यात वर्गात शिक्षिका मुलांना तपासलेले पेपर देते. अकिलाच्या हातात तिची गुणपत्रिका देताना शिक्षिका विचारते. ‘किती अभ्यास केला होतास?’ मुलं जोरजोरात हसायला लागतात. मागे मुली चिडवत, हसत खिदळत नाचत असतात.
‘नव्हता केला.’ पोटात गोळा आलेली अकीला घाबरत उत्तर देते. आणि हातातल्या कागदावर हळूच आपले गुण पाहते. पैकीच्या पैकी! परीक्षा असते स्पेलिंगची. शिक्षिका तिला आंतर शालेय स्पेलिंग बी स्पर्धेचा अर्ज भरायला सांगते. अकीलाला या स्पर्धेबद्दल माहिती तर नसतेच पण त्यात रसही नसतो. शिक्षिका आणि मुख्याध्यापकांनी भरीला घातल्यावर नाईलाजाने ती तयार होते. अभ्यासात रस आणि गती नसलेलीच बरीचशी मुलं असल्याने शाळेतही स्पर्धा जिंकणं अकीलाला फारच सोपं असतं. त्या स्पर्धेच्या वेळी हजर असलेले प्रोफेसर लारा तिचे मार्गदर्शक व्हायची तयारी दाखवितात.
आत्मविश्वास नसलेली तरीही काहीशी बेफिकीर अकीला त्यांच्या घरी उशिरा पोचते. जिला वेळ पाळणं जमत नाही अशा मुलांसाठी मी माझा वेळ फुकट घालवू इच्छित नाही. वेळ पाळणं आणि दृष्टीकोन बदलणं जमत असेल तरच ते तिला मार्गदर्शन करू इच्छितात हे प्रोफेसर लारा स्पष्ट करतात. अकीलाला कशाचीच खात्री नसते. आधीच बरोबरच्या मुलांनी ‘घासू’ म्हणत तिला बाजूला टाकायला सुरुवात केलेली आणि घरात गोळीबारात वडिलांच्या झालेल्या मृत्यूच्या दु:खातून वर न आलेली आई. शाळेखातर तिने यात भाग घेतला. तिने या स्पर्धेत भाग घेतला तर शाळेचं नाव होईल या भरवशावर शाळा तिला अभ्यासाच्या बाबतीत बऱ्याच सवलती देते. अकीलाची इतर विषयात प्रगती बेताचीच, पण वडिलांच्या आठवणीने व्याकुळ झाल्यावर स्पेलिंग पाठ करणं हा तिने शोधून काढलेला पर्याय तिला या स्पर्धेची दारं उघडून देतो. शाळा, आंतर शालेय, उपान्त्यपूर्व आणि अंतिम फेरी या सर्वातून आधी गोऱ्या मुलांबरोबर वावरताना घाबरलेली, अडखळणारी अकीला हळुहळू या वातावरणाला सरावते आणि कसं विजेतेपद मिळवते त्याचा प्रवास लक्षणीय आहे.
अकीलाची गोष्ट काल्पनिक असली, तरी चित्रपटाची कथा आणि सर्वाचा अभिनय श्रेष्ठ आहे. गंमत म्हणजे, या चित्रपटाची पटकथा व दिग्दर्शक/ निर्माता जवळ जवळ दहा वर्षांपूर्वीच तयार असूनही प्रायोजक मिळत नव्हते, ते थेट ‘स्पेलबाऊंड’ हा माहितीपट अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्डसाठी नामांकित होईपर्यंत. ‘स्पेलबाऊंड’मुळे ही स्पर्धा अधिक प्रसिद्धीझोतात तर आलीच, पण टीव्हीच्या मुख्य वाहिनीवर ही स्पर्धा प्रक्षेपित होऊ लागली आहे. दरवर्षी कार्यक्रम संपला की घराघरांतून नवीन स्वप्न पाहिलं जातं. मुलांचे आणि त्यांच्या आई-वडिलांचे पुढच्या वर्षी या स्पर्धेत भाग घ्यायचे बेत आणि तयारी सुरू होते. स्पेलिंग बी विजेतेपद आणि चाळीस हजार डॉलर्स!
मोहना जोगळेकर
mohanajoglekar@hotmail.com