Leading International Marathi News Daily
गुरुवार, ११ जून २००९
  स्पेलिंग बी!
  ओपन फोरम
  ग्रूमिंग कॉर्नर - दिसतं तसं नसतं..
  क्रेझी कॉर्नर - ‘वाइफ इज ऑलवेज राइट’
  स्मार्ट बाय
  मेल बॉक्स
  दवंडी - गावकुसातली आकाशवाणी
  लँग्वेज कॉर्नर - जर्मनीतील ‘हरित क्रांती’
  यंग अचिव्हर्स - गवसलेलं क्षेत्रं
  एका लग्नाची गोष्ट
  इव्हेंटस कॉर्नर - शिल्पा आनंद यांचे ब्रायडल कलेक्शन
  नेट कॉर्नर - Little girl
with spunk!
  ब्यूटी कॉर्नर - मुलायम, घने लंबे बाल..

ओपन फोरम
आपली एक कार असावी असं प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं. अर्धा पॉकेट मनी असाच कुठेतरी खर्च होत असल्याने कॉलेजच्या दिवसांत तरी कार हे स्वप्नच असतं. बाईक असलेल्यांनाही पेट्रोलसाठी पैशाची चिंता सतत सतावत असते. म्हणूनच आपल्या या स्वप्नांना तरुणांनी व्हिवाद्वारे वाट मोकळी करुन दिली..

संदेश रामबाडे (बी.ए.)
माझी ड्रीम कार ही बैलगाडी आहे. कारण तिला इंधनाची गरजच लागत नाही. पेट्रोलवर होणारा खर्च आणि प्रदूषणाची तर बाबच सोडा. असं म्हटलं जातं की आपण एका वर्तुळात जगत असतो आणि म्हणूनच जिथे संपतं तिथूनच नव्याने सुरुवात होत असते. फक्त दोन बैल विकत घ्यावे लागतील. तेवढाच काय तो खर्च होईल. महत्वाचे म्हणजे, सिग्नलला थांबावे लागणार नाही.

सुहास वानखेडे (मेकॅनिकल इंजिनीअर)
मला अशी कार आवडेल जी सौरऊर्जेवर चालेल. तिच्यात पेट्रोल भरावं लागणार नाही. जेणेकरुन धूर आणि त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्नच मिटेल. पण त्या गाडीचा स्पीड मात्र इतर गाडय़ांपेक्षा कमी नको. टोयोटा, होंडा सारख्या कंपन्या अशी कार तयार करण्याच्या प्रयत्नातही आहेत.

अक्षता फडतरे (बी.ए.)
सध्या नॅनो लॉन्च झाली आहे त्यामुळे नॅनो हीच माझी ड्रीम कार आहे. उद्या कोणती दुसरी कार आली की ती माझी ड्रीम कार असेल. कारण स्वप्नांना तसा कधीच तोटा नसतो. तशी नॅनो ही सर्वसामान्यांसाठी आहे. प्रत्येक वेळी नविन गोष्टींचे स्वागत करावे असे मला वाटते.

सुधीर देसाई (हॉटेल मॅनेजमेंट)
माझी ड्रीम कार तर आत्ताची टॅक्सी! आजकाल टॅक्सीवाल्यांचा भाव किती वधारलाय. इतर वेळेला नाही ऐकण्याची सवय आपल्याला नसते. पण टॅक्सीवाल्याने नाही म्हटलं की गपचूप आपण तिथून दुसऱ्या टॅक्सीकडे जातो. कार्ड न बघता ते जितके सांगतील तेवढे पैसे आपण देतो त्यामुळे पैसे उकळण्याच्या नवीन मार्ग मिळतो!!

नीला चव्हाण (कॉलसेंटर)
नॅनो ही माझी ड्रीम कार म्हणावी.. कारण नॅनो म्हणजे ड्रीम कम ट्र. ड्रीम कार असली तरी चार चाकांचीच असावी. पेट्रोलवर नाही तर पाण्यावर चालणारी असावी.