Leading International Marathi News Daily
गुरुवार, ११ जून २००९
  स्पेलिंग बी!
  ओपन फोरम
  ग्रूमिंग कॉर्नर - दिसतं तसं नसतं..
  क्रेझी कॉर्नर - ‘वाइफ इज ऑलवेज राइट’
  स्मार्ट बाय
  मेल बॉक्स
  दवंडी - गावकुसातली आकाशवाणी
  लँग्वेज कॉर्नर - जर्मनीतील ‘हरित क्रांती’
  यंग अचिव्हर्स - गवसलेलं क्षेत्रं
  एका लग्नाची गोष्ट
  इव्हेंटस कॉर्नर - शिल्पा आनंद यांचे ब्रायडल कलेक्शन
  नेट कॉर्नर - Little girl
with spunk!
  ब्यूटी कॉर्नर - मुलायम, घने लंबे बाल..

स्मार्ट बाय
मिस प्लेअर्स
मिस प्लेअर्सने फॉर्मल वेअरचं कलेक्शन सादर केलं आहे. कामावर जाताना आकर्षक दिसण्यासाठी हे कपडे नक्कीच पसंतील उतरतील. ५९९ रुपयांपासून या फॉर्मल वेअरची किंमत सुरु होते.

लॉरिअलची हेअर केअर रेंज
लॉरिअलने सेरी नेचर ही हेअर केअर रेंज बाजारात आणली आहे. कोरडे वा तेलकट केस. सेन्सेटीव्ह केस, कोंडा या सगळ्या प्रकारांसाठी योग्य असे हेअर केअर प्रॉडक्ट्स यात आहेत. ५२५ रुपयांपासून पुढे ही उत्पादने उपलब्ध आहेत.

डाबर रिअल अ‍ॅपल नेक्टर
डाबरने रिअल अ‍ॅपल नेक्टर हे नवीन पेय बाजारात आणलं आहे. आकर्षक पॅक आणि सफरचंदाची मूळ चव ही या पेयाची वैशिष्टय़े आहेत. या पेयाच्या २०० मिली पॅकची किंमत १५ रुपये व एक लीटर पॅकची किंमत ७५ रुपये आहे.

न्युट्रिशनल सप्लिमेंट
पिरॅमल हेल्थकेअरने न्युट्रिशनल सप्लिमेंट्स बाजारात आणली आहेत. ग्लुटेमाईन, झिंक, व्हिटॅमिन बी, कॅल्शियमने युक्त असं हे सप्लिमेंट आहे.

मी कोराझोन
पावसाळ्यानिमित्त छत्र्यांचे कलेक्शन स्टॅग अमरेलाने सादर केले आहे. विविध रंग, आकर्षक डिझाईन्स, नवीन चौकोनी आकाराच्या छत्र्यांचे कलेक्शन उपलब्ध आहे.

सोनी वायो
सोनीने नवीन वायो एनडब्ल्यू नोटबूक हा नवीन कॉम्प्यूटर बाजारात आणला आहे. नवीन टेक्श्चर, टू टोन्ड कलर ही याची वैशिष्टय़े आहेत. १५.५ इंचाचा वाईड स्क्रीन आहे. ३७,९९० रुपयांपर्यंतच्या किंमतीत हा लॅपटॉप उपलब्ध आहे.

बार्बी शाम्पू
बार्बीने पन्नासाव्या वर्षांत पदार्पण केल्याच्या निमित्ताने बार्बी शाम्पू बाजारात उपलब्ध झाला आहे. लांब, शॉर्ट, सिल्की केसांना उपयुक्त असा हा शाम्पू तरुणींच्या पसंतीस नक्कीच उतरेल. १२५ रुपये किंमतीत हा शाम्पू उपलब्ध आहे.

मॅस्परचं विंटेज कलेक्शन
घर सजावटीच्या वस्तूंसाठी असलेल्या मॅस्पर या ब्रॅण्डने नवीन विंटेज कलेक्शन सादर केलं आहे. विविध प्रकारचे बेड कलेक्शन यात आहे. ३५० ते ११,९९५ रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये हे कलेक्शन उपलब्ध आहे. त्याचबरोबर डेनीम ब्ल्यू रंगांचे बेडशीट कलेक्शनही उपलब्ध आहे. गुलाबी आणि निळ्या रंगांमध्ये उपलब्ध असलेलं हे कलेक्शन १०० ते ४४९५ रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे.