Leading International Marathi News Daily
गुरुवार, ११ जून २००९
  स्पेलिंग बी!
  ओपन फोरम
  ग्रूमिंग कॉर्नर - दिसतं तसं नसतं..
  क्रेझी कॉर्नर - ‘वाइफ इज ऑलवेज राइट’
  स्मार्ट बाय
  मेल बॉक्स
  दवंडी - गावकुसातली आकाशवाणी
  लँग्वेज कॉर्नर - जर्मनीतील ‘हरित क्रांती’
  यंग अचिव्हर्स - गवसलेलं क्षेत्रं
  एका लग्नाची गोष्ट
  इव्हेंटस कॉर्नर - शिल्पा आनंद यांचे ब्रायडल कलेक्शन
  नेट कॉर्नर - Little girl
with spunk!
  ब्यूटी कॉर्नर - मुलायम, घने लंबे बाल..

ब्यूटी कॉर्नर - मुलायम, घने लंबे बाल..
केसांचे आरोग्य शारीरिक व मानसिक आरोग्यावर अवलंबून असते. सशक्त निरोगी केसांसाठी दर्जेदार प्रथिने ‘अ’ आणि ‘ब’ ही जीवनसत्त्वे, लोह, कॉपर व आयोडीन या घटकांची गरज असते.
यासाठी शेंगदाणे, सोयाबीन, मोड आलेली कडधान्ये, दूध, हिरव्या पालेभाज्या, हातसडीचा भात, तीळ, टोमॅटो, अननस, गूळ, खडे मीठ यांचा आहारात समावेश करावा. गळणाऱ्या केसांसाठी कढीलिंबाची पाने खोबरेल तेलात उकळून ते तेल झोपण्यापूर्वी डोळ्यास चोळावे (लावावे). आंघोळीपूर्वी डोक्यास स्वमूत्र चोळावे.
* वारंवार आम्लपित्ताचा त्रास झाल्याने केस अकाली पिकतात. (चहा, कॉफी, तुरडाळ, बेकरी प्रॉडक्टस् खाऊ नयेत.)
*अ‍ॅन्थोथेनिक अ‍ॅसिड, पॅराअमीनो, बेन्झाईक अ‍ॅसिड व इनोसी तेल या ‘ब’ वर्गात मोडणाऱ्या जीवनसत्त्वांचा योग्य पुरवठा न झाल्यास केस अकाली पिकतात. आहारात यीस्ट, गव्हाचे सत्त्व, काकवी, अदमुरे, ताक यांचा समावेश असावा.
* अ‍ॅनिमिक व्यक्तीचे केस लवकर पांढरे होतात. आहारात बीट, काळे तीळ, मनुके, खजूर यांचा समावेश असावा.
सूक्ष्म वनौषधी- गव्हाचा तृणरस व माका-ब्राह्मी-आवळा यांचे मिश्रण सूक्ष्म मात्रेत द्यावे.