Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

व्यापार - उद्योग

‘अल्पारी’ची भारतात फॉरेक्स ट्रेडिंग सेवा
व्यापार प्रतिनिधी:
परकीय चलन व्यवहारात ऑनलाइन सेवा पुरविणारी जागतिक आघाडीची कंपनी ‘अल्पारी’ने भारतातील कार्यान्वयन सुरू केले आहे. अल्पारीच्या वतीने भारतीय संस्थात्मक आणि रिटेल ग्राहकांना फॉरेक्स ट्रेिडग सेवा देण्यात येईल. आता भारतातील ग्राहकांना या अद्ययावत आणि प्रश्नेप्रश्नयटरी करन्सी ट्रेडिंग तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार असून यासाठी दर्जेदार सेवा, स्पर्धात्मक दर आणि फायदा, तसेच ग्राहकांशी मित्रत्वाचे संबंध ठेवणारी व्यावसायिक टीम कार्यरत असणार आहे.

‘कंट्री क्लब’कडून लग्नसोहळ्याचे पॅकेज
व्यापार प्रतिनिधी:
भारत व दुबईत एकंदर २०० क्लब्स व रिसॉर्ट्सचे संचालन करणारी आघाडीची एकात्मिक ऐषाराम सेवा कंपनी कंट्री क्लब (इंडिया) लि.ने तब्बल ५०,००० कोटी रुपयांच्या भारताच्या लग्न बाजारपेठेत प्रवेश केला असून, विवाह सोहळ्यासंबंधी सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारी ‘कंट्री विवाह’ नावाचे नवीन सेवा दालन खुले केले आहे. पुढील पाच वर्षात या नवीन सेवेतून सुमारे ७५० कोटी रुपयांच्या घरात महसुली उत्पन्न कंपनीला अपेक्षित आहे.

‘फिनो’तर्फे आता रेमिटन्स सेवांचेही दालन खुले
व्यापार प्रतिनिधी:
फायनान्शियल इन्फॉर्मेशन नेटवर्क आणि ऑपरेशन्स लिमिटेड (फिनो) ने आपल्या स्मार्ट कार्ड तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘रेमिटन्स सेवां’ची सुरुवात केलेली असून यामुळे देशातील रेमिटन्सच्या पद्धतीमध्येच बदल घडून येण्याची शक्यता आहे. अतिशय समर्थपणे नामकरण केलेले फिनो- तत्काल हे सोल्युशन प्रेषक आणि लाभार्थी यांच्यामधील दुवा म्हणून काम करते आणि यासाठी भौगोलिक व्याप मापनीय तंत्रज्ञान व्यासपीठ आणि रेमिटन्स व्यवहारांसाठी प्रक्रियाकरण क्षमता प्रदान करते.

बोईसर प्रकल्पात आणखी ३०० घरांची टाटा हाऊसिंगकडून भर
व्यापार प्रतिनिधी:
महिन्याभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या ‘शुभ गृह’ उपक्रमाला ग्राहकांचा लाभलेला प्रतिसाद आणि मागणी पाहता, टाटा हाऊसिंग डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडने या उपक्रमामध्ये आणखी ३०० घरांची भर टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. बोईसर येथील आधी १००० घरे असलेला हा प्रकल्प आता १३०० घरांचा बनलेला आहे. यासाठी नोंदणी बंद झालेली असून जूनअखेरपासून सदनिकांच्या वाटपाची घोषणा करण्यात येईल.

‘एसर’चा नवीन पीसी केवळ ९९९९ रुपयांत
व्यापार संक्षिप्त

व्यापार प्रतिनिधी: एसर या जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठय़ा पीसी ब्रॅण्डने भारतातील लोक आणि तंत्रज्ञान यांच्यामधील दरी कमी करण्याच्या दिशेने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून लक्षणीय पाऊल उचलले आहे. ‘ईएल-१६००’ या आपल्या एण्ट्री लेव्हल डेस्कटॉपच्या किमतीची पुनर्रचना कंपनीने केली आहे. पीसी देताना कोणत्याही प्रकारची तडजोड न करताही संपूर्ण देशभरात चांगल्या कार्यक्षमतेचा आणि विस्तारासाठी भरपूर संधी असलेला पीसी आता केवळ ९९९९ रु. ना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

बँक ऑफ इंडियातर्फे म्हाडा अर्जदारांसाठी मार्गदर्शन मेळावा
व्यापार प्रतिनिधी:
म्हाडाच्या योजनांमध्ये नंबर लागून सुद्धा गृहकर्जे मिळविण्यात लोकांना अडचणी येत आहेत. यासंबंधी बँक ऑफ इंडियाने पुढाकार घेतला आहे. बँकेच्या मुंबई दक्षिण झोनतर्फे म्हाडाच्या गृहखरेदीसाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी विशेष मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे. सदर मेळावा १४ जून, २००९ रोजी बँक ऑफ इंडिया, दुसरा मजला, ७०-८०, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, एम. जी. रोड, मुंबई-४००००१ येथे सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० पर्यंत आयोजित केला आहे. म्हाडा अर्जदारांनी आपले अ‍ॅलॉटमेंट लेटर, ओळखपत्र व अन्य कागदपत्रांसह यावे. या मेळाव्यात बँकेच्या गृहकर्ज योजनेची माहिती दिली जाईल तसेच ग्राहकाभिमुख मार्गदर्शन दिले जाईल.

विप्रश्ने फर्निचरची ‘स्टारलाईन’ डिझायनर श्रेणी
व्यापार प्रतिनिधी:
विप्रश्ने फर्निचरने लंडनस्थित आंतरराष्ट्रीय फर्निचर डिझायनर टीम वॉलेसचे सिग्नेचर उत्पादन स्टारलाईन भारतीय बाजारपेठेमध्ये दाखल केले आहे. रॉयल कॉलेज ऑफ आर्ट, लंडन येथील डिझाईनमधील मास्टर्स पदवी घेतलेले टीम वॉलेस आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेले फर्निचर डिझायनर आहेत. टीम गेल्या दोन दशकांपासून आघाडीच्या आंतरराष्ट्रीय फर्निचर कंपन्यांबरोबर कार्यरत आहेत आणि त्यांनी ग्लोबल मार्केटसाठी पुरस्कार विजेती उत्पादने डिझाईन केली आहेत. स्टारलाईनच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहकांना आंतरराष्ट्रीय स्टाईल रेंजचा पर्याय उपलब्ध करून देत आहोत. या रेंजच्या उत्पादनांसाठी आम्ही औरंगाबाद येथे जागतिक दर्जाच्या कारखान्यामध्ये गुंतवणूक केली आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, आमच्या ग्राहकांना ही उत्पादन रेंज पसंत पडेल. असे उद्गार विप्रश्ने फर्निचरचे प्रमुख आणि उपाध्यक्ष पराग कुलकर्णी यांनी काढले. टीम वॉल्स म्हणाले की, डिझायनिंग हे एक प्रकारचे आव्हान असते. जागतिक पातळीवर डिझायनिंग करणे हेदेखील आव्हानच आहे.’ ‘स्टारलाईन’ ही अतिशय लक्षपूर्वक डिझायनिंग केलेली आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्पादने भारतीयांना नक्कीच भावतील. मुंबईमध्ये झालेल्या एका खास कार्यक्रमात ही उत्पादने सादर करण्यात आली.