Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

(सविस्तर वृत्त)

ऐन महत्त्वाच्या वेळीच वैद्यकीय आणि नागरी सेवा कोलमडल्या..!
श्वेता देसाई/स्वाती खेर
मुंबई, ११ जून

 

दहशतवादी हल्ला मुंबई पोलिसांना नवीन नाही; तसेच नागरी आणि तातडीच्या, आपत्कालीन सेवा पुरविणाऱ्या यंत्रणांनासुद्धा ही बाब नवी नाही. आपत्ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित असो, त्यांनी यापूर्वीही अशा प्रसंगांना तोंड दिलेले आहे; परंतु २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी कायदा अंमलबजावणी आणि सुरक्षा यंत्रणा यांच्याबरोबरच नागरी आणि वैद्यकीय सेवा संस्थांचीही अकार्यक्षमता प्रत्ययास आली.
२६ जुलै २००५ चा जलप्रलय, ११ जुलै २००६ चे उपनगरी गाडय़ांमधील बॉम्बस्फोट, दरवर्षी होणारे इमारती कोसळण्याचे प्रकार यापासून या संस्थांनी काहीच बोध घेतला नसल्याचे जाणवते. प्रत्येक वेळी नेतृत्वाचा अभाव, निर्णय क्षमतेचा अभाव यामुळे उडणारा गोंधळ कायम आहे. ‘२६/११’ हल्ल्याच्या वेळी ताजमहाल हॉटेलमध्ये अग्निशमन दल पोहोचले; पण त्याला मार्गदर्शन करणारा कोणी नव्हता. अग्निशामक बंबांच्या शिडय़ा निकामी होत्या. इस्पितळांकडे पुरेशा रुग्णवाहिका नव्हत्या, ऑपरेशन थिएटरमध्ये भूलतज्ज्ञ नाहीत या नेहमीच्या अडचणी होत्याच. २० हजार कोटी रुपयांचा वार्षिक अर्थसंकल्प असलेली देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणजे मुंबई महापालिका! आणीबाणीच्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी या महापालिकेकडे अद्यावत अशी ‘स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ (सॉप) यंत्रणा आहे. २६ जुलै २००५ च्या जलप्रलयानंतर ही यंत्रणा अधिक अद्यावत करण्यात आली असूनही ‘२६/११’ च्या आपत्तीच्या वेळी हवा तसा उपयोग झाला नाही. ‘सॉप’ची अंमलबजावणी करताना पालिका आयुक्त, अग्निशमन दल, महापालिकेची १९ इस्पितळे या सर्वाना आधी कळवून तयार राहण्याच्या सूचना द्याव्या लागतात.
उर्वरित वृत्त