Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

आस पावसाची!
प्रतिनिधी / नाशिक

साधारणत महिनाभरापूर्वी वादळी वारा आणि मेघ गर्जनेसह आलेल्या बेमोसमी पावसाचा अपवाद वगळता ऐन हंगामाच्या सुरूवातीला संपूर्ण उत्तर महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरविली असून यंदाही तो गतवर्षीप्रमाणे संकट निर्माण करतो की काय, याची चिंता शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना भेडसावू लागली आहे. किमान आठवडाभर पावसाचे उत्तर महाराष्ट्रातील आगमन लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. पावसाचे आगमन लांबल्याने पाणी टंचाईच्या संकटात दिवसागणिक वाढ होत चालली आहे.

महापौर म्हणतात, ‘लेट पण थेट’
प्रतिनिधी / नाशिक

‘सिडकोत वाहने जाळण्याच्या प्रकाराचे अनेक जण भांडवल करीत आहेत.. घटनास्थळी भेट देण्याची जणू चढाओढ लागली आहे.. पण, नुसत्या भेटी देऊन काय उपयोग.. लोकांना खरी गरज आहे मदतीची.. त्यामुळे मी सोबत आर्थिक मदत घेऊनच आलो.. विलंबापेक्षा ‘लेट पण थेट’ महत्त्वाचे, हे लक्षात घ्या..,’ अशी प्रतिक्रिया महापौर विनायक पांडे यांनी नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप केल्यानंतर ‘वृत्तान्त’शी बोलताना व्यक्त केली.

भारतीयांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रध्वजाची होळी
प्रतिनिधी / नाशिक

ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांवर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी शहर एन.एस.यु.आय.च्या कार्यकर्त्यांनी येथील काँग्रेस कार्यालयासमोर ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रध्वजाची होळी केली. एन.एस.यू.आय.चे शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली.

‘गुंडगिरीचा नवा पॅटर्न सर्वात धोकादायक’
फोफावती गुंडगिरी अन् तटस्थ नेतागिरी
प्रतिनिधी / नाशिक
गुंडगिरी आणि गुन्हेगारी घटनांचा रतीब शहरात अव्याहत सुरू असताना एकाच रात्री सिडको परिसरातील सुमारे ४० वाहने जाळण्याचा ‘पराक्रम’ करून स्थानिक गुंड टोळ्यांनी आपली दहशत कमालीची वाढविली आहे. त्याबरोबरच अवैध धंद्यांना लगाम आणि गुंडांना तडीपार करण्याच्या पोलिसांनी सुरू केलेल्या हालचालींना उत्तर म्हणून हे कृत्य असल्याचे काही पोलीस अधिकारी सांगत असल्याने एकप्रकारे ते संपूर्ण यंत्रणेलाच खुले आव्हान ठरत आहे.

पावसाळ्यासाठी महावितरणतर्फे नियंत्रण कक्ष आणि कॉल सेंटर्स
प्रतिनिधी / नाशिक

मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीची कामे पूर्णत्वाकडे असल्याने पावसाळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी नाशिक परिमंडलात महावितरणची यंत्रणा सज्ज झाली आहे. या कालावधीत प्रत्येक मंडलस्तरावर दैनंदिन नियंत्रण कक्ष आणि शहरी भागांसाठी कॉल सेंटर्स यांच्या माध्यमातून ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नवीन आरक्षणाचा घोटी ग्रामपंचायत
निवडणुकीवर परिणाम होण्याची चिन्हे

नाशिक / प्रतिनिधी

घोटी ग्रामपंचायतीचे वादग्रस्त ठरलेले प्रभाग आरक्षण अखेर रद्द ठरवित नव्याने आरक्षणाची सोडत काढण्यात आली. प्रांताधिकारी नीलेश सागर यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीसाठी आयोजित विशेष ग्रामसभेत प्रभाग फेररचना व सोडतीद्वारे फेरआरक्षण करण्यात आले. या फेररचनेत सर्व सहा प्रभागांचे क्रमांक बदलण्यात आले. तसेच आरक्षण सोडतीत अनेक प्रभागात धक्कादायक फेरबदल घडून आले. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक वादळी ठरण्याची शक्यता आहे.

नाशिककरांच्या संयमाची परिसीमा
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात पोलिसांचे राज्य की गुंडांचे राज्य असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककर नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे संतभूमी म्हणून ओळख असणाऱ्या नाशिकची ओळख ‘नाशिक का गुंडाराज’ अशी नव्याने झाली आहे. वेगवेगळ्या गुंड टोळ्यांमधील आपआपसातील हाणामाऱ्या, खंडण्या उकळणे, सर्वसामान्य नाशिककरांच्या मनात दहशत निर्माण करून त्यांना वेठीस धरणे हे तर नेहमीचेच झाले.