Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

लोकसंग्रामचे ‘सुझलॉन’वर पुन्हा शरसंधान
वार्ताहर / धुळे

सुझलॉन कंपनीने आदिवासी, दलित व गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने सौदा पावती करून नुकत्याच अडकवून ठेवल्या, त्या प्रत्यक्षात विकत घेतल्या नाहीत. एवढेच नाही तर आदिवासी, इनामाच्या आणि नवीन अविभाज्य शर्ती तसेच रित दोनच्या जमिनी संदर्भात शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणताही व्यवहार करता येत नसताना कंपनीने महसूल यंत्रणेला हाताशी धरून सातबाराच्या उताऱ्यावर बेकायदेशीर नोंदीही करून घेतल्याचा आरोप लोकसंग्राम पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

जळगावची अतिक्रमण व वाहतूक समस्या; पालिकेप्रमाणेच वाहतूक पोलीस जबाबदार
संयुक्त मोहीम राबविण्याची मागणी
वार्ताहर / जळगाव
शहरातील वाढते अतिक्रमण व त्यामुळे उद्भवणाऱ्या वाहतूक समस्येला महापालिका प्रशासनाइतकेच शहर वाहतूक पोलीसही जबाबदार आहेत, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त होत असून या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महापालिका व पोलिसांनी संयुक्तरित्या मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

तापी पाणी योजनेतील जाचक अट दूर करण्याची मागणी
शहादा / वार्ताहर

शहरासाठी सारंगखेडा प्रकल्पातून कायम स्वरुपी पाणीपुरवठा योजना प्रस्तावित असून त्यातील १० टक्के लोकवर्गणीची अट रद्द करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरूण चौधरी, तालुकाप्रमुख भगवान अलकरी, शहरप्रमुख दिलीप पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यापूर्वी राज्य शासनाने वसई-विरार उपप्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी लोकवर्गणीची अट शिथील करून सदरहू योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत मंजूर केली आहे.

प्रारूप विकास आराखडाप्रश्नी महापालिकेची सभा तहकूब
धुळे / वार्ताहर

शहराच्या नव्या प्रारूप आराखडय़ात नेमका कोणता बदल करण्यात आला आहे, याची नगरसेवकांना माहिती नसल्याने महापालिकेची सभा तहकूब करण्यात आली. सॅटेलाईटद्वारे सव्‍‌र्हेक्षणातून गेल्या दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला हा प्रारूप विकास आराखडा तीन दिवस महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांसाठी लावण्यात येणार आहे. आराखडा फक्त नगरसेवकांनाच पाहता येणार असून त्यांच्या अवलोकनानंतर घेण्यात येणाऱ्या महासभेत तो मंजुरीसाठी सभेत ठेवण्यात येणार आहे.

उघडय़ावर मांसविक्री : कारवाईचा इशारा
मालेगाव / वार्ताहर

महापालिका हद्दीत अनधिकृतपणे जनावरांची कत्तल करणाऱ्या आणि उघडय़ावर मांसविक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा बडगा महापालिका आयुक्त जीवन सोनवणे यांनी उगारला आहे. सव्‍‌र्हे नंबर १०८/२ मध्ये महापालिकेचा कत्तलखाना आहे. ४८ जणांना जनावरांची कत्तल करण्याचा परवाना देण्यात आला आहे. या परवानाधारकांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावरांची तपासणी करून घेतल्यानंतरच अधिकृत कत्तलखान्यात कत्तल करावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. याचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त सोनावणे यांनी दिला आहे.