Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

राज्य

कर्जतचे डॉ. नाझीरकर यांना दोन लाख रुपये मेडिक्लेम मंजूर
कर्जत, ११ जून/वार्ताहर

कर्जतमधील अस्थिशल्यविशारद डॉ. घन:शाम नाझीरकर यांना त्यांच्या ‘मेडिक्लेम’ पॉलिसीअंतर्गत देय असलेली दोन लाख रुपये विम्याची रक्कम देण्यास नकार देणाऱ्या नॅशनल इन्श्युरन्स कंपनीला अलिबाग येथील रायगड जिल्हा ग्राहक मंचाने चांगलाच दणका दिला आहे.

कांदा वजनमापातील अवैध कपातीचा प्रश्न ऐरणीवर
लासलगाव शेतकरी कृती समितीचा इशारा
लासलगाव, ११ जून / वार्ताहर
कांद्याच्या वजन मापात प्रतिक्विंटल दोन किलो याप्रमाणे होणारी बेकायदेशीर कपात त्वरीत बंद करावी, चोवीस तासात शेतकऱ्यांना शेतीमालाचे पैसे अदा करावेत, नियमबाह्य़ बांधा पध्दत बंद करावी या मागण्या मंजूर होत नाही, तोपर्यंत शेतीमालांचे लिलाव पूर्ववत सुरू करू नयेत, असा इशारा दिलेले निवेदन हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेतकरी कृती समिती व नाशिक जिल्हा बँकेचे संचालक नानासाहेब पाटील यांनी लासलगाव बाजार समितीचे सचिव बी. वाय. होळकर व पोलीस उपनिरीक्षकांना दिले.

पवनऊर्जा कंपन्यांच्या व्यवहारांची सी.बी.आय. चौकशीची मागणी
नाशिक, ११ जून / प्रतिनिधी

पवनऊर्जा कंपन्यांच्या जमीन खरेदी-विक्री व्यवहारांची सी.आय.डी. चौकशी करण्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्र्यांनी विधीमंडळाच्या अधिवेशना दरम्यान जाहीर केले असले तरी ही बाब म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

धुळे जिल्हा परिषद अपहार प्रकरणी पाच जणांना सक्तमजुरी
धुळे, ११ जून / प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या कोटय़वधी रूपयांच्या अपहार प्रकरणातील मृत संशयित दिगंबर बोरालेच्या कुटुंबातील पाच सदस्यांना प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रूपये दंड भरण्याची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. जिल्हा परिषदेत नोकरीस असताना दिगंबर बोराले यांनी १९८८ ते १९९१ या कालावधीत अपसंपदा जमविल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दाखल खटल्याच्या कामकाजाआधीच म्हणजे २००२ मध्ये बोराले यांचे निधन झाले.

कचऱ्याच्या समस्येमुळे देवरुखमधील आरोग्यास धोका
देवरुख, ११ जून/वार्ताहर

कचऱ्याच्या निचऱ्याबाबत कोणतेही नियोजन नसल्याने शहरातील नाक्यानाक्यांवर साठलेला कचरा आणि पसरणारी दुर्गंधी सध्या डोकेदुखी बनली आहे. ग्रामपंचायतीकडून कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने दिवसेंदिवस वाढत्या लोकवस्तीने वाढणाऱ्या कचऱ्याची समस्या गंभीर बनू लागली असून, त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.

आकाशवाणी संगीत स्पर्धेसाठी जळगावमध्ये चाचणीचे आयोजन
जळगाव, ११ जून / वार्ताहर

आकाशवाणीव्दारे आयोजित संगीत स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी येथे चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून १२ जूनपर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ‘आकाशवाणी संगीत स्पर्धा २००९’ ही स्पर्धा हिंदुस्थानी व कर्नाटक या दोन्ही शैलींकरिता गायन, वादन आणि वृंदगान या तीन प्रकारात होणार आहे. शास्त्रीय, सुगम, लोकगीत आणि उपशास्त्रीय गायन फक्त हिंदुस्थानी संगीत या विभागात होईल. वादन प्रकारात शास्त्रीय, सुगम, लोकसंगीत तसेच वृंदगान प्रकारात ही स्पर्धा होणार आहे. आकाशवाणीद्वारे मान्यताप्राप्त संगीत कलाकारांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही असे कळविण्यात आले आहे. सदरची स्पर्धा प्राथमिक आणि अंतीम अशा दोन स्तरावर घेतली जाणार आहे. प्राथमिक स्तरावर यशस्वी ठरणाऱ्या स्पर्धकांना अंतीम स्पर्धेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे व त्यांचीच अंतीम स्पर्धेसाठी निवड करण्यात येईल. सविस्तर माहिती व विहित नमुन्यातील अर्जासाठी इच्छुकांनी जळगाव आकाशवाणी केंद्राच्या संगीत विभागाशी संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेटावे असे कार्यक्रम प्रमुखांनी कळविले आहे.